Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : तोहफा कुबुल करो!

ब्रिटिश नंदी

आजचा सुविचार : तुमने आपुनकू दस मारा, मैंने एकही मारा, लेकिन सॉलिड मारा के नहीं! (ख्यातनाम प्रेरणादायी वक्ते आणि काव्यप्रेमी विचारवंत मा. अमिताभ बच्चन यांच्या एका संवादातून.)

आजची तिथी : आनंद संवत्सर श्रीशके ९४४ ज्येष्ठ शु. त्रयोदशी.

आजचा वार : मंडेवार.

आजचा सुविचार : तुमने आपुनकू दस मारा, मैंने एकही मारा, लेकिन सॉलिड मारा के नहीं! (ख्यातनाम प्रेरणादायी वक्ते आणि काव्यप्रेमी विचारवंत मा. अमिताभ बच्चन यांच्या एका संवादातून.)

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) अडीच वर्षं टोमण्यांचे बाण सहन करणाऱ्याला अचानक एक दिवस फुलांच्या वर्षावाला तोंड द्यावे लागावे. अडीच वर्षे तोंड कडू पडले असताना अचानक एक दिवस कुणीतरी मस्त पायनापल केक भरवावा. अडीच वर्षे नाही नाही ती टिंगल सहन करणाऱ्यावर अचानक स्तुतीसुमने बरसावीत…तसे काहीसे झाले आहे. गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे कोचिंग क्लासच्या चालकांनी दैनिकात जाहिरात देऊन कौतुक करावे, तसे मला वाटत आहे.

गणित हा विषय माझा पहिल्यापासूनच बरा होता. (म्हणूनच मी वकील झालो!) गेली निवडणूक ही निवडणूक नव्हतीच. तो गणिताचा पेपर म्हणून मी सोडवला, आणि चांगल्या मार्कांनी पास झालो एवढेच. कोल्हापूरचे आमचे विजयी पैलवानगडी मुन्नाजी महाडिक यांना शेवटपर्यंत मी नेमकी काय आकडेमोड केली ते कळले नसेल! त्यांनाच काय, कुणालाच धड टोटल लागली असेल, असे वाटत नाही.

आमचा उमेदवार जिंकून आल्यानंतर आमचे कमळाध्यक्ष मा. चंदूदादा (चष्मा पुसत) आले. पाठीवर थाप मारुन म्हणाले, ‘‘भले शाब्बास, कसं काय जमतं तुम्हाला…कम्मालचै!!’ आमचे पियुषजी गोयल हे तर ‘सीए’ आहेत. त्यांना मी सोडवलेलं गणित बरोब्बर (अगदी स्टेप बाय स्टेप) कळलं. त्यांनी मला टाळी दिली.

आमच्या ‘सीए’ संघटनेच्या निवडणुकीत असंच मतदान होतं, असेही ते म्हणाले. शेलारमामा, गिरीशभौ वगैरे सहकारी येऊन एवढेच म्हणाले की, ‘जहांपन्हां, तुस्सी ग्रेट हो…तोहफा कुबुल करो!’ तेव्हा मात्र मी चक्क लाजलो!! महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनीही मला (बाजूला घेऊन) ‘नेमकं काय केलंत?’ असं विचारुन घेतलं. मी त्यांना म्हटले, ‘अहो, हवेतून उदी काढून देणारा बंगालीबाबा ‘उदी कशी काढली’ हे सांगतो का?’

मी केलेल्या चमत्काराबद्दल सगळे नेते आवर्जून बोलले, पण आमचे जुने मित्र मा. उधोजीसाहेब यांची प्रतिक्रिया काही आली नाही. मी वाट पाहात राहिलो. (निदान एक टोमणा तरी?) शेवटी न राहवून मी त्यांना फोन केला. (‘ते आमचाही फोन उचलत नाहीत’, ही महाविकास आघाडीच्या लोकांनी सोडलेली अफवा आहे.) त्यांना म्हटले, ‘सीझन संपत आला तरी आंब्याची शेवटची पेटी शिल्लक आहे. येताय? आमरस-पुरीचा बेत करु!’

‘टोमणे मारु नका!’ असे करड्या आवाजात सुनावून त्यांनी फोन ठेवून दिला. आता यात मी काय टोमणा मारला होता? बाकी मला मारलेले सगळे टोमणे त्यांच्यावरच उलटले आहेत, हे बरेच झाले म्हणायचे.

‘मी पुन्हा येईन’ असे मी मागे एकदा बोललो होतो. कुठून बोललो, असे नंतर झाले होते. माझी मन:पूत चेष्टा करण्यात आली. पण एकच दणका असा काही दिला की यंव रे यंव ! पुढे येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी कुणीतरी गणिताचा मास्तर नियुक्त करण्याची खटपट विरोधकांनी सुरु केल्याचे समजते. कुणीही या, मी तयार आहे!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT