Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : आवर्त ओवी!

- ब्रिटिश नंदी

आधी वंदू पंचमहाभूतां।

तयांचे ठायीची निर्ममता।

भिनावी मजलागी अजाणता।

मागणे हेचि।।

ऐसे पंचमहाभूतांचे पंचमुखी।

आम्ही मर्त्यजीव

आहो असुखी।

तरीही पाषाणीं रोवोनिया नखी।

चिकटलो जैसे।।

जैं घोरपडियेचे लहानगें।

जन्मत: कडेकपारी लंघे।

तैसे आम्हालागी जिवलगें।

आयुष्य आहे।।

ऐसा घुसळियेला विश्वद्रव।

आवर्ती सांपडले यावज्जीव।

माणूसकीचे दयार्णव।

सुकले क्षणात।।

विषाणूचे खेळ धूर्त।

त्यात प्रकटले आवर्त।

जीवेच्छेचे उदकतीर्थ।

नासोनि गेले।।

कां हे मरणांचे वारे वाहती।

उध्वस्तली

माणूसकीची वसती।

पापात्म्यांनाहि सद्गती।

लाभे येथ।।

निसर्गाचे चक्र निष्ठूर।

आहे ते आंधळे ठार।

गरगरा दळते क्रूर।

पीठ जाय श्वानमुखी।।

या भूमंडळाचे ठायी।

अमर्त्य ऐसा कोणी नाही।

जो तो तिरडीचा भोई।

चालतो आहे।।

नको नको हे ऐसे जिणे।

त्यापरी बरे कुलुंगे सुणे।

कोपऱ्यात केविलवाणे।

पडोनि राहे।।

जैसे महापुरीं लव्हाळे।

जळावरी निपजे शेवाळे।

भूगर्भीचे मौन जिव्हाळे।

तैसे असावे।।

जीविताचा नको आवाज।

मानव्याचा नको माज।

आदिमतेची निर्वस्त्र लाज।

वाटोचि नये।।

विज्ञानाचा नको दंभ।

अज्ञानाचा जळो सुंभ।

हा विश्वाचा असे कुंभ।

जगदाकार।।

तरीही मानव्याची अभद्र सोंगे।

दाविती अमंगळ ओंगळांगे।

भ्रष्टाचाराचा महिमा सांगे।

उच्चरवाने।।

कुणी लुंगविती रुग्णाईत।

कुणी गळीं मारिती ताईत।

कुणी दरोडेखोर सराईत।

बोकाळिले गा।।

जैं खेकडियांच्या पंगती।

येकमेकां खेचो बघती।

तेवढ्यात शिजते सागुती।

टोपात त्यांची।।

अनंता, तुझे देवपण।

काय मानू त्याचे प्रमाण?।

अस्तित्त्वाची तुझ्या खूण।

अदृश्य का रे?।।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT