संपादकीय

उदात्त स्वर ! (श्रद्धांजली)

रजनीश जोशी

गायनाच्या मैफलीतलं एखादं वाद्य बाजूला येऊन स्वतंत्रपणे गायला लागलं तर काय होईल, या कल्पनेचं प्रत्यंतर म्हणजे पं. डी. के. दातार यांचं व्हायोलिन वादन ! त्यांनी छेडलेल्या सुरांनी रसिकांचं अंतःकरण उचंबळून येत असे. त्यांचं स्वतंत्र व्हायोलिन वादन उदात्त सुस्वराचा अनुभव देणारं असे. अष्टौप्रहर व्हायोलिन वादन आणि त्याचा विचार, हेच त्यांचं जणू सर्वस्व होतं. नवरसातील कोणत्याही रसाचं दर्शन घडवताना डी. के. दातार प्रेमरसातच बुडून गेले आहेत, असं त्यांच्या मैफलीतलं दृश्‍य असे.

खरं तर ध्वनिपेटिकेवरील धातूच्या चार तारांचा हा खेळ. दामोदर केशवराव तथा डी. के. दातारांनी तो इतका विलक्षण रंगवला, की त्यातून त्यांचा स्वराभ्यास दिसला. रोजच्या रियाजामधून त्यांनी अभिजात व्हायोलिन वादनाची स्वतंत्र जातकुळी निर्माण केली. जुन्या शैलीतून ते वादन मुक्त केलं, त्याला नवा अवकाश दिला. हिंदुस्तानी संगीताच्या परंपरेत ते नजाकतीनं बद्ध केलं. स्वतःच्या प्रतिभेबरोबरच या वाद्याची ताकद दाखवून दिली; अर्थात त्यात कोणताही अभिनिवेश नव्हता, विक्रमाची असोशी नव्हती. त्यात होता फक्त रियाज आणि वाद्यावरची भक्ती. बासरी, सनई किंवा सारंगी गायकीच्या अंगाने जातात. व्हायोलिनदेखील तसेच. दातारांनी त्यावर रागांची मांडणी केली. नवरस ओतले. व्हायोलिन एकाचवेळी रसिकाला चैतन्याच्या शिखरावर नेतं आणि हृदयाच्या कोपऱ्यात हवीहवीशी कळ निर्माण करतं.

चार्ली चॅप्लिन यांच्या सर्वच चित्रपटांमध्ये त्याचा अद्‌भुत वापर केल्याचं आढळतं. असंच वेगळेपण डी. के. दातारांनी आपल्या अनवट शैलीतून दाखवलं. दातारांचं एकूणच वागणं शिस्तबद्ध होतं. त्यात गांभीर्य होतं आणि मिश्‍किल छटाही होती. व्हायोलिनबरोबरच क्रिकेट आणि कॅरमवरही त्यांचं प्रेम होतं. वादनासाठी बैठक भक्कम व्हावी म्हणून ते व्यायाम करीत. योगासने करीत. गायकाच्या घराण्यातच जन्माला आल्यानं संगीत त्यांच्या रक्तातच होतं.

बालपणी त्यांनी गायनाचा रियाजही केला होता. पं. कुमार गंधर्वांपासून अनेक बडे गायक त्यांचे सखेसांगाती. कुमारजी गायनामध्ये नवनवे प्रयोग करीत, तर दातार वादनामध्ये. त्यामुळे दातारांच्या वादनानं सुंदर सुरांगनांचा लयबद्ध पदरव सुरू असल्याचा भास होई. श्रोत्यांवर त्याची भूल पडल्याशिवाय राहत नसे. पाश्‍चात्त्य देशातून भारतात उगवलेल्या व्हायोलिनला दातारांनी स्वराकाशात स्वतःच्या ताकदीवर विहरत ठेवलं. ते आपल्यात नसले तरी त्यांचा तो उदात्त सुस्वर दीर्घकाळ कानामनांत गुंजत राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT