dhing tang
dhing tang 
संपादकीय

‘मी-पण’ ज्यांचे सरले हो..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

तसे पाहू गेल्यास आम्ही मनाने भलतेच हळवे आहो!! कोणतीही व्यक्‍ती-विशेषत: स्त्री- संकटात सांपडली की आमचे मन कासावीस होते. महिलांच्या डोळ्यांतील अश्रू आम्हाला अगदी पाहावत नाहीत. तिच्या सांत्वनासाठी आमचे हात शिवशिवतात. ‘उगी उगी रडू नकोस...सारे काही नीट होईल बरे’, असे सांगण्यासाठी आम्ही फार्फार आतुर होतो. परंतु हाय! आमच्या ह्या संवेदनशील स्वभावाचा जनलोक गैरअर्थ काढू लागले आहेत. कलियुगात चांगुलपणाला काही किंमत उरली नाही, हेच खरे.
हल्ली ‘मीटू’पणाची साथ आली असून, तिची बोळवण कशी करावी, ह्याची चिंता आम्हाला लागली आहे. आपण कुणावर प्रेम करावे तर दहा वर्षांनी त्या सुंदर भावनेचे रूपांतर अत्याचार अथवा शोषणाच्या हिणकस भावनेत झालेले दृष्टीस पडू लागले आहे. हे म्हंजे सुंदरशा फुलपाखराचे सुरवंटात रूपांतर होण्यासारखेच नाही का? मीटूपणाच्या साथीमुळे जागोजाग सुरवंटांचा सुळसुळाट दिसू लागला असून, त्यातील एक सुरवंट आम्हीही आहोत, ह्या जाणिवेने आमच्या अंगास खाज सुटली आहे...असो.  

गेले काही दिवस घराच्या बाहेर पडलेलो नाही. घराच्या बाहेर काय, घराच्या पुढल्या खोलीतदेखील गेलेलो नाही. पुढल्या खोलीत काय, आंघोळीलासुद्धा गेलेलो नाही. आंघोळीला काय... जाऊ दे. एक अंधारा कोपरा पकडून बसलो आहे. मी टू क्‍यांपेनमुळे आमचे असे झाले आहे. आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो आहो.
तूर्त आमच्या पडलेल्या खांद्यांवर जाऊ नका. कोणे एकेकाळी आम्ही भलतेच तरणेबांड आणि रुबाबदार होतो. जगातील सर्व नवयौवना आपल्यासाठीच झुरून ऱ्हायल्या आहेत, ह्या जाणिवेने आमचे मन मोरपिसाऱ्यासारखे फुलून येत असे. परंतु एक दिवस-
आमच्या चाळीतील कु. बेबीनंदा ईच्यावर आमचे मन गेले. चाळीच्या सज्जात कपडे वाळत घालण्याच्या मिषाने येणाऱ्या कु. बेबीनंदा ईच्या दर्शनासाठी आम्ही सकाळी लौकर उठून कार्यास लागत असू. अखेर मनाचा हिय्या करून आम्ही तीस-
अकेले हम ही नहीं शामिल इस जुर्म में
नजरें जब मिली, मुस्कुराये तुम भी थे


...असा दिलबहार शायरीचा वानोळा चिठ्ठीद्वारे पाठवला. त्या दिशी आम्ही वर्तमानपत्रातील आमच्या राशिभविष्यात लिहिलेल्या ‘अडचणीत याल’ ह्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले होते. कारण चिठ्ठी कु. बेबीनंदा ईच्या थोरल्या भावाच्या ऊर्फ एका सात वर्षे वयाच्या मस्तवाल सांडाच्या हातात पडली. पुढील प्रसंग सांगण्यात हशील नाही. त्यानंतर सहा महिन्यांनी आम्ही एका अपंगचलित पीसीओ केंद्रावर बसू लागलो एवढे सांगितले तरी पुरेसे ठरेल. आमच्या आळीत आम्हाला मजनू असे नाव पडले. इतके की फोन करावयाच्या आधी तरुणीदेखील ‘मजनू, तुज्याकडं सुट्टे हाहेत णा? मी सुट्टेच विसरली!’’ असे लाडाकोडात म्हणत आणि आम्ही दिलेल्या सुट्ट्या नाण्यांचा विनियोग करून आपापल्या प्रेमपात्रांना फोन करत. जाऊ दे. महिने गेले, वर्षे गेली, दशके लोटली...

यथावकाश आम्ही मोठे झालो. तरीही वाघ्याचा झाला पाग्या, तरी तयाचा येळकोट जाईना, ह्या उक्‍तीनुसारच आमची वाटचाल राहिली. महिलांना उत्तेजन देणे, महिला सहकाऱ्यांशी खेळीमेळीने वागणे, हे कधीही चुकले नाही. जित्याची खोड ती...जाणार कशी? पण ही जालीम दुनिया चांगल्याला चांगले म्हणणारी नाहीच, ह्याचा प्रत्यय आम्हाला येत आहे. घडले एवढेच की-
परवाचे दिशी कु. बेबीनंदा ईने ट्‌विटरवर बालपणीचा तो समर प्रसंग तसाच्या तस्सा सांगून टाकला आणि आमचा पुन्हा एकवार बोऱ्या वाजला!!
अकेले हम ही नहीं शामिल इस जुर्म में
नजरें जब मिली, मुस्कुराये तुम भी थे

...हा शेर आम्ही हल्ली मनातल्या मनातदेखील गुणगुणण्याचे बंद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT