DhingTang
DhingTang 
संपादकीय

चांदनी..! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी

अनेक युगांपूर्वी कुणीतरी 
ओळख करून दिली होती : 
"ही आमची आयरिन...'' 
तेव्हापासून पाहात होतो तुला, 
तुझे अपरे नाक, शिष्ठ अधर. 
झिपरे बाल, बोलकी नजर. 
...फार गाठीभेटी नाही झाल्या, पण 
"सोलवा सावन'मधल्या अंतिमक्षणी 
रेल्वे स्टेशनात वाट पाहात उभी 
असलेली मेहना दिसली होती 
एकदा ओझरती, तेव्हा वाटले होते : 
ही आयरिन तर नव्हे?...आयरिनच. 

नंतर कित्येक पाहिल्या तुझ्या 
दिलफेक अदा, दक्षिणी डोळ्यांचे विभ्रम, 
सुवृत्त अंगांची प्रत्यंगनृत्ये. 
हजारो नक्षीदार गाडगी-मडक्‍यांच्या 
पांढऱ्याशुभ्र बुटांनिशी 
नृत्यसदृश कवायती करणाऱ्या 
चटखोर मठ्‌ठ नायकांसमवेत 
तुझे थाटलेले सुडौल संसार... 
हे पाहात उलटून गेले प्रहर. 
त्या हरेक प्रहराला होती, 
तुझी "ताकी'नृत्यांची लय. 
तुझे अठरा अक्षौहिणी सौंदर्य 
पाहात कित्येक पिढ्यांचे उडाले पुर्जे, 
नामुष्कीच्या कालखंडातील 
पाणवठा होतीस तू... 
आणि अचानक एकेदिवशी- 
गदगदून आले अज्ञातातून 
तुझ्या डोळ्यातले नन्हेमुन्हे स्वप्न... 
निरागस काजळारेखेसारखे. 
रेशमाहून रेशमी असलेल्या 
तुझ्या अकाली बालपणाला 
ऐकू आली का खरेच 
रांगड्या पुरुषाची आर्त अंगाई? 
नसेल, कारण 
तुझे नन्हेसे बोट मुठीतून सुटलेच, 
आणि निघून गेलीस पुन्हा 
अपरे नाक वर उचलून जमेल तितके. 

पुन्हा एकदा आलीस तेव्हा, 
बदलल्या होत्या तुझ्या लकबी, 
स्वभाव-विभाव...वगैरे. 
पिवळ्यारंजन साडीत 
मंद स्मिताच्या परीटघडीत 
शुभ्र बिंदी आणि कंकणांच्या 
सहवासाचे अत्तर शिंपडत. 
आलीस, आणि घमघमलीस 
उत्तररात्रीच्या रातराणीसारखी 
किंवा- 
एकांड्या तलावात झिरझिरणाऱ्या 
शरदाच्या चांदनीसारखी. 

ऐ चांदनी, ऐकले ते खरे का? 
कालच म्हणे तुझ्या दर्जीशी 
झडली तुझी जंग... 
काल शिवलेली चोळी 
म्हणे आज झाली तंग? 
दर्जीची ह्यात काय गलती, चांदनी? 
पौर्णिमेच्या रात्री असे भास होणारच ना? 

आठवते अजूनही- 
तुझ्या हातात किणकिणणाऱ्या 
नौ नौ चूडियांची मजबूरी 
समजून घेताना उलगडले होते 
पिढ्यान्‌पिढ्यांचे पौगंड, 
घायाळ झाला होता साराच दोआब. 
तुझा बदललेला ऋतु पाहून 
सुरवंटांनीही बदलले आपापले स्वेटर 
...थेट ऋषि कपूरच्या थाटात. 

तू चांदनी आहेस की रेशमी? 
की आयरिन? 
चालबाज की हवाहवाई? 
...की उरलीस नुसतीच एक मॉम? 
जिचे इंग्लिश-विंग्लिश अपरे नाक 
खरे की खोटे? ह्या राष्ट्रीय समस्येत 
सारा जहान गढलेला असतानाच 
अचानक ध्यानी आले की- 
अब की बार चांद तो कई निकलेंगे 
चांदनी नहीं होगी. 
चांदनी नहीं होगी... 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT