dhing tang
dhing tang sakal
satirical-news

ढिंग टांग : मला असे वाटते की...!

ब्रिटिश नंदी

दादू : (फोन करुन गुरकावत) घुर्रर्र...हॉव...भुर्रर्र...खर्रर्र...खरक..भ्याव!!

सदू : (थंडपणे फोन उचलत) बोल दादूराया!!

दादू : (चिडून) शेवटी खाल्लीस ना माती?

सदू : (खांदे उडवत) छे, मी गुढी पाडव्याचं श्रीखंड खाल्लं!! मी माती खाल्ली असं तुला वाटतं! बाय द वे, श्रीखंड अप्रतिम होतं!!

दादू : (हळहळून) मला असं वाटतं की..की...जाऊ दे! एकाच शब्दात सांगतो, शी:!!

सदू : (शांतपणे दुरुत्तर करत) शी:? तुम्हीच शी:! तुमची आघाडी शी:!!

दादू : (संयमानं) कशाला त्या नतद्रष्टांच्या मागे गेलास? वाईट संगत आहे ती!! एकेकाळी मी त्या कमळेच्या नादानं वाटोळं करुन घेतलं! वेळीच सुधारलो म्हणून बरं! आता तिनं तुला नादाला लावलं असं दिसतंय...सांभाळ रे सांभाळ!!

सदू : (गंभीरपणाने) घरंदाज स्त्रीबद्दल असे असभ्य उद्गार काढणं शोभत नाही!!

दादू : (चवताळून) ती कमळा घरंदाज? उद्या गद्दारांना शूरवीर म्हणशील!! खोक्याला संदूक म्हणशील! फडतुसांना काडतूस म्हणशील! मराठी अस्मिता नावाची काही गोष्ट आहे की नाही? मी लेचापेचा नाही, हे त्यांना कळलं, म्हणून त्यांनी तुला हाताशी धरलं! सावध हो रे बाबा, वेळीच सावध हो!!

सदू : (दुप्पट गांभीर्यानं) उलट मी वेळीच सावध झालोय, म्हणून मी मोदीजींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय!!

दादू : (कपाळावर हात मारत) कालपर्यंत महाराष्ट्राच्या अस्मितेचा उदोउदो करत होतास, आता काय गुजरातचा करणार?

सदू : (निर्धाराने) मला मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत!

दादू : (सात्विक संतापाने) मळकट हातांना बळकट करु नका!!

सदू : (खोचकपणाने) हा जळकटपणा आहे!...तुझ्यासारखी शाब्दिक कोटी आम्हीही करु शकतो, म्हटलं!!

दादू : (अजीजीने) मी चांगला टाळी द्यायला येणार होतो, तेवढ्यात घोळ केलास!!

सदू : (सुस्कारा सोडत) तुझ्या टाळीची वाट पाहात बसलो असतो, तर पुढे टाळ्या वाजवत बसावं लागलं असतं! घे, आणखी एक टाळीचं वाक्य!! हाहा!!

दादू : (खवचटपणाने) आता तुझ्या ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या अफाट लोकप्रिय प्रयोगांचं काय होणार?

सदू : (एक पॉज घेत) माझ्याकडे आणखी खूप वेगवेगळे व्हिडिओ आहेत!

दादू : (मखलाशी करत) सदूराया, मला असं वाटतं की, तू कुठल्या तरी दबावात त्यांना पाठिंबा दिलास!! दरोडेखोरांनी चाकू दाखवला की काही लोक विनाविरोध गळ्यातली चेन, पाकिटातले पैसे, घड्याळ वगैरे काढून देतात, त्यातला वाटमारीचा प्रकार वाटला!!

सदू : (धोरणीपणाने) दरोडेखोराला ‘शुक शुक’ करुन बोलावून त्याला सगळं अर्पण करण्यापेक्षा हे बरं!!

दादू : (चौकश्या करत) त्यांनी काय ऑफर केलं रे?...बंद दाराआड?

सदू : (बर्फाळ आवाजात) त्यांनी काही ऑफर केलं नाही, आणि मी त्यांना काही देऊ केलं नाही!

दादू : (मोठ्या भावाच्या भूमिकेत) बंद दाराआड ते वाट्टेल ते वचन देतात, आणि नंतर पानं पुसतात हं! माझ्या अनुभवातून शीक काहीतरी!!

सदू : (चतुराईने) म्हणून तर बिनशर्त पाठिंबा दिला ना! ‘आमचं ठरलंय’ असं सांगत हिंडलो नाही!!

दादू : (हताशेनं) कसं समजावू? तू स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला आहेस!

सदू : (उदासमनस्कपणे) तो अठरा वर्षांपूर्वीच घेतला होता!!

दादू : (आवाहन करत) अजूनही परत ये! वेळ गेलेली नाही! आपण दोघं मिळून महाराष्ट्राचा स्वाभिमान जपू!!

सदू : (निर्णायक सुरात) मला असं वाटतं की, मोदीजींच्या हातात महाराष्ट्राचा स्वाभिमान सुरक्षित आहे! जय महाराष्ट्र!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT