Dhing-Tang
Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : रौप्यमहोत्सवाकडे झेप!

ब्रिटिश नंदी

सदू : (फोन फिरवत) अभिनंदन!
दादू : (खुशीत) थँक्यू! कुरुम कुरुम कुरुम!!
सदू : (कान टवकारत) काय खातोयस?
दादू : (खुशीतच) गाजरं! ...कुरुम कुरुम कुरुम!
सदू : (गंभीरपणे) तुझ्या कारभाराला एक वर्ष पूर्ण झालं!
दादू : (आत्मविश्वासाने) पंचवीसपैकी एक! ...त्याच खुशीची गाजरं खातोय! कुरुम कुरुम! पुढली पंचवीस वर्षं मी कारभार करणार आहे, त्यातलं पहिलं वर्ष पूर्ण झालं, असं म्हणायचंय मला!
सदू : (दाद देत) तुझ्या दुर्दम्य आत्मविश्वासाला सलाम!
दादू : (गाजरं खात) कुरुम कुरुम… आय मीन पुन्हा थँक्यू!
सदू : (सलगीने) कसं जमवलंस?
दादू : (विषय टाळत) सांगीन…नंतर कधी तरी! ते आमचं आतलं कुरुम आहे! आय मीन सीक्रेट आहे!
सदू : (गळ घालत) सांग ना…प्लीज!
दादू : (पोक्तपणाने) तुला समजणार नाही! त्यासाठी लोकांमध्ये मिळून मिसळून कुरुम कुरुम वागावं लागतं! मी लोकांना त्यांच्या घरातला अगदी ‘हा’ वाटतो!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदू : (बुचकळ्यात पडत) ‘हा’ वाटतो म्हणजे?
दादू : (दुसरे गाजर उचलत) …मोठा भाऊ वाटतो! लोकांशी असं नातं जुळलं ना, की या जगात काही कठीण नसतं, सदू! महाराष्ट्रावर वर्षभरात कमी का संकटं आली? पण आम्ही हातीपायी सुरक्षित टिकलो! त्याचं श्रेय या गाजरांना… आय मीन…महाराष्ट्राच्या आपुलकीला! ही आपुलकीची गाजरं आहेत सदूराया!
सदू : (घाईघाईने) ते आपुलकीचं ठीक आहे! पण महाराष्ट्राच्या प्रगतीचं काय?
दादू : महाराष्ट्र थांबला नाही…थांबणार नाही! महाराष्ट्रावर नैसर्गिक, अनैसर्गिक, राजकीय, अराजकीय… अशी कितीतरी महाभयानक संकटं आली, पण मी डगमगलो नाही! शांतपणे बसून राहिलो! वारंवार हात धूत राहिलो!
सदू : कोसो कॉय जॉमतॉ बोआ एकॉ मॉणसॉलॉ...!
दादू : (दुर्लक्ष करत) महाराष्ट्र कधी घाबरला नाही, घाबरणारही नाही!
सदू : (खट्याळपणे) हे स्वत:ला बजावून सांगतोहेस की जगाला? फिक!!
दादू : (चवताळून) खामोश! याला आत्मविश्वास म्हणतात! हल्ली मी कोणालाही घाबरत नाही, सदूराया! तुलाही नाही!!
सदू : (भोळेपणाने) मला कशाला घाबरशील? मी साधासुधा नवनिर्माणवाला!! तू गाजरं खा, आम्ही बघत बसतो!
दादू : (अतिशय भावनिक सुरात) रयतेनं माझ्यावर विश्वास टाकला! ही गाजरं, त्याचीच ही फळं आहेत! कडाड…कराक…कराक…कुरुम कुरुम!!
सदू : गाजर हे फळ नाही दादू, ते कंदमूळ आहे!
दादू : (वैद्यकीय सल्ला देत) गाजरात ‘अ’ जीवनसत्त्व असतं! ते दृष्टीला चांगलं!! त्यानं ऱ्हस्व दृष्टी बदलून दीर्घ दृष्टी प्राप्त होते! शिवाय प्रतिकारशक्ती वाढायलाही मदत होते! तूसुद्धा खात जा!!
सदू : मग आम्हालाही पाठवा ना पाव किलो गाजरं!
दादू : (खिजवत) स्वत:ची गाजरं स्वत:च कमवावी लागतात सदूराया! तू घरात बसून नवनिर्माणाच्या गोष्टी करतोस! असं कसं चालेल? मी सांगतो, आपुलकी मिळव, गाजरं मिळतील आपोआप!
सदू : (संताप गिळत) : तुझ्या वर्षपूर्तीचं खरं रहस्य ठाऊक आहे मला, दादूराया!
दादू : (कुतुहलानं) अच्छा? मग सांगून टाक!
सदू : (डेडली पॉज घेत) वारंवार हात धुणे, मास्क लावणे आणि दोन हात दूर राहून गाजरं खाणे!!
दादू : (गालातल्या गालात हसत) तूसुद्धा माझ्यासारखाच अबोल आणि चतुर आहेस! जय महाराष्ट्र!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT