dhing tang
dhing tang  sakal
satirical-news

हम सब एक एक है...!

ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण…मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (पक्षकार्यासंबंधी कागदपत्रांचं अध्ययन करत) हं!

बेटा : (कपाळाला आठ्या घालत) मी बराच वेळ फोन ट्राय करत होतो! पण हा नंबर टेंपररीली डिसकनेक्टेड आहे, अशी टेप वाजतेय! काय भानगड आहे?

मम्मामॅडम : (स्वत:शीच) पक्षाची कामं वाढत चालली आहेत! राजस्थानात किती डोकेदुखी वाढली आहे, बघतो आहेस ना? एकदा मि. गेहलोत फोन करतात, पाठोपाठ सचिन पायलटचा फोन येतो, असं दिवसभर चालू आहे! शेवटी मी फोन काढून ठेवला!!

बेटा : (चुटकी वाजवत) तरीच!

मम्मामॅडम : (कागदपत्रं बाजूला ठेवून) आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस, बेटा?

बेटा : (निरागसपणाने) काही नाही! जेवून झोपणार थोडा वेळ!

मम्मामॅडम : (प्रयासाने संयम ठेवत) आय मीन…काल नितीशजी भेटून गेले ना? काय म्हणत होते?

बेटा : (उजळलेल्या चेहऱ्याने) ग्रेट माणूस आहे! मला म्हणाले, ‘‘तुम्हीच देशाचं भवितव्य घडवू शकता!’’

मम्मामॅडम : (उत्सुकतेने) मग? तू काय म्हणालास?

बेटा : (खांदे उडवत) मी म्हटलं, ‘‘आय नो!हेच तर मी गेली पंधरा वर्षं लोकांना पटवून देतोय!!’’

मम्मामॅडम : (चिंतायुक्त सुरात) देशाचं भवितव्य सुरक्षित राखायचं असेल, तर आधी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं, हे तू त्यांना सांगितलंस का?

बेटा : (किंचित विचार करत) अगदी अस्संच नाही, पण जवळपास तसंच सांगितलं! मी म्हणालो, ‘तुम्ही सगळे आधी एकत्र या, मी आहेच!’

मम्मामॅडम : (अधीरतेनं) मग ते काय म्हणाले?

बेटा : (हाताची घडी घालत) ते म्हणाले, ‘‘लो कर्लो बात! मैं वही बताने आया था, आपने मेरे मूंह की बात छीन ली! तुम्ही सगळे एकत्र या, मी आहेच’ असंच मीही सांगतोय!’’

मम्मामॅडम : (घुश्शात) सगळे एकजुटीच्या गप्पा करतात, पण स्वत:ला बाजूला ठेवून! परवा ममतादिदींचाही कोलकात्याहून फोन आला होता, म्हणतात कशा, ‘तुम ॲकजूट कोरो, आमी आछी!’’ आता काय करायचं?

बेटा : (विचारात पडून) परवा ते मुंबईचे मि. राऊत येऊन गेले, तेसुध्दा म्हणत होते, ‘‘एकजूट महत्त्वाची! आपण सगळे एकत्र येऊ, आमचे बांदऱ्याचे साहेब नेतृत्त्व करतील! एक ना एक दिवस दिल्लीत मराठी माणूस पंतप्रधानपदी बसवण्याचं वचन दिलंय म्हणाले! अब क्या होगा मम्मा?

मम्मामॅडम : (धोरणीपणाने) आधी आपण सगळे एकत्र येऊ, मग बघू एकेकाच्या स्वप्नाचं! डझनभर माणसांनी पंतप्रधानपदाची स्वप्न बघून काय उपयोग? त्या खुर्चीवर एका वेळी एकच माणूस बसू शकतो! (कौतुकानं) आणि तो म्हणजेऽऽ…ओळखा पाहू ?

बेटा : (निरागसपणे) मी ना?

मम्मामॅडम : (स्वप्नातून वास्तवात येत) अभी दिल्ली बहुत दूर है! बराच पल्ला मारायचा आहे! आधी एकजूट करु, मग पुढचं पुढे!!

बेटा : (अविश्वासाने) सगळे विरोधक माझ्या नेतृत्त्वाखाली एकत्र येतील, असं मला तरी वाटत नाही! पण एकीला बाधा येणारी भाषणं करायची नाहीत, असं मी ठरवलंय! बघू तरी एकजूट होते का ते!!

मम्मामॅडम : (त्वेषाने) तुझं नेतृत्त्व त्यांना स्वीकारावंच लागेल! त्यासाठी जालीम उपाय करावा लागणार आहे! पण नेमकं काय करायचं, हे कळत नाही...

बेटा : (चुटकी वाजवत) आयडिया! मी पुन्हा एकदा ‘नफरत छोडो, विरोधक जोडो’ अशी यात्रा काढू का? सगळे आपोआप सामील होतील! कशी आहे आयडिया?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT