dhing tang
dhing tang 
संपादकीय

जन्मदिवस! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

कुण्या एका आटपाट नगराचा
आटपाट राजा काही वर्षांपूर्वी
आजच्या दिवशी, आजच्या प्रहरी
जन्मला होता म्हणून
आटपाट नगरातील नागरिकांनी
गुढ्या-तोरणे उभारली,
अंगण सारवले,
रांगोळ्या काढल्या,
गोडाधोडाचा सैपाक केला,
नवे कपडे घालून एकमेकांना
गळामिठी देत शुभेच्छा दिल्या,
खुद्द सम्राटालाही दीर्घायु
आणि आरोग्याची आशीर्वचने दिली,
‘असा सम्राट ज्या राज्याला मिळाला,
ते राज्यचि भाग्याचे...’ असे म्हटले.

चौका-चौकांत, तिठ्या-तिठ्यांवर
झळकली दिलखेचक होर्डिंगे,
रंगारंग कार्यक्रमांची झाली उधळण,
कुण्या सेवाभावी सज्जनांनी
आठवणीने केले रक्‍तदानही...
कुणी केशरयुक्‍त पेढ्यांचे केले वाटप,
कुणी वह्या वाटल्या, कुणी काही.

अवघे नगर जणू झाले,
एक अवाढव्य बहुमजली केक
ज्याच्या डोक्‍यावर शोभत होती
सम्राटरूपी लालबुंद चेरी!

आपल्या जन्मदिनाचे कवतिक
न्याहाळून पागल झालेल्या
सम्राटानेही मग केल्या
कल्याणकारी योजनांची बरसात.
म्हणाला, ‘सारे नगरवासीय, हे तर
माझे बंधू, भगिनी, माता वगैरे.
त्यांची काळजी मलाच वगैरे.
त्यांच्या कल्याणासाठीच आहे
माझा जन्मबिन्म वगैरे.
एवढे झाले, दुसरा दिवस उजाडला,
सारे काही थंड झाले, तेव्हा-
सम्राटाने बोलावून घेतले
आपल्या चतुर प्रधानजीस,
ज्याच्या मिश्‍यांना होते गाईचे तूप.
बुद्धी होती खंजिराप्रमाणे तीक्ष्ण,
आणि पकड होती घट्ट.
सम्राट म्हणाला, ‘‘प्रधान्या,
लोक हल्ली फार झाले आहेत
लुच्चे आणि खोटारडे!
लाख दंडवत काय, शुभेच्छा काय,
दीर्घायुष्य देण्याच्या बाता काय...
प्रजा फार खोटे कवतिक करते,
असे नाही वाटत?’’

त्यावर किंचित मौन बाळगून
नंतर अभय याचना करून
प्रधानजी म्हणाले,
‘‘हे आपल्या त्या..त्या..त्या...
कल्याणकारी घोषणांसारखेच!
देणं नास्ति, घेणं नास्ति!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT