satirical-news

ढिंग टांग : ‘बंगाल भवन’ ची पायाभरणी!

चि. विक्रमादित्य : (रुबाबात दार ठोठावत) हाय देअर बॅब्स…मे आय कम इन? आमि आसते पारि?

ब्रिटिश नंदी

चि. विक्रमादित्य : (रुबाबात दार ठोठावत) हाय देअर बॅब्स…मे आय कम इन? आमि आसते पारि?

उधोजीसाहेब : (कानटोपी घट्ट दाबून बसवत) नाही!

विक्रमादित्य : (तरीही दार ढकलून आत येत) दोया करि! मला येऊ दे! एका धडाडीच्या पर्यावरणमंत्र्याला तुम्ही असं रोखू शकत नाही! त्यामुळे महाराष्ट्राचं अपरिमित नुकसान होईल, बॅब्स! शिवाय, मी हात धुतले आहेत!

उधोजीसाहेब : (उपरोधाने) माझ्या महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानू का?

विक्रमादित्य : (टोमण्याकडे सपशेल दुर्लक्ष करत) बॅब्स, पिकतं तिथं विकत नाही, हेच खरं! तुम्हा लोकांना अजून माझ्या कामाचं महत्त्वच कळलेलं नाही! माझ्या कामाचं मोल बंगालमधले भद्रजन जाणतात!!

उधोजीसाहेब : (गडबडून) हा ममता आंटीला भेटून आल्याचा इफेक्ट दिसतोय! वाटलंच होतं…

विक्रमादित्य : (अभिमानाने) होय! मी साक्षात बेंगाल टायग्रेसला भेटलो! बंगाली वाघिणीला सह्याद्रीचा वाघाचा बछडा भेटला! ती भेट ऐतिहासिक होती…

उधोजीसाहेब : (गुळमुळीतपणाने) ते ठीक आहे, पण सध्या अशा भेटीगाठी टाळाव्यात रे! संकट अजून टळलेलं नाही हे कळत कसं नाही तुम्हाला?

विक्रमादित्य : (रसभरीत वर्णन करत) तुमची भेट टळल्यामुळे मी स्वत: ममताआंटींना भेटायला हॉटेलवर गेलो! तिथं त्यांनी माझं प्रचंड स्वागत केलं!

उधोजीसाहेब : मी यायला हवं होतं…नै?

विक्रमादित्य : (खुशीत) त्यांनी तुमच्यासाठी मीडियम साइझचे दोन बंगाली कुर्ते, रसगुल्ल्याचा एक डबा, एक मिठाईचा पुडा आणि तुमच्यासाठी खास संदेश दिला आहे!! घ्या!!

उधोजीसाहेब : (बेसावधपणे) संदेश तेवढा सांग!

विक्रमादित्य : (गडबडून) संदेश विसरलो!

उधोजीसाहेब : (हतबुध्द होत्साते) असा कसा संदेश विसरलात? कमालच झाली!

विक्रमादित्य : (गंमत वाटून) आय मीन, ममता आंटीच विसरल्या!! हातात मिठाईचा पुडा ठेवून कानात कुजबुजल्या माझ्या की, बाबांना संदेश नक्की दे हं! मी म्हटलं देतो की, त्यात काय एवढं? पण त्यांनी संदेश सांगितलाच नाही! हाहा!!

उधोजीसाहेब : (विचारपूर्वक) तुझ्या बाजूला आपले संजयाजी राऊतकाका उभे होते ना? मग असं होणारच! त्यांना सोबत घेऊन जाऊ नकोस, म्हणून मी तुला बजावलं होतं!! ते सोबत असले की माणूस मनात योजलेलं विसरतो, असा अनुभव आहे माझा!!

विक्रमादित्य : (एकदम आठवून) हां, आठवलं! संदेश त्या मिठाईच्या पुड्यात आहे!

उधोजीसाहेब : (कपाळाला हात लावून) संदेश नावाची बंगाली मिठाई आहे ती!!

विक्रमादित्य : (विषय बदलत) ममता आंटींनी माझं कौतुक केलं, म्हणाल्या की आता तुम्ही तरुणांनीच राजकारणाची सूत्रं हाती घ्यायला हवीत! पर्यावरणमंत्री म्हणून चांगलं काम करताहात तुम्ही! कीप इट अप!

उधोजीसाहेब : माझ्याबद्दल काही बोलल्या का?

विक्रमादित्य : (पुन्हा विषय बदलत) …त्यांना आपल्या मुंबईत ‘बंगाल भवन’ उभारायचं आहे! त्यासाठी भूखंड मागितला त्यांनी!

उधोजीसाहेब : एकदम भूखंड? बाप रे!!

विक्रमादित्य : (खांदे उडवत) मी म्हटलं, त्यात काय येवढं? घेऊन टाका! मुंबईत चिक्कार पडलेत भूखंड!!

उधोजीसाहेब : (काळजीच्या सुरात स्वत:शीच पुटपुटत) भूखंड कसले रे मागतात मिठाईच्या बदल्यात?

विक्रमादित्य : बॅब्स, तो मेट्रो प्रकल्पाचा आरेच्या जंगलातला भूखंड तसाच रिकामा पडून आहे! तोच देऊन टाका ‘बंगाल भवन’साठी! कशी आहे आयडिया?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: दोघेही 'क्लास वन' अधिकारी, स्पाय कॅमेरे लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ केले शूट; पुण्यात खळबळ

Matheran: माथेरानमध्ये टॅक्‍सीसेवा बंद, घाटमार्गावर पर्यटकांची पायपीट!

ENG vs IND, 4th Test: अंशुल कंबोजचं पदार्पण नक्की? कर्णधार गिलने स्पष्ट संकेतच दिले; रिषभ पंत खेळणार की नाही, हेही सांगितलं

Sanitation Workers Strike: सफाई कामगारांच्या आंदोलनाला यश, अखेर संप मागे!

Latest Maharashtra News Updates : घाटकोपरच्या जुन्या स्तंभावरुन नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT