National-Movie-Award
National-Movie-Award 
संपादकीय

मर्म : मराठीच्या यशाचा ‘भोंगा’!

सकाळ वृत्तसेवा

नुकत्याच जाहीर झालेल्या ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा डौलाने फडकता राहिला, ह्याचा आनंद होणे स्वाभाविकच आहे. पण मराठी कलावंतांचा राष्ट्रीय पातळीवरचा दबदबा, ही आता काही नवी बातमी राहिलेली नाही. किंबहुना, तो परिपाठच आहे की काय, असे सहर्ष वाटत राहावे, अशी परिस्थिती दिसते आहे. कमीत कमी बजेटमध्ये आशयघन मांडणी, उत्तम अभिनय आणि सकस कथावस्तू अशा गुणसमुच्चयासाठी मराठी चित्रपटांचे नाव राष्ट्रीय आणि क्‍वचित आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुकानेच घेतले जाते. यंदा शिवाजी लोटन पाटील निर्मित आणि दिग्दर्शित ‘भोंगा’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे सुवर्ण कमळ पटकावले.

गेल्या मे महिन्यात झालेल्या राज्य पुरस्कार सोहळ्यातही ‘भोंगा’ने बाजी मारली होती. शिवाजी लोटन पाटील यांनी २०१२ मध्ये ‘धग’सारखा अप्रतिम चित्रपट पेश करून राष्ट्रीय सन्मान मिळवला होता. ‘भोंगा’ची कथाच इतकी वेगळ्या पठडीतली आहे की त्याची ज्यूरी मंडळींना भुरळ पडली नसती, तरच नवल. नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाबाबतही तेच म्हणता येईल. कथासूत्र हे चित्रपटाचा आत्मा असते, हेच यातून अधोरेखित होते.

‘नाळ’मधल्या बालकलाकार श्रीनिवास पोकळे याने यंदा उत्त्कृष्ट बालकलाकारासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. या छोट्या कलावंताचे भविष्य उज्वल आहे, यात शंका नाही.

हिंदी पुरस्कारांवर नजर टाकली तर यंदाही राष्ट्रधर्माचे पारडे जड राहिल्याचे लक्षात येते. ‘उरी’ या जोशभऱ्या युद्धपटाचा नायक विकी कौशल आणि ‘अंधाधुन’ या चित्रपटातला अंध नायक आयुष्मान खुराना या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार संयुक्‍तपणे मिळाला. ‘अंधाधुन’ तर सर्वोत्कृष्ट चित्रपटही ठरला. वास्तविक हा चित्रपट ‘लाकॉर्दु’ या फ्रेंच लघुचित्रावर आधारित आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी त्याचा पूर्ण लांबीचा थ्रिलरपट केला. ‘अंधाधुन‘ हा एक नि:संशय चांगला चित्रपट आहे, परंतु राष्ट्रीय पुरस्कारांचे निकष अस्सलतेला प्राधान्य देणारे असावेत, असे वाटते. आयुष्मान खुराना या अभिनेत्याला ‘अंधाधुन’मधील व्यक्‍तिरेखेखातर पुरस्कार मिळाला. त्याचीच भूमिका असलेला ‘बधाई हो’ हा धमाल चित्रपट लोकप्रिय चित्रपटांच्या वर्गात सर्वोत्कृष्ट ठरला. संजय लीला भन्साळीच्या ‘पद्‌मावत’नेही दोन पुरस्कार कमावले. अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ सर्वोत्कृष्ट सामाजिकपट ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT