संपादकीय

ढिंग टांग : ‘नाट्य’मय निवड!

ब्रिटिश नंदी

‘व्हा घरच्या घरी डॉक्‍टर’ या सुप्रसिद्ध ग्रंथाचे वाचन व मनन करण्याचा संकल्प आम्ही नुकताच सोडला असताना शतकमहोत्सवी अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे वृत्त येऊन थडकले, हे आश्‍चर्यच. वास्तविक, आम्हाला नाट्य-कलावंत व्हावयाचे होते; पण माणसाने पोटापाण्यासाठी काहीही करावे, तरीही थोडेफार डॉक्‍टरही असावे, अशा मताचे आम्ही आहो! आमच्या ओळखीचे एक डॉक्‍टर किशोरकुमारची गाणी उत्तम गात! दुसरे एक महनीय शास्त्रीय गायक फावल्या वेळात मोटारीच्या खाली शिरून दुरुस्तीचा रियाज करीत!! आणखी एक महनीय डॉक्‍टर तर चक्‍क गिर्यारोहणात वाकबगार होते!! त्यामुळे साहजिकच आमचे परममित्र आणि फ्यामिली डॉक्‍टर जे की डॉ. जब्बार्जी पटेल यांची नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, हे ऐकून आमची तब्बेत एकदमच सुधारली! डॉक्‍टर जब्बार्जी सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ असले तरी ते नाटकासिनेमांत रमलेले. मुदलात त्यांच्यासारख्या हरहुन्नरी डॉक्‍टराने फुल्टाइम रंगकर्मी व्हावे का? हा प्रश्‍नच गैरलागू आहे. (गैरलागू!! आले ना लक्षात?) परंतु, नाट्य-कलावंत होण्याआधी माणसाने वैद्यकशास्त्राची पदवी घेणे आवश्‍यक आहे, अशा समजातून आम्ही ‘घरच्या घरी व्हा डॉक्‍टर’ हा ग्रंथ वाचायला घेतला होता. डॉ. जब्बार्जींच्या निवडीनंतर आम्ही तो (पुन्हा) बाजूला ठेवला आहे. असो. 

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या मंचावर औंदा कोणीतरी सेंचुरी ब्याट्‌समन आणण्याची कल्पना नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीला आधीच सुचली होती. डॉ. जब्बार्जींसारखा सेंच्युरी ब्याट्‌समन शोधूनदेखील सापडणार नाही, हे उघड आहे. त्यांचे नाव कार्यकारिणीने नियामक मंडळाला कळवले. तरीही डॉक्‍टर जब्बार्जींची निवड बिनविरोध; परंतु नाट्यमय झाली. डॉक्‍टरसाहेबांची निवड आधीच जाहीर झाली होती, त्यामुळे त्यांच्या निवडीत नाट्य नाही, असे आम्हाला(ही) वाटत होते. सस्पेन्स फुटला तर क्‍लायमॅक्‍सपर्यंत ऑडियन्स थिएटरात राहात नाही, हे (थिएटर) ॲकडमिक सत्य आहे. परंतु रसिकहो, हाडाच्या रंगकर्मीला ज्यातत्यात नाट्य दिसते व नसेल तर ज्यातत्यात नाट्य आणताही येते!!

अध्यक्षांची निवड वादळी होणे ही संहितेची मागणीच होती. प्रोटेगॉनिष्ट आणि अँण्टिगॉनिष्ट क्‍यारेक्‍टरांचा कानफ्लिक्‍ट इफेक्‍टिव नसेल तर अंतिमत: संपूर्ण नाट्यानुभवाचा क्‍लायमॅक्‍स साधणे डिफिकल्ट होते, हे नाट्यशास्त्राचे मूलभूत तत्त्व नाट्याचार्य भरतमुनी यांनीच फार्पूर्वीच नमूद करून ठेवले आहे. त्या तत्त्वानुसारच बिनविरोध निवड नाट्यमय झाली, हे योग्यच झाले. कुणाला पटेल, न पटेल, परंतु, डॉ. जब्बार्जी पटेल यांच्या बिनविरोध निवडीसमोर डॉ. मोहनजी जोशीबुवा यांचे आव्हान उभे होते. (खरे तर बसलेले होते.)  बिनविरोध निवडीच्या नाट्यासाठी दोन अर्ज येणे आवश्‍यक होते. (कानफ्लिक्‍ट!!) डॉ. मोहनजी यांनी ताबडतोब अर्ज करून टाकला. (अँटिगॉनिष्ट!) कुणाच्या ओपीडीत किती पेशंट हे मोजण्यात आले. (नाट्य!) डॉ. जब्बार्जी यांनी ‘घाशीराम कोतवाल’ या अजरामर नाटकात टायटल रोलपेक्षा नानासाहेब फडणवीसाला अधिक मोठा रोल दिल्याचा आरोपही या वेळी झाल्याचे कळते. (स्क्रिप्टची डिमांड!) परंतु, डॉ. जब्बार्जी यांची बिनविरोध निवड आधीच ठरली होती. (नाटककाराची मांडणी!) त्यामुळे या दुरंगी लढतीत त्यांचीच निवड झाली. (क्‍लायमॅक्‍स!) अखेर शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार्जी यांना द्यावे आणि पुढील वर्षी १०१ वे संमेलन स्पेशली डॉ. मोहनजींसाठीच घेण्यात यावे, असे ठरले म्हणे!! (ॲण्टि-क्‍लायमॅक्‍स!!)

‘‘मुख्यमंत्रिपदाच्या अडीच-अडीच वर्षांच्या फार्म्युल्यातून प्रेरणा मिळाल्याचे’’ नाटककाराने आम्हाला माटुंग्यातील यशवंत नाट्यसंकुलात (ब्याकस्टेजला) सांगितले. त्याचे मत चिंत्य होते. शेवटी बिनविरोध निवडीतही दुरंगी लढत होतेच आणि यातच सारे नाट्य सामावले आहे, यावर एकमत होऊन आम्ही (ब्याकस्टेजलाच) विडी शिलगावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT