Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : अवकाळीची क्रूर चेटकी...!

अवकाळीची क्रूर चेटकी, खुशाल रगडे किडक्या दाढा, बोटे मोडीत कैदाशीण ती, अमंगळाचा म्हणते पाढा

ब्रिटिश नंदी

अवकाळीची क्रूर चेटकी, खुशाल रगडे किडक्या दाढा, बोटे मोडीत कैदाशीण ती, अमंगळाचा म्हणते पाढा

अवकाळीची क्रूर चेटकी

खुशाल रगडे किडक्या दाढा

बोटे मोडीत कैदाशीण ती

अमंगळाचा म्हणते पाढा

कोठे काही भले चांगले

अवकाळीला बघवत नाही

नजर वाकडी लावत फिरते

भलेपणा तिज अवगत नाही

‘तळपट होवो, तळपट होवो,’

मंत्र पुटपुटे सत्तर लाख

नजर विखारी, अभद्र दृष्टी

कटाक्षमात्रे करिते राख!

तिरळे डोळे, किडके दात

वळवळ जीभ, खप्पड गाल

दुर्गंधाचा उसळे लोट

अवकाळीची येता चाल

भरले घर पाहुनिया तिजला

संतापाची तिडीक जाते

केवळ नजरेच्या जरबेने

हिरवी भूमी पडीक होते

अवकाळीचा येतो फेरा

निंब दारीचा अवचित वठतो

वेशीवरती घमघमणाऱ्या

अमराईतिल मोहोर गळतो

मागिल दारी लेकुरवाळी

ओली आंबीण सजे अनावर

तिची सानुली कैरी बाळे

दचकून पडती पहा भुईवर

मांडवभरल्या द्राक्ष घडांची

सुकत जातसे जीवनवेल

मणी ओघळती विझून ज्योती

डोळ्यांमध्ये मरण अवेळ

हातमुखाशी आला घास

ओढुनि घेते हावरट मेली

उभ्या पिकावर पडते इंगळ

येता येता सुगी हरपली

अवकाळीची येता चाहुल

घिरट्या देती उंच गिधाडे

अशुभाचे अन मंत्र सांगता

पाणवठ्यावर घूक ओरडे

अवकाळीच्या ओच्यामध्ये

दुष्काळाचे किरटे पोर

दुर्भिक्ष्याची दु:स्वप्ने अन

उगा सृष्टीला लागे घोर

अवकाळीचे मुस्कट काळे

कशास येते पुन्हा पुन्हा

कोण बोलवी चेटकिस त्या

काय कुणाचा हाय गुन्हा?

अवकाळी ती तुम्हाअम्हां हो,

राजकारणी तिचाच टेंभा

अपुल्यासाठी ती अवकाळी

त्यांच्यासाठी उर्वशी-रंभा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: दोघेही 'क्लास वन' अधिकारी, स्पाय कॅमेरे लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ केले शूट; पुण्यात खळबळ

Matheran: माथेरानमध्ये टॅक्‍सीसेवा बंद, घाटमार्गावर पर्यटकांची पायपीट!

ENG vs IND, 4th Test: अंशुल कंबोजचं पदार्पण नक्की? कर्णधार गिलने स्पष्ट संकेतच दिले; रिषभ पंत खेळणार की नाही, हेही सांगितलं

Sanitation Workers Strike: सफाई कामगारांच्या आंदोलनाला यश, अखेर संप मागे!

Latest Maharashtra News Updates : घाटकोपरच्या जुन्या स्तंभावरुन नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT