Hous-of-bamboo
Hous-of-bamboo 
संपादकीय

हौस ऑफ बांबू : ‘तें’ आणि आम्ही!

कु. सरोज चंदनवाले

‘तें’ हे मराठी साहित्याच्या क्षेत्रातले खूप मोठे व्यक्तिमत्त्व होते. ‘मराठीचा नंदादीप’ किंवा ‘सोन्याचा पिंपळ’ असे म्हटलेले ‘तें’ सहन करू शकले नसतेच. म्हणून म्हणत नाही, पण मराठी साहित्यातील ‘तें’ एक जळजळीत पलिता होते, असे म्हटले तर वावगे होऊ नये. ‘तें’ जे लिहीत त्यामुळे वाद उफाळून येत असे. माणसाच्या मनातल्या विकारविलसितांचा मागोवा घेत घेत ‘तें’ जे काही लिहीत ते कमालीचे गडदरंगी आणि चित्ताकर्षक असे. ‘तें’ नाटके लिहीत. प्राय: ती गाजत. इतकी गाजत की त्यामुळे स्वतंत्र वाद निर्माण होत असे. एक वाद निर्माण होऊन तो शमला, की ‘तें’ पुन्हा एक नाटक लिहीत. ‘तें’ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडे. असे अनेक वर्षे चालू राहिले.‘ सखाराम बाईण्डर’ म्हणू नका, ‘घाशिराम कोतवाल’ म्हणू नका!!

‘तें’ न घाबरता नाटक लिहीत, मग रंगभूमीचे पडदे जाळण्यापर्यंत आंदोलने पेटत. यात भरडून निघाला तो आमच्यासारखा रसिक प्रेक्षक बरं! ‘तें’ जी नाटके लिहीत ती आमच्यासारखी रसिकें आवडीने पाहात. म्हंजे नाटक आले की ही रसिकें छानपैकी तिकीट काढत. गजराबिजरा माळून नाट्यगृहापर्यंत जात.  प्रयोग (खरोखर) झाला तर ते पाहात, नाही तर परत येत. ‘तुका म्हणे उगीं राहावे, जे जे होईल ते ‘तें’ पहावे’ असे तुकोबामाऊलींनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच म्हणून ठेवले होते. त्यानुसार ‘तें’ जे काही पाहात, त्याचेच नाटकात रूपांतर होत असे. त्याचे पुन्हा वादात पुनर्रूपांतर होत असे. असो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या माझे मन ‘सखाराम बाईंण्डर’मधल्या लक्ष्मीसारखे किंवा ‘पाहिजे जातीचे’ मधल्या महिपतीसारखे बधीर होऊन गेले आहे. भलेबुरे, सुष्टदुष्ट ओळखण्याच्या पलीकडची अवस्था आली आहे. ‘पाहिजे जातीचे’ हे खरे तर शिक्षणव्यवस्थेची अवस्था सांगणारे नाटक. त्याचा हिंदीत अनुवाद झाला- ’जातही पूछो साधु की’ मध्य प्रदेशातील छत्तरपूरमध्ये ‘इप्टा’च्या नाट्य महोत्सवात ‘इप्टा’तर्फे त्याचा प्रयोग होणार होता. पण नाही झाला. कारण ‘तें’च! टायटलमध्ये साधू हा शब्द आल्याने काहींनी प्रयोग होऊ दिला नाही. बरं झालं बै, अरुण साधूंच्या कादंबरीवर आधारित ‘सिंहासन’वर बंदी आणा म्हणाले नाहीत !!  

एका भाईजानला आम्ही विचारले, की ‘‘तुम्हाला ‘तें’ कां आवडत नाहीत?’’ त्याने कपाळावरले गंध आणखी गडद  केले. डोळे गरागरा फिरवले. म्हणाला, ‘‘ज्या कारणामुळे तुम्हाला आमचे साधू आवडत नाहीत, तेच कारण!’’ आम्हाला साधू खूप आवडतात, असे मी सांगणार होत्ये! पण त्याऐवजी मी फक्त नाक मुरडले. ते पाहून त्याने गळ्यातील उपवस्त्र आणखी घट्ट केले. ते आवळून आणखी घट्ट करण्यासाठी माझे हात शिवशिवत होते. पण...जाऊ दे. ‘जातही पूछो साधु की’ या हिंदी नाटकात मुळात साधूचे पात्रच नाही, ही रंगमंचीय वस्तुस्थिती त्याला सांगण्याचा थोडा प्रयत्न केला. पण तो फेल गेला.

गेल्या शंभर वर्षांतील ज्या मराठी नाटकांमुळे कोणाच्याही आणि कशामुळेही आणि कुठल्याही भावनांचा उपमर्द होत असेल, तर त्यांची यादी ताबडतोब आम्हाला द्या, असा गुरगुरत आदेश देत्साता तो निघून गेला. मी घाबरून कागद आणि पेन घेऊन केव्हाची बसल्ये आहे.  कोणाचे नाव कळवावे? खरंच आज ‘तें’ हवे होते. खमके उत्तर ‘तें’च देऊ शकले असते. 
नाही का?

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Nashik Lok Sabha Election : नाशिककरांनो, निर्भयपणे मतदान करा! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सोशल मीडियावरून आवाहन

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SRH vs PBKS Live Score : पंजाबची 150 धावांपर्यत मजल; प्रभसिमरनला बाद करत व्यशकांतने दिला धक्का

SCROLL FOR NEXT