dhing tang
dhing tang 
संपादकीय

करेक्‍ट आंकडा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

नमोजीभाई : (चिंतातूर अवस्थेत) जे श्री क्रष्ण! हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे!!
मोटाभाई : (खांदे उडवत) शुं थयुं?
नमोजीभाई : (आवाज खाली आणत) केम छो मोटाभाई? सब ठीक तो छे?
मोटाभाई : बद्धा ठीक तो छे! इलेक्‍सननी तयारी मां छुं!!
नमोजीभाई : (हताश होत्साते) इलेक्‍सन सोडून दुसरा काय गमते नाय के तुम्हाला?
मोटाभाई : (अभिमानाने) इलेक्‍सन छे, तो आ मोटाभाई छे! आवती चूंटणी मां आपडी पार्टी त्रणसो नी उप्पर सीट निकाळीश! चोक्‍कस!! टू फिफ्टी तो कहीं नई जाय!!
नमोजीभाई : (दचकून) टू फिफ्टी? ओ भगवान!!...
मोटाभाई : (वरमून) सोरी सोरी...पण काय झ्याला?
नमोजीभाई : (येरझारा घालत स्वत:शीच) गडबड तो थई गई...हवे शुं करवानुं? कछु ट्रबल सूटिंग करवु पडशे...
मोटाभाई : (गोंधळून) कसला सूटिंग?
नमोजीभाई : (खुलासा) ट्रबल सूटिंग!..एअर स्ट्राइकमधी २५० आतंकवादी ढेर झाला, असा तुम्ही कशाला म्हणते?
मोटाभाई : (ठामपणाने) तो पछी? २५०च मऱ्या ने?
नमोजीभाई : (कपाळाला हात लावत) २५० नां आंकडा कशाला सांगते?
मोटाभाई : टू फिफ्टी इज ऑलवेज अ गुड नंबर!!
नमोजीभाई : (त्रासून) अडीचशे आतंकवादीचा खात्मा झाला, असा तुम्हाला कोणी सांगितला?
मोटाभाई: (अचंब्याने) सांगायला कशाला पाहिजे? मने खबर छे ने...
नमोजीभाई : (डोळे बारीक करत) तमे कोणे आपी आ खबर? मने बतावो तो!!
मोटाभाई : (डोळे मिटून) हमारे आदमी चारो तरफ फैले हुए है... हम उडते पंछी के पर भी गिन सकते है, तो आतंकवादी क्‍या चीज है?
नमोजीभाई : (चक्रावून)च..च...टू फिफ्टीच्या आकडा कुठून आला?
मोटाभाई : (डोळे मिटलेले) च्यांगला हाय के नाय?
नमोजीभाई : (खोदून खोदून विचारत)...तीनसो ओगणीस किंवा एकसो उनसठ का नाही?
मोटाभाई : (मंद स्मित करत) राऊंड फिगर चांगला वाटते! एटले टू फिफ्टी!! प्लीज डोण्ट क्‍वेश्‍चन माय नंबर मॅजिक!! माझी फिगर एकदम करेक्‍ट येते! मागल्या टायमाला यूपीमधी मी करेक्‍ट फिगर दिली होती!! याद छे ने?
नमोजीभाई : (हात चोळत) तुमच्या टू फिफ्टी फिगरमुळे अपोझिशनवाळानां माथा घुमी गयो छे!! जो आवे छे, मने पूछे छे, केटला मरा? एने शुं जबाब दूं... मारा कप्पाळ?
मोटाभाई : (जमेल तितक्‍या निरागस सुरात) तमारो आंकडो शुं कहे छे?
नमोजीभाई : (वैतागून) तुम्ही मला जबाब मांगते? तुम्ही कोंग्रेसवाला हाय के कमळवाला?
मोटाभाई : (मखलाशी करत) तुम्हाला बिरबलची स्टोरी खबर हाय के? एक वखत अकबर बादशाहने बिरबलाला विच्यारला, आपल्या राज्यामंदी किती कागडा छे, मने बतावो! ...कागडा माने कौव्वा... बिरबलने जबाब आप्या ‘‘त्रण लाख, छप्पन हज्जार एकसो ओगणीस’’! बादशाह म्हणाला, ‘‘कशावरून! पुरावो आपो!!’’ तो बिरबलने कह्यु, ‘‘खाविंद, मारा आंकडा करेक्‍ट छे, एने उप्पर कागडा असेल, तर गेस्ट म्हणून आपल्याकडे आला असेल, अने कमती असेल तर आपल्या राज्यातले कागडा बिज्या राज्यात गेस्ट म्हणून गेला असेल!’’ कछु सांभळ्यो? तो बतावो, आ स्टोरीना तात्पर्य शुं छे?
नमोजीभाई : (खोल आवाजात) तात्पर्य एमज के तमारा टू फिफ्टीना आंकडा करेक्‍ट छे!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Latest Marathi News Live Update: आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना जामीन मंजूर

Guinness World Records' : पंडित धायगुडेंनी दुसऱ्यांदा रचले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ ; पोटावरून २७६ किलोंच्‍या १२१ दुचाकी ३७६ वेळा चालवत नेल्‍या

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT