facial-recognition
facial-recognition 
संपादकीय

चेहरा ही पहचान है

सकाळवृत्तसेवा

स्मार्टफोनच्या दुनियेत घडत असलेल्या क्रांतीने आणखी एक टप्पा गाठला आहे. स्पर्धेतून असो वा नावीन्याच्या ध्यासातून; पण आपल्या हातातील फोनचा दिवसेंदिवस वाढत असलेला स्मार्टनेस आपल्या जगण्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे, हे निश्‍चित. उच्च वर्गातील लोकप्रिय "ऍपल'ने पहिला आयफोन सादर केल्यानंतर दशकभराने पूर्णपणे नवी रचना असलेला आयफोन बाजारात आणून जणु एकच धमाका उडवून दिला आहे. "आयफोन 8', "8 प्लस' आणि "आयफोन एक्‍स' अशी मॉडेल सगळ्यांसाठी आणली आहेत. त्यातील वेगवेगळी फीचर्स ही एकेकाळी कल्पनेतदेखील अशक्‍य वाटली असती; पण आज मात्र सगुण, साकार रूपात लोकांसमोर येत आहेत.

उदाहरणार्थ, ऍपलच्या आयफोनने आता "मेरी आवाज ही पहचान है'प्रमाणे "चेहरा ही पहचान है' म्हणायची वेळ आणली आहे. "ऍपल'च्या आयफोनमध्ये पासवर्ड म्हणून आता "फेशियल रेकग्निशन तंत्रा'चा वापर केला आहे. जेणेकरून तुमचा चेहरा तुमच्या ऍपल आयफोनने बघितल्याशिवाय तो कामच करणार नाही. या नवीन तंत्रज्ञानाला त्या व्यक्तीचे छायाचित्र दाखवूनही फसवता येणार नाही. जरी वय वाढले किंवा वयोमानानुसार बदल झाले तरी फोन तुम्हाला ओळखेल अशी यंत्रणा आहे. डिजिटलच्या जमान्यात "आर्थिक सुरक्षितता' महत्त्वाची असते. म्हणूनच ऍपलने "फेस आयडी' बघून काम करणारा फोन सादर केला. त्याद्वारे तुम्ही "ऍपल पे डिजिटल पेमेंट सिस्टिम'शी जोडले जाणार आहात. त्यामुळे तुमच्याशिवाय तुमच्या फोनवरूनदेखील कोणीही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. आयफोनचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तुमचा "मूड' आणि तुमचे हावभाव फोनला कळणार आहेत. त्यानुसार फोटोसोबत त्या संबंधित "इमोजी' पुढे येणार आहेत. ऍपलने मुख्य कॅमेराबरोबरच सेल्फी कॅमेऱ्यातही "पोर्ट्रेट मोड' दिलाय. अंधारातदेखील जबरदस्त "लाईटिंग इफेक्‍ट' मिळणार आहे. म्हणजे आता अंधारात तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीशी व्हिडिओ चॅटिंगही शक्‍य आहे. एकूणच हे तंत्रज्ञान आपल्या जीवनात अधिक खोलवर शिरकाव करीत आहे. त्याचे नवनवे आविष्कार पाहता काल नवी वाटणारी गोष्ट आता फार लवकर जुनी वाटू लागली आहे. आता प्रश्‍न आहे तो या वेगाशी नीट जुळवून घेण्याचा. फोनचा स्मार्टनेस वाढत असताना आपला अंगभूत स्मार्टनेसही वाढवित नेण्याचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT