ashok chavan join bjp devendra fadnavis bawankule politics
ashok chavan join bjp devendra fadnavis bawankule politics Sakal
satirical-news

ढिंग टांग : नवा पर्याय, नवी सुरवात..!

ब्रिटिश नंदी

पहाटे कधीतरी डोळा लागला, तेव्हा स्वप्न पडले. स्वप्नात आम्ही दोघे कांदेपोहे खात होतो. आम्ही दोघे म्हणजे -मी आणि नानासाहेब फडणवीस. त्यांनी माझ्या पोह्यांच्या बशीवर प्रेमाने लिंबू पिळले. मी (पोह्यातला) मिरचीचा तुकडा काढून त्यांना दिला.

त्यांनी तो चमच्याने बाजूला सरकवला. मग मला म्हणाले, ‘‘इथं नवीन आहात, तर तुम्हाला थोडं हिंडवून आणतो! आपण जिथं काम करतो ती जागा माहीत असायला हवी!’’ मी मान डोलावून होकार दिला. तोंडात पोह्यांचा घास होता.

दक्षिण मुंबईत मंत्रालयाच्या बाजूलाच आयुर्विम्याची इमारत आहे. तिच्या बरोब्बर समोरच्या कार्यालयात गेलो. सोबत नानासाहेब होतेच. त्यांची तिथं भारी वट असावी! कारण ते आत येताच खुर्चीत बसलेले बावनकुळेसाहेब उठून उभे राहिले. बाकीचेही पटदिशी उठले. (एक-दोघे मटकन बसलेलेही मी पाहिले!)

‘‘हे आपलं कार्यालय…इथून सगळा पक्षाचा कारभार पाहिला जातो!’’ नानासाहेबांनी खोल्या हिंडवून दाखवल्या. बरीच गर्दी दिसत होती. मी दबकलो.

‘‘बिलकुल संकोच करु नका आशुक्राव! आपलंच घर समजा!!,’’ नानासाहेबांनी दिलखुलासपणे सांगितले. मी कसनुसे हसलो.

‘‘ नवीच ॲडमिशन असल्याने सराव नाही! नाही म्हटलं तरी ३८ वर्षं काँगेसच्या टिळकभवनात काढली,’’ मी संकोचाने म्हणालो. प्रवेशाच्या वेळी काल आशिषराव शेलारांना चुकून ‘मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष’ असे संबोधून गेलो!! (त्यामुळे इथे हशा पिकला, पण टिळकभवनात घबराट उडाल्याचे कळले!! असो.)

‘‘होईल सवय इथलीही!...आमचं कार्यालय किती गजबजलंय ते पहा!’’ नानासाहेबांनी अभिमानाने गर्दीकडे बोट दाखवले. एक चष्मावाले गृहस्थ कार्यकर्त्यांच्या घोळक्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना कुणी जागा देत नव्हते. ‘‘ते कोण?’’ मी नानासाहेबांना विचारले. त्यांनी हळू आवाजात ‘सोमय्यागोमय्या’ असे सांगितले. मी तात्काळ दिशा बदलली!

इतर खोल्यांमध्ये डोकावत असताना एका ठिकाणी राणेसाहेबांचे पुत्र कोंडाळ्यात बसून गप्पा मारत होते. एकदम नाव आठवले नाही. पण त्यांनी ‘आले का तुम्ही पण…’ असे उद्गार काढले. ‘‘उद्या सकाळी बघतोच त्याला’’ असे काहीसे ते मित्रांना सांगत होते. बहुधा संजयाजी राऊतांबद्दल असणार! त्यांच्या खोलीच्या बाहेर ‘मॅटिनी शो विभाग’ अशी पाटी वाचली. मी नमस्कार करुन पुढे सटकलो. पुढल्या खोलीत आमचे हर्षवर्धनजी एकटेच बसलेले होते. त्यांनी माझा हात प्रेमभराने दाबला. ‘किती वाट बघितली, साहेब!’ असं म्हणाले. माझ्या डोळ्यात पाणीच आले.

पुढल्या कोपऱ्यातल्या खोलीत आमचे विखेसाहेब बसले होते. बहुधा माझीच वाट बघत असावेत! त्यांनी ‘वेलकम, वेलकम’ असे दोनदा म्हटले. मीही दोनदा ‘थँक्यू, थॅक्यू’ म्हटले.

दरवाजापाशी मिलिंद देवराजी, आणि बाबा सिद्दिकीसाहेब एकमेकांशीच गप्पा मारत उभे होते. धड ना आत, धड ना बाहेर, असे उंबरठ्यावरच! त्यांना नमस्कार करुन ‘आत चला’ असे म्हटले.

जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत,

सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत

…अशी (बहुधा) केशवसुतांची कविता शाळेत आम्हाला शिकायला होती. ती अचानक आठवली.

‘‘तुम्हाला काहीही गरज पडली तर यांना सांगायचं..,’’ बावनकुळेसाहेबांकडे बोट दाखवून नानासाहेबांनी सांगितले. बावनकुळेसाहेबांनीही अंगठा दाखवून ‘काहीही काळजी करु नका, मी आहे’ असे सांगितले. भिंतीवर माननीय मोदीजी आणि मोटाभाईंचा फोटो होता. दोघांनाही मी वाकून नमस्कार केला. तोवर नानासाहेब घाईघाईने कुठेतरी निघून गेले होते…

बराच वेळ वाट पाहून शेवटी बावनकुळेसाहेबांना विचारले, ‘‘ कार्यालय छान आहे, पण मी बसायचे कुठे?’’

ते आश्चर्यचकित झाले. मग ओठ काढून खांदे उडवत म्हणाले, ‘‘ देवाला ठाऊक!’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT