ढिंग टांग
ढिंग टांग sakal
satirical-news

ढिंग टांग : बचो बचमजी, किरीट आया...!

ब्रिटिश नंदी

हातामध्ये घेऊनि चाबूक, वीर जाहला मोहीमशीर

आक्रमणाचा थोर पवित्रा, मुळी न त्याला उरला धीर

खबरदार जर टाच मारुनी पुढे जाल तर राखा याद

बचो बचमजी, किरीट आया, त्याच्या पुढती सारे बाद

ईडी त्याच्या ताब्यात

शक्ती गनिमीकाव्यात

विष झोंबते चाव्यात

माथ्यावरती किरीट शोभे, कमळदळांची माळ गळां

गोफण फिरवीत आला आला, खुर्चीवाले पळा पळा!

बघून घेईन एकेकाला, म्हणे वीर तो फुशारुनी

ऐन्यामध्ये बघुनि स्वत:ला खुशीत येई मनोमनी

मेरे जैसा कोई नहीं

मेरा कहना सही सही

हातावरती द्याच दही

मरतुकडा पण अबलख घोडा, स्वार दौडतो चौखूर

पवनचक्कीला राक्षस मानुनि चालवितो अन तलवार

परिकथेतील डॉन किओते हाच लोकहो, हाच खरा

हात बांधुनि निमुटपणाने सरदाराचे पाय धरा!

हा घ्या फटका ईडीचा

दुसरा हा धरसोडीचा

किंवा फोडाफोडीचा

म्हणे वीर तो, वीज कडाडे, जणू केसरी गर्जतसे

हलक्यामध्ये घेऊ नका हो, शौर्य नसे हे असेतसे

जणू निघावा बाटलीतला अगिनबाण तो अग्निपथे

अपघाताने नेम चुकोनी आणि घुसावा नको तिथे!

फुटे फटाका पायात

पुढले सारे अज्ञात

जळले ते आतल्याआत

‘‘अन्यायाला फोडिन वाचा, उकरुन काढीन भ्रष्टाचार

भेदुनि टाकीन सारी गगने बदलुनि टाकीन जगदाकार

शेल कंपन्या, हेराफेरी, भव्य बंगले बेनामी

असो काहिही, अथवा नाही-सत्ता तुमची हंगामी’’

रणमर्दाची ही वाणी

तलवारीचे हे पाणी

वीरोचित ती जयगाणी

रणमर्दाच्या मागे मागे सैन्य कोणते उभे असे

काय धुळीचे लोटचि नुसते, बाकी काही दिसे न दिसे

आक्रित झाले, वाघावरती मूषक इतुका गुरगुरतो

तीच गर्जना ऐकून तेव्हा वाघ फुकाचा पिरपिरतो

मी तर आहे एक सीए

मजला कोणी नाही पीए

जीना है तो ऐसे जिए

‘घड्याळा’तले काटे हलले, दारामागे लपला ‘हात’

‘वाघ’ कुरकुरे पिंजऱ्यातला, हल्ली हल्ली पडले दात!

कोण असे हा वीरशिरोमणि, कितना शूर है, हाय दैय्या!

कौतुकमात्रे मांस मूठभर, चढे म्हणे, ‘मी सोमय्या!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT