ठाणे : पंढरपूर वारीमधील `अर्बन नक्षल्यां'च्या घुसखोरीवरून महाराष्ट्र विधिमंडळात चर्चा करण्यात येत आहे. या गंभीर विषयावर स्वतःला ‘पुरोगामी’ समजणाऱ्या राजकारण्यांनी कोल्हेकुई सुरू केली असल्याची टिका शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून विरोधी पक्षाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला आहे.