क्रोमोझोम्स
क्रोमोझोम्स sakal
satirical-news

हौस ऑफ बांबू - अंतराळात मराठी क्रोमोझोम्स…!

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! गेला पंधरवडा अगदी अस्वस्थतेत गेला. कश्शाकश्शात म्हणून मन लागत नव्हतं. इथं मी फुकट पुण्याच्या गल्लीबोळात हिंडत राहिल्ये, आणि तिकडे न्यूजर्सीत बृहन्महाराष्ट्र मंडळाचं द्वैवार्षिक अधिवेशन होऊनही गेलं. यूएसमध्ये अटलांटिक सिटीत गेल्या ११ ते १४ ऑगस्टला अटलांटिक सिटीत बीएमएमचं कन्वेन्शन झालं. तिथं कनेक्टिकट, डॅलस, शिकॅगो वगैरे ठिकाणाहून आलेल्या ढोलताशे पथकांनी धमाल उडवली अशी खबर आहे. या कन्वेन्शनला चीफ गेस्ट म्हणून आपल्या इथून नाट्याचार्य अमोलशास्त्री पालेकर गेले होते, हे कळलं. मनात म्हटलं, बरं झालं नाही गेले! अमोलजी काय, पुण्यातही भेटतात!!

अमोलजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संध्या गोखले हे आमचं पुण्यातलं अगदी लाडकं दांपत्य आहे. कुठेही भेटून दोन शब्द (आपल्याशी) बोलले तरी आपण चांगल्यापैकी इंटलेक्चुअल आहोत, असं वाटायला लागतं. नाटक, चित्रपट, लेखन, चित्रकला, सामाजिक-सांस्कृतिक भाष्य, चळवळी इतक्या क्षेत्रात वावरुनही त्यांनी आपली ‘आंब्याची डहाळी’ किंवा ‘तोरण’ होऊ दिलेलं नाही. तेही पुण्यात! उगीच एखाद्या संस्थेची अहवालभर्ती म्हणून ते व्याख्यानं देत बसत नाहीत. अन्यायाला बेधडक वाचा फोडणं सोडत नाहीत, उलट त्यांच्यामुळेच अनेकांची वाचा बसते. अमोलशास्त्री आणि संध्यावैनी हे तर कलाक्षेत्रातलं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्त्व.

त्यांच्यासारखा प्रमुख पाहुणा ‘बीएमएम’ला यंदा मिळाला. मग ढोल वाजवलेच पाहिजेत!! विक्रमादित्याप्रमाणे पालेकरांनीही हट्ट न सोडता तिथं जोरदार भाषण ठोकून भारतातली परिस्थिती गंभीर असल्याचं भयंकर गंभीर आवाजात सांगून मांडवात पिनड्रॉप शांतता प्रस्थापित केली. ‘‘सध्या भारतात घुसमटीचा काळ चालू आहे, आणि इथं राजकारणी पोचणार नाहीत, याची खात्री करुन मगच आलो आहे,’’ असं त्यांनी सुरवातीलाच सांगून टाकलं. अटलांटिक सिटीत हौसेहौसेनं जमलेले अनिवासी मराठी एकदम गंभीर झाले. पार दादासाहेब फाळक्यांपासून थेट आत्तापर्यंत सगळ्याचा भराभर आढावा पालेकरांनी आपल्या भाषणात घेतला. रशियाचे बुल्गानिन आणि क्रुश्चाव पुण्यात आले होते, त्याचीही ‘कालप्रवाहात हरवून गेलेली’ आठवण सांगितली. पुढे तरुणपणी पालेकरांनी काही काळ बुल्गानिनसारखी दाढी ठेवण्याचा घरगुती प्रयत्न केला होता, हे अनेकांना आठवत असेल! पण ते जाऊ दे.

भाषणाच्या उत्तरार्धात पालेकरांनी आल्गोरिदम, ब्लॉकचेन टेक्नॉलजी, ए. आय., लामडा (खुलासा : ही एक यंत्रांची भाषा आहे. डोण्ट इमॅजिन वाट्टेल ते हं!) वगैरे शब्दांचा आघातासहित उच्चार करत आपण (पक्षी : वर्तमानातील मराठी कलावंत) अगदीच ‘हे’ नाहीए, याची जाणीव उपस्थितांना करुन दिली. ‘‘ न जाणो बे एरियातल्या काही मराठी लोकांनी आपली क्रोमोझोम बीजं स्पेसमध्ये सोडून दिली असतील’’ असा दाट संशयही व्यक्त केला. बेएरियातल्या मराठी लोकांनी संशयानं एकमेकांकडे बघितलं!! जाता जाता त्यांनी दिलेला धमकीवजा इशारा मात्र वर्मावर घाव घालणारा ठरला. ते म्हणाले, ‘‘ न जाणो भविष्यात डिजिटली क्रिएटेड अमोल पालेकर तुमच्यासमोर उभा राहून मराठी कलावंतांची गौरवगाथा अशीच सांगेल!!’’ हे समारोपाचं वाक्य ऐकून आयोजकांनी हुंदका आवरत सतरंजीची घडी घालायलाच घेतली, आणि खाद्यपदार्थांची रेलचेल असलेल्या मांडवात आळुवडीचा आस्वाद घेणाऱ्या एका मराठी वैज्ञानिकाच्या तोंडचा घास मधल्यामध्ये अडकला!!

आम्हाला इथे एक कोंडीफोडू अमोल पालेकर झेपत नाही, आणि डिजिटली क्रिएटेड पालेकर विश्वाच्या अंतापर्यंत आढावा घेत राहणार, ही कल्पना अंगावर काटा आणणारी नाही का? सध्या पालेकरांची घुसमट होत असल्याने जास्त काही लिहीत नाही. नाहीतर माझीही घुसमट व्हायची. असो.

पुढलं अधिवेशन नेमकं ‘बे एरिया’तच आहे म्हणे. (बोलावलं तर) जाऊ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT