maoists
maoists 
संपादकीय

हवे सडेतोड उत्तर

सकाळवृत्तसेवा

सुरजागड प्रकल्प (ता. एटापल्ली) परिसरात लॉयड मेटल कंपनीची वाहने भस्मसात केल्यानंतर जवळपास वर्षभर शांत राहिलेल्या नक्षलवाद्यांनी आठवडाभरापासून हिंसासत्र सुरू केले आहे. ठिकठिकाणी नागरिकांच्या हत्या करण्यासह पोलिसांनाही ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

वर्षभरानंतर नक्षलवाद्यांनी नुसतेच डोके वर काढले नसून, जखमी नागाप्रमाणे फणा काढून विषारी फुत्कार आणि दंश करणे सुरू केले आहे. त्याचा प्रारंभ झाला नोव्हेंबरमध्येच. लाहेरी (ता. भामरागड) येथे मुरा परसा यांच्या घराच्या खिडकीतून नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यात त्यांची पत्नी जखमी झाली. छत्तीसगड सीमेलगत झाडपापडा (ता. धानोरा) गावातील कोंबडबाजारात सुनील तिलकबापू पवार याची हत्या केली. याच तालुक्‍यातील तोडे येथील सुरेश चिनू तोफा याचे अपहरण करून हत्या केली. कोटगुल (ता. कोरची) येथे बॉंबस्फोट घडवला. त्यात सुरेश गावडे हा पोलिस जवान हुतात्मा झाला. कुरखेडा उपविभागाअंतर्गत पाडियालमेटा जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचा मंजुनाथ जक्कनवर हा जवान हुतात्मा झाला. झारेवाड्यात (ता. एटापल्ली) मनोज राजू नरोटे या युवकाची हत्या केली. महिनाभरात नक्षलवाद्यांनी केलेल्या कारवाया वर्षभराच्या शांततेची कसर काढणाऱ्या ठरल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी थेट अबुझमाड हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्लाच सर केला. त्यामुळे नक्षलवादी नावालाही उरणार नाहीत, असे वातावरण होते. गडचिरोलीतील हे शांततापर्व अल्पकालीन ठरले. आता नक्षलवादी त्वेषाने सक्रिय झाले असावेत. या कारवायांना डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (पीएलजीए) सप्ताहाची पार्श्वभूमी आहे. "पीएलजीए' ही गनिमी काव्याने लढणारी नक्षलवाद्यांची अतिशय हिंसक आणि क्रूर आघाडी आहे. तिचा वर्धापन दिन रक्ताची होळी खेळून साजरा करण्याचा नक्षलवाद्यांचा मनसुबा आहे.

मागील काही वर्षांत पोलिस नक्षलवाद्यांना वरचढ होताना दिसताहेत. सततच्या पिछेहाटीने त्रस्त नक्षलवाद्यांनी "मरायचेच तर मारून मरू', अशा इराद्याने कारवाया सुरू केल्या असाव्यात. खोलीत कोंडलेले मांजर जसे दिसेल त्याला ओरबाडत सुटते, तसा हा प्रकार असू शकतो; किंवा दीर्घ विश्रांतीनंतर पूर्ण तयारीनिशी नक्षलवादी सक्रिय झालेले असावेत. काहीही झाले तरी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अत्यंत सतर्क आणि सक्रिय होण्याची गरज आहे. रात्र वैऱ्याची आहे, हे ध्यानात ठेवून नक्षलवाद्यांच्या कोणत्याही हल्ल्याला परतवून लावण्यास सज्ज राहिले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT