CAA will implemented Amit Shah trinamool congress politics eSakal
संपादकीय

CAA : ‘सीएए’ लागू करणारच : अमित शहा

देशात सुधारित नागरिकत्व कायद्याची (सीएए) अंमलबजावणी करण्यापासून केंद्र सरकारला कोणीही रोखू शकत नाही

सकाळ वृत्तसेवा

- श्यामल रॉय

कोलकता : देशात सुधारित नागरिकत्व कायद्याची (सीएए) अंमलबजावणी करण्यापासून केंद्र सरकारला कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे सभेत बोलताना केले.

‘तृणमूल’काँग्रेसचे सरकार हे लांगूलचालनाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शहा म्हणाले, ‘‘नागरिकत्व कायदा हा देशाचा कायदा असून केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची अंमलबजावणी करेल. त्याची अंमलबजावणी करण्यापासून कुणीही आम्हाला रोखू शकत नाही.’’

राज्यातील राजकीय हिंसाचार, भ्रष्टाचार आणि लांगूलचालनाच्या राजकारणावर प्रहार करताना ते म्हणाले, ‘‘ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला उद्‍ध्वस्त केले आहे.’’ ‘‘ सोनार बांगला’ अन् ‘मा माटी मानूष’ याचे आश्वासन देताना ममतादीदींना कम्युनिस्टांना सत्तेतून बाहेर फेकले होते.

पण हे सत्तांतर होऊन देखील राज्यात बदल झाला नाही. आजही राज्यामध्ये घुसखोरीचे प्रकार, लांगूलचालनाचे राजकारण आणि राजकीय हिंसाचार हे सगळे होतेच आहे. डाव्यांनी २७ वर्षे बंगालवर राज्य केले होते.

ममतांनाही सलग तिसऱ्यांदा राज्याची सत्ता मिळाली पण त्यांनी राज्याची वाट लावली. राज्यातील घुसखोरी ममतांना रोखता आलेली नाही. घुसखोरांना उघडपणे मतदार ओळखपत्रे आणि आधार कार्डांचे वाटप केले जात आहे.

हे डोळ्यासमोर घडत असताना मुख्यमंत्री मात्र शांत आहेत,’’ असे शहा म्हणाले. ‘‘राज्यात २०२६ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांच्या हत्या झाल्या होत्या, राज्यातील जनता आता हत्येचा बदला घेईल,’’ असे शहा यांनी सांगितले.

तुरूंगामध्ये असलेल्या तृणमूलच्या मंत्र्यांना निलंबित करण्यास ममता घाबरत आहे, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, शहा यांचे ‘सीएए’ संदर्भातील विधान हे केवळ प्रचारकी थाटाचे असून बंगालमध्ये ‘सीएए’ लागू होणार नाही, असे तृणमूलच्या वतीने सांगण्यात आले.

डावा कट्टरतावाद संपविला

केंद्रातील भाजपचे सरकार पश्‍चिम बंगालमधील लोकांसाठी मोठा निधी पाठवते पण तृणमूल काँग्रेसची सिंडिकेट हा निधी त्यांच्यापर्यंत पोचू देत नाही. असा आरोप शहा यांनी केला. पंतप्रधान मोदींनी अवघ्या देशातून दहशतवादाचे उच्चाटन केले असून जम्मू- काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम हटविण्याचे काम त्यांनीच केले आहे. देशातून डावा कट्टरतावाद संपुष्टात आल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT