Dr Ajit Javkar Sakal
संपादकीय

‘एआय’चा फायदा कृषीआधारीत अर्थव्यवस्थांना!

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाचे संचालक डॉ. अजित जावकर यांच्याशी ‘सकाळ’च्या संपादकीय विभागाने साधलेला संवाद...

सम्राट कदम

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाचे संचालक डॉ. अजित जावकर यांच्याशी ‘सकाळ’च्या संपादकीय विभागाने साधलेला संवाद...

कृत्रिम बुद्धिमत्तेतून (एआय) निर्माण होणाऱ्या सेवा व सुविधांचा थेट लाभार्थी सर्वसामान्य व्यक्ती आहे. त्याचा फायदा कृषीआधारित अर्थव्यवस्थांना अधिक प्रमाणात होणार आहे. ‘एआय’ आधारित तंत्रज्ञान आता मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्राचा ताबा घेत आहे. यासंदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाचे संचालक डॉ. अजित जावकर यांच्याशी ‘सकाळ’च्या संपादकीय विभागाने साधलेला संवाद...

प्रश्न - कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही विज्ञान कथेसारखी वाटते, हे कितपत सत्यात उतरणार आहे. यामुळे रोजगाराच्या संधी कमी होतील का?

डॉ. जावकर - माध्यमांच्या सनसनाटीकरणामुळे वास्तव हरवले जात आहे. त्यामुळेच ‘एआय'' कपोकल्पीत असल्यासारखे वाटत असावे. एआयचे दोन प्रकार आहे. एक मर्यादित कृत्रिम बुद्धीमत्ता (नॅरो एआय) आणि दुसरी सर्वसामान्य ‘एआय'' (जनरलाईज्ड एआय). या दोन्ही गोष्टी एकच समजल्यामुळे ‘एआय''ला विज्ञानकथा समजण्याची गल्लत होऊ शकते. एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी सध्या वापरात येणार ‘एआय'' हा मर्यादित एआयचा प्रकार आहे. ज्यामध्ये माहितीच्या आधारे एक अल्गॉरिदम तयार केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या रुग्णालयाने मागील १० वर्षातील रुग्णांचे एक्स-रे गोळा केले. त्या आधारे निदान करण्यासाठी एक माहिती आधारित प्रणाली विकसित केली. तर रेडीओलॉजीस्टचे काम थोडे कमी होईल. एक्सरे नमुना हातात येण्याच्या आतच त्याच्या विश्लेषणासंबंधीची ८० टक्के माहिती मिळेल. याचा अर्थ रेडिओलॉजीस्टला कमी वेळात जास्तीत जास्त एक्स-रेंची पडताळणी करता येईल. यामुळे रेडीओलॉजीस्टची नोकरी जाणार नाही. सध्या वापरात असलेला मर्यादित एआय हा प्राथमिक स्तरावरील विश्लेषणाची कामे करत आहे.

प्रश्न - ‘एआय’ मोठ्या बदलांची किंवा घटनांची पूर्वसूचना देऊ शकते का?

- कोणत्याही मोठ्या घटनेच्या आधी, त्याची पूर्वकल्पना देणाऱ्या छोट्याछोट्या घटना घडतात. ज्याला आपण सुक्ष्म (वीक सिग्नल) संकेत म्हणतो. सातत्याने बदलणाऱ्या माहितीच्या प्रचंड ढिगाऱ्यातूनही असे महत्त्वपूर्ण संकेत पकडण्याचे काम ‘एआय'' करू शकते. हे काम माणसांना अशक्य आहे. एआयसाठी योग्य माहितीचे संकलन आणि त्यावर प्रक्रिया करणाऱ्या अल्गॉरीदमच्या अचूकतेची गरज आहे. मोठे परिणाम करणाऱ्या घटनांसाठी किंवा प्रकल्पांसाठीही अशा सुक्ष्म संकेतांची नोंद घेता आली पाहिजे. गुगलवरील पेज रॅंकींग ही वापरकर्त्याने किती वेळा त्यावर क्लिक केले आहे, यावर ठरते. त्यासाठी एक अल्गॉरीदम निश्चित केलेला आहे. अनुभवातून शिकत माहितीवर प्रक्रिया करणारा अल्गॉरिदम गरजेचा आहे.

प्रश्न - ‘एआय’ला फसवता येते का किंवा गैरकामासाठी वापर होतो का?

- हो निश्चितच, ही मोठी समस्या आहे. काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने चॅटबॉट लॉंच केला होता. ‘एआय'' आधारीत या प्रणालीला लोकांनी वाईट व गलिच्छ सूचना केल्या किंवा काही असभ्य गोष्टीही बोलल्या. पर्यायाने मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वतःचे संचालन करणारा चॅटबॉट वाईट गोष्टी पण बोलू लागला. अशा प्रकारे एआयची कार्यप्रणाली अनुचित कार्यही करू शकते. स्वयंचलित वाहनासंबंधीही अशाच काही समस्या आहे. या वाहनाचा ‘एआय'' चालकाच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीतून होतो. तसेच, त्याला मिळालेल्या सूचना आणि माहितीचीच गडबड असेल तर कायदेशीर समस्या वाढतील. चुकीची माहिती भरल्यामुळे त्या वाहनाने विशिष्ट व्यक्तीला उडविले तर अशा समस्या नक्कीच आहे.

प्रश्न - विकसनशील देशांसाठी एआय किती उपयोगाचा आहे. कृषीआधारीत अर्थव्यवस्थांना कसा फायदा होईल?

- ‘एआय’ची इमारत माहितीच्या स्रोतावर उभी आहे. अन् माहिती सर्वच देशांत सारख्या प्रमाणात असते. फक्त तिचे वैशिष्ट्ये बदलतात. उदाहरणार्थ, अमेरिकेतील शेतकऱ्याची जमीन, कामाची पद्धत ही भारतीय शेतकऱ्यांपेक्षा भिन्न आहे. म्हणून दोघांच्याही समस्यांचे स्वरूप वेगळे आहे. यासाठीच आम्ही बारामतीची एआय आधारित प्रयोगांसाठी निवड केली आहे. आपल्याकडे समस्या मांडण्यासाठी योग्य व अचूक डेटा असेल, तर त्याचा उपाययोजनांसाठी सहज वापर करता येतो. चीन या बाबतीत सध्या आघाडीवर आहे. भारतातही असे काही करण्याचा आमचा मानस होता. इंग्लंडमध्ये ‘सकाळ’चे अध्यक्ष आणि ‘सीओईपी’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची भेट झाली. आमच्या चर्चेतून कृषी आणि हवामान बदलावर काम करण्याचे निश्चित झाले. ५० वर्षाचा अनुभव असलेली बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टसाठी योग्य होती. कानात हेडफोन घालून झाडाकडे पाहिल्यावर त्याला पुढील काही दिवसात येणाऱ्या आजारपणासंबंधी कळाले तर, अशा ‘एआय’ आधारित भन्नाट प्रकल्पांवर काम चालू आहे. निश्चितच यासाठी एक संपूर्ण परिसंस्थेची गरज आहे. त्यासाठी विविध स्तरावरील तज्ज्ञांशी आम्ही संपर्कात आहोत.

प्रश्न - ‘एआय’मध्ये भारत कुठे आहे?

- निश्चितच भारताचे ठळक अस्तित्व आहे. एआयशी निगडित कॅगल कॉम्पिटिशन नावाची एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरते. आजवर तिथे चीन, रशियाचे वर्चस्व होते. पण गेल्या काही वर्षांपासून भारतातील संघ ग्रॅंड मास्टर ठरत आहे. एआयमुळे भारतातील विविध क्षेत्रात आणि विविध ठिकाणीच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

पुण्यापुरते बोलायचे ठरले तर वाहन, आरोग्य आणि संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाशी निगडित एआय मोठ्या प्रमाणावर विकसित होईल. ‘आयआयटी’सारख्या संस्थाही एआयच्या संशोधनात अग्रेसर आहे. यासाठी प्रत्येकवेळी अभ्यासक्रमाची गरज नाही. याचा अभ्यासक्रम रोज बदलत असतो. गरज आहे दृष्टिकोन आणि त्या आधारित कौशल्यांची.

प्रश्न - तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलांना तुम्ही काय सांगाल?

- तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्यांनी कोडिंग किंवा इतर नवे प्रयोग करायला हवेत. आव्हानात्मक समस्या घेत अभ्यास केला पाहिजे. अनेक चांगले अभ्यासक्रम निःशुल्क उपलब्ध आहेत. तुम्हाला तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी नसल्यास हवेची दिशा ओळखायला शिका. स्टीव्ह जॉब्स यांना स्वतःला तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी नव्हती, पण त्यांनी अॅपलसारखी कंपनी निर्माण केली आणि नियंत्रितही केली. एखाद्या विषयात निष्णात व्हा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novak Djokovic: जोकोविच आप्पाचा विषय लय हार्डए... विम्बल्डननेच शेअर केला मराठी गाण्यावर Video; एकदा पाहाच

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

SCROLL FOR NEXT