operation-lotus
operation-lotus 
satirical-news

ढिंग टांग : पुन्हा ऑपरेशन लोटस!

ब्रिटिश नंदी

सर्व सहकाऱ्यांसाठी-
(अत्यंत तांतडीचे व महत्त्वाचे)

जय महाराष्ट्र. आमच्या गुप्तहेर खात्याने आणलेल्या गर्मागर्म खबरीनुसार दुश्‍मनांनी म्हणजेच नतद्रष्ट कमळाबाईने पुनश्‍च एकवार आपला विषारी फणा काढला असोन ‘ऑपरेशन लोटस’ला राज्यात सुरवात झाली आहे. गेले वर्षभर कारभार करीत असलेले व पुढील पंचवीस वर्षे कारभार करण्याचा चंग बांधलेले आपले संयुक्त सरकार खुर्चीवरोन खाली लोटून देण्याच्या लोटालोट मोहिमेला ‘लोटस ऑपरेशन’ असे गुप्त नाव आहे, हे जगजाहीर आहेच!! राजस्थान आणि महाराष्ट्र अशा दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ‘ऑपरेशन लोटस’ तडीस नेण्याचा दुश्‍मनांचा इरादा असून आपल्या ऐक्‍याच्या जोरावर तो हाणून पाडणे गरजेचे आहे. आपल्या आघाडीच्या ऐक्‍याची भिंत त्या कुठल्याशा सिमेंटसारखी भक्कम व अभेद्य आहे. ‘यह दिवार टूटती क्‍यूं नहीं’ असा सवाल टाहो फोडत विरोधक करीत आहेत. परंतु, त्याचवेळी भिंतीमध्ये ड्रील मारुन गोळाबारुद ठासून भरण्याचे त्यांचे उद्योगही चालू आहेत, असे गुप्तहेराने सांगितले आहे. तेव्हा चुकूनही कोठे सांदीसपाटी राहणार नाही, यासाठी डोळ्यात तेल घालोन गस्त घालणे. हयगय  न करणे. नपेक्षा घरी बसावयाची पाळी येईल, हे बरे समजोन असा. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तेव्हा आपल्या ऐतिहासिक आघाडीतील हरेक सदस्याने एकनिष्ठेची शपथ घेवोन मनगटावर ‘आघाडीबंधन’ बांधोन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे पवित्र बंधन तोडणाऱ्यावर कडक कारवाई करणेत येईल. (खुलासा : कारभार आटोपल्यावर कडक कारवाई काय करणार? ते ठरावयाचे आहे!! ) अधिक काय लिहिणे? 

कळावे. उधोजीराजे. कारभारी (सहीशिक्का)
.......
मा. उधोजीराजे यांसी,
आपण काळजी करणेची नाही. हिते सगळीजणे सावधच  आहेत. कुणाला खुर्ची घालवायची हौस आहे?? आपरेशन लोटस येऊ द्या, नाहीतर गुलाब येऊ द्या. असली चिक्कार फुलं पचवून बसलोय! आपली एकी (पक्षी : ऐक्‍य!) ऐतिहासिक आहे. ती तशीच राहील. त्यातूनही मोठ्या साहेबांना विचारुन घेतलेले बरे!! आघाडीबंधनाचा धागा मनगटावर बांधण्याची सक्ती करु नये. ही लोकशाही आहे! हिते असले प्रकार नकोत! जो तो मुखत्यार असतोय! मोठे साहेब म्हणतील तसे होईल. कळावे.
 आपला. दादासाहेब. उप-कारभारी. (सही शिक्का)

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
......
मा. कारभारी व मा. उपकारभारी,
आदरणीय माननीय महाम्याडम यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने खालील मजकूर लिहिला असे :-

महोदय, महाराष्ट्रात पुन्हा एकवार आपरेशन लोटस होणार, ही बातमी ऐकून पोटात गोळा आला. हे कमळवाले आपल्याला लिक्विड ऑक्‍सिजनच्या चेंबरमध्ये असे कोंडून का ठेवतात? ऑक्‍सिजन मरु देत नै, आणि लिक्विड जगू देत नै!! हे काही लोकशाहीला धरुन होणारे नाही. त्यांना माघारी बसवून आपण तिन्ही पार्ट्या एकत्र आलो, पण गेले वर्षभर सरकार कधी पडणार, याचीच वाट पाहण्यात गेले. हे योग्य नव्हे. 

आदरणीय व माननीय महाम्याडम यांच्या आशीर्वादाने झालेली आपली सर्वांची एकी (पक्षी : ऐक्‍य) अभेद्य आहे. जोसवर आ. मा. महाम्याडम यांचा आशीर्वाद आहे, तोसतोवर ती अभेद्यच राहील याची ग्वाही मी येथे देत आहे.

एकनिष्ठेची शपथ घेऊन मनगटावर ‘आघाडीबंधन’ बांधून घेण्याची संकल्पना वाईट नाही, परंतु, आमच्या पक्षाच्या रीतीप्रमाणे हा विषय कमिटीसमोर येऊन त्यावर योग्य तो विचारविनिमय होऊन सर्वाधिकार आ. मा. महाम्याडम यांना दिल्यानंतरच काय तो अंतिम निर्णय होईल. कळावे. आपला. बाळासाहेब, उप-उप कारभारी. (सहीशिक्का उपलब्ध नाही!) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT