dhing tang
dhing tang 
संपादकीय

गोविंदा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

इस्पितळाच्या लांबलचक
कॉरिडॉरमध्ये सलाइनयुक्‍त
बिस्तऱ्याच्या रांगेत पडलेल्या
गोविंदाला झाली अस्फुट जाणीव...
रक्‍ताने साकळलेली पापणी उचलून
त्याने पाहिले क्षीणपणे की,
आपण एका अजस्र अजगराच्या
पोटात गिळंकृतावस्थेत
सरकतो आहोत पुढे पुढे पुढे...

स्वजड मस्तकातील ठणके
सोडून कुठल्याही जाणीवांची
दरकार नसलेल्या गोविंदाने
जाणीवनेणीवेच्या सरहद्दीवर
घेतले दोन-चार श्‍वास,
काळवंडलेल्या रुग्णाईत
प्रकाशातील चेहऱ्याचे सपशेल
अनोळखी कोन न्याहाळताना
एकदम थकवाच येऊन त्याने
मिटले डोळे अखेरचे...

आठव्या थरावरून नवव्याच्या
खांद्यावर पाय रोवतानाच
हलले होते गोविंदाचे प्राक्‍तन,
उलटापालटा होत, हेलपाटत
माणसांच्या उथळ आणि
खडकाळ गर्दीच्या सागरात
त्याचा देह कोसळला, आणि
झुंडतळाच्या धारदार कपारींनी
छिलून काढली त्याची सामाजिक त्वचा,
मोडल्या सांस्कृतिक बरगड्या,
आणि घातला एकच निर्णायक दणका
त्याच्या परंपरागत मणक्‍यात.
किंचित किलकिल्या कानांनी
गोविंदाने ऐकले भावनिक उद्‌गार :
‘‘गोविंदा, शूरवीर मर्दा, मंडळाच्या
टीशर्टाची शपथ! सारी आळी
तुझ्यासोबत उभी आहे ह्या क्षणाला,
आणि तरुणाईने केले आहे
तुझ्या मर्दानी साहसाला वंदन.
सलाम आहे तुझ्या खेळाडूवृत्तीला.
सांस्कृतिक मंत्र्यांनी केली आहे
उदार घोषणा तुझ्या उपचारखर्चाची.

‘‘आपल्या उदात्त, उन्नत अशा
परंपरेसाठी देह ठेवणाऱ्या
हे गोविंदा! तू अमर आहेस,
तू अमर आहेस...’’

इतक्‍यात-
मान हलवत डॉक्‍टराने दिली
ब्रेकिंग न्यूज, उडवत खांदे.
‘गोविंदा गेला रे...गोविंदा गेला रे!’

तेव्हा, मंडळाचे पदाधिकारी
चौकशी करत होते हंडीसोबत
लटकलेल्या बक्षिसाच्या रकमेची,
स्पीकरवाला गुंडाळत होता वायरी,
आणि महाकाय ध्वनीखोकी,
आयटेम साँगवाली सेलेब्रिटी नटी
सेक्रेटरीला विचारत होती की
‘‘हे काय चेक कुठाय?’’
आणि संयोजकांची सांस्कृतिक पाठ
थोपटून पुढाऱ्यांनी टाकला होता,
बुलेटप्रूफ ‘फॉर्च्युनर‘मध्ये पाय...
त्यांच्या डोक्‍यात चालला होता
कनवाळू परिवर्तनवादी हिशेब
‘‘ह्या हंडीत मते किती?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT