Pune News Editorial Pune Mudra Tai bamane
Pune News Editorial Pune Mudra Tai bamane  
संपादकीय

वेग आणि लयीचा संगम

नरेश शेळके

"सावरपाडा एक्‍स्प्रेस' कविता राऊतने एक काळ गाजविल्यानंतर संजीवनी जाधव भारतीय ऍथलेटिक्‍सच्या व्यासपीठावर दाखल झाली. आज ती आपल्या कामगिरीने ठसा उमटवित असतानाच आणखी एक नाशिककर ताई बामणे हिच्याकडे भविष्यातील चेहरा म्हणून पाहिले जात आहे. कविताचा वेग आणि संजीवनीची लय असे मिश्रण म्हणजे ताई, असे म्हटले जाते.

मध्यम आणि लांब पल्ल्याच्या शर्यतीसाठी आवश्‍यक असलेली शरीरयष्टी ताईकडे आहे. जणूकाही एका साच्यामध्ये टाकून तिची शरीरयष्टी घडविण्यात आली असेच वाटते. ताई सध्या जमैका येथे प्रशिक्षणासाठी आहे. तिच्या कामगिरीचा असाच वेग राहिला तर केवळ 17 व्या वर्षी म्हणजे दोन वर्षांनंतर ती टोकियो ऑलिंपिकमध्ये धावताना दिसली तर नवल वाटायला नको. 

तिचा आतापर्यंतचा प्रवास एखाद्या कथेप्रमाणे आहे. सध्या सर्वोत्तम असणारे मार्गदर्शक विजेंदर सिंग हे दरवर्षी कविता राऊत यांच्या वाढदिवसाला नाशिकच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी गावांत 2-3 किलोमीटर शर्यतीचे आयोजन करतात. चार वर्षांपूर्वी नाशिकपासून 64 किलोमीटर अंतरावर हर्सूलजवळ असलेल्या दलपतपूर येथे आयोजित केलेल्या अशाच एका शर्यतीत हा ताई नावाचा हिरा सापडला. या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम सध्या विजेंदर सिंग करीत आहेत. राष्ट्रीय पातळीवर सहाशे, चारशे आणि आठशे मीटर शर्यतीत हा हिरा चकाकत असला तरी अजून त्यास खरी चमक आलेली नाही, असे विजेंदर यांचेच म्हणणे आहे.

चारशे मीटरमध्ये तिने यंदा दिलेली 57 सेकंदांची वेळ नोंदविण्यास वरिष्ठ धावपटूला दम लागतो. यावरून तिच्या क्षमतेची चुणूक दिसून येते. भविष्यात ती याच इव्हेंटमध्ये सहभागी होईल, हे निश्‍चित नाही. कारण, कविता व संजीवनीप्रमाणे तीसुद्धा लांब पल्ल्याच्या शर्यतीकडे वळेल, हे गेल्या काही महिन्यांतील घडामोडीवरून दिसून येते. 

गेल्या महिन्यात गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रॉस कंट्रीत तिने दोन किलोमीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले, हे त्याचेच संकेत आहेत. आता लांब पल्ल्याच्या शर्यतीकडे वळताना तिला किती वर्षे लागतात, हे तिच्या येत्या एक-दोन वर्षांतील कामगिरीवर अवलंबून आहे. हिऱ्याला पैलू पडत आहेत, चकाकी येऊ लागली आहे. आता गरज आहे ती, योग्य आणि काळजीपूर्वक सांभाळण्याची. ताई नावाचा हा हिरा भारतीय ऍथलेटिक्‍समधील भविष्यातील चेहरा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT