Dhing Tang Sakal
संपादकीय

ढिंग टांग : चाकात अडकलेली प्लास्टिक पिशवी वगैरे!

मध्यरात्रीच्या काळोखात, गारठलेल्या निर्हेतुक सडकेवर, भरधाव जाताना, काहीतरी अडकले गाडीच्या फिरत्या चाकात.

ब्रिटिश नंदी

मध्यरात्रीच्या काळोखात, गारठलेल्या निर्हेतुक सडकेवर, भरधाव जाताना, काहीतरी अडकले गाडीच्या फिरत्या चाकात.

मध्यरात्रीच्या काळोखात,

गारठलेल्या निर्हेतुक सडकेवर

भरधाव जाताना, काहीतरी

अडकले गाडीच्या फिरत्या चाकात,

आणि व्यवस्थेला शिवी हासडत

न थांबता गेलो तसाच पुढे पुढे…

हल्ली हे पीडब्ल्यूडीवाले कुठेही…

अक्षरश: कुठेही रचतात

डोंगराएवढे स्पीडब्रेकर, शिवाय

खड्ड्यांना कुठे गणती आहे?

कुठे घालतात हे लेकाचे,

आम्हा करदात्यांचे पैसे, कुणास ठाऊक.

किंवा, असेल एखादे कुलुंगी कुत्र्याचे मढे,

ट्रकखाली येऊन चेंदामेंदा झालेले,

किंवा, एखादे आडवे जाणारे

काळे अपशकुनी मांजर, कुणास ठाऊक.

कुठे कुठे म्हणून बघायचे,

ड्रायविंग करताना माणसाने?

कुणास ठाऊक.

सो गया ये जहां, सो गया आसमां,

सो गई सारी मंजिले, ओऽ सारी मंजिले…

परंतु, खूबसूरत रात्री दिलचस्प गाणी गात,

विजेचे महिरपदार खांब मागे टाकत,

अब्रूदारपणे भरधाव सोडलेल्या

गाडीच्या चाकाशी धडकत होते,

काहीतरी सतत…नकोनकोसे.

जसे खुशबूदार बिर्याणीत लागावेत,

वारंवार खडे, आणि लझीझ खान्याचा

मझा व्हावा किरकिरा.

गाडीच्या खाली खरेच आले का काही?

की आपल्यालच झाला निव्वळ भास?

ना कुठले कुत्रे केकाटले,

ना कुठले मांजर किंचाळले,

ना ऐकू आला अस्फुट हुंदका,

ना कुणी धडपडले…

वैसे भी, बंद काचेच्या गाडीत

सगळेच आवाज जातात विरघळून,

जसा बर्फ पिघलतो मदभऱ्या

नाइण्टी एमेलच्या गिलासात.

तरीही-

धडकत, घसपटत, खरवडत,

तडफडत, तुटत, फुटत येत होते,

चाकासोबत काहीतरी नकोनकोसे,

पंक्चर तर नाही ना? असेही गेले वाटून

क्षणभर, पण नसावे!

आता मध्यरात्री पंक्चरवाला तरी

कुठे भेटणार? असे वाटून आणखी

आणखी दाबला अक्सिलरेटर,

चेवात येऊन दातोठ खात.

वाटले, असेल एखादी चुकार

(बंदी असलेली ) शंभर मायक्रॉनची

प्लास्टिकची पातळ पिशवी तर,

फाटून कटून पडून जाईल कुठेतरी.

तसेच घडले…

तस्सेच घडले, कारण-

भर रस्त्यात कुणीतरी टाकलेली,

किंवा स्वत:हून उडत आलेली

बंदी असलेली शंभर मायक्रॉनची

एक फडतूस प्लास्टिकची पिशवीच

अडकली होती आपसूक येऊन

मोटारीच्या चाकात, आणि

फाटत, फडफडत, चोळामोळा होत,

रुपांतरित होत गेली माणुसकीच्या चिंध्यांमध्ये.

हा अपघात? की सदोष पिशवीवध?

की सरळसरळ तीनशेदोनची केस?

च्यानलवाल्या ‘ब्रेकिंग न्यूज’चे

अजून एकमत झालेले नाही, आणि

पिशवीवर झाला का तंतोतंत

अनन्वित अत्याचार? हाही प्रश्न

अजूनही आहे अनुत्तरित.

तूर्त प्लास्टिकच्या पिशवीच्या

चोरट्या वापरावर सीरिअसली बंदी

आणलीच पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.

- शंभर मायक्रॉनची माणुसकीची पिशवी फाटून चिंध्या झाली, त्याची ही गोष्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: दोघेही 'क्लास वन' अधिकारी, स्पाय कॅमेरे लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ केले शूट; पुण्यात खळबळ

Matheran: माथेरानमध्ये टॅक्‍सीसेवा बंद, घाटमार्गावर पर्यटकांची पायपीट!

ENG vs IND, 4th Test: अंशुल कंबोजचं पदार्पण नक्की? कर्णधार गिलने स्पष्ट संकेतच दिले; रिषभ पंत खेळणार की नाही, हेही सांगितलं

Sanitation Workers Strike: सफाई कामगारांच्या आंदोलनाला यश, अखेर संप मागे!

Latest Maharashtra News Updates : घाटकोपरच्या जुन्या स्तंभावरुन नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT