Skill Development and Education sakal
संपादकीय

कौशल्याधारित शिक्षणाचा प्रयोग

‘कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे दरवर्षी १५ जुलैला युवा कौशल्य दिन साजरा होतो. त्यानिमित्त कौशल्य विद्यापीठांच्या उभारणीविषयी माहिती.

डॉ. अपूर्वा पालकर

‘कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे दरवर्षी १५ जुलैला युवा कौशल्य दिन साजरा होतो. त्यानिमित्त कौशल्य विद्यापीठांच्या उभारणीविषयी माहिती.

कौशल्य विद्यापीठांची संकल्पना अलीकडच्या काळातली आहे. नुकतीच काही राज्यांनी यांची स्थापना केली आहे. हरियाणा, दिल्ली, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आसाम यांसारख्या राज्यांत ही विद्यापीठे आहेत. कौशल्यप्रशिक्षण हे यापूर्वी २००८ ला स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय कौशल्य विकास निगमा’द्वारे प्रमाणपत्र व अनेक योजनांद्वारे दिले जात होते.

कौशल्यावर आधारित पदवी व पदव्युत्तर ची संकल्पना कौशल्य विद्यापीठाद्वारे आणण्याचा उत्तम प्रयत्न आता केंद्र सरकारने केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही (२०२०) कौशल्यावर भर देण्यात आला आहे. कौशल्य विद्यापीठात ४० टक्के वर्गातील शिक्षण व ६० टक्के कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम देण्याची संकल्पना आहे.

पदवी अभ्यासक्रम

राज्य सरकारने स्थापित केलेले कौशल्य विद्यापीठ हे राज्यव्यापी विद्यापीठ असणे अपेक्षित आहे. राज्य विधेयकातून यांची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने नवी मुंबई, पुणे व नागपूर येथे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू केले आहेत. अभ्यासक्रम तयार करणे, प्रयोगशाळा, वर्गखोल्या, प्राध्यापक, भौतिक सुखसुविधा, अभ्यासमंडळांची स्थापना, विद्यापरिषदेची स्थापना व कौशल्य विद्यापीठाला लागणारे उद्योगजगाशी निगडित ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ अशा अनेक गोष्टी विद्यापीठाच्या स्थापनेपासून करणे आवश्यक होते. त्या करण्यात आल्या. ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट असलेल्या महाराष्ट्र, आसाम, हरियाणा, गुजरात येथील विद्यापीठांतून किमान पाच वर्षात -म्हणजे एक चार वर्षाची बॅच बाहेर पडल्यावर त्याचे प्रभाव सगळ्यांपर्यंत पोचतील.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात २१अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. उद्योग समूहाने ५५ करार केले असून सगळ्या अभ्यासक्रमात उद्योगसमूह विद्यार्थ्यांना ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ देणार आहे. टाटा ट्रेंट, मॅकडोनाल्ड, मेट्रोपोलीस, केपीएमजी, पर्सिस्टन्ट सिस्टिम्स, वर्ल्ड ट्रेड सेन्टर यासारख्या कंपन्यांचा/संस्थांचा यात समावेश आहे. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात डिझाईन िथंकिंगवर भर आहे.

विद्यापीठांनी यावर्षी युरोपची नामवंत डिझाईनसंस्था ‘रुबिक’बरोबर करार करून जागतिक दर्जाच्या BDes- इंडस्ट्रियल डिझाईन, इंटरॲक्शन डिझाईन अशा कौशल्याधारित अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट्ससाठी एनएसडीसी- इंटरनॅशनलबरोबर करार केला असून जपानी, जर्मन या भाषेचे कौशल्यप्रशिक्षण येथे देण्यात येत आहे.

रोजगार संधी देणार

प्रशिक्षित विद्यार्थ्यांना त्या देशांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य या केंद्राद्वारे करण्यात येणार आहे. सध्या इथे १०० प्रशिक्षणार्थी भाषेचे कौशल्य प्राप्त करत आहेत. मेकॅट्रॉनिक्स, सिविल ॲंड कॉन्संट्रेशन मॅनॅजमेण्ट, संगणक तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान यांसारखे पदवी अभ्यासक्रम चालू केले आहेत.

यात प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यावर्षी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून या वर्षी पूर्ण संख्येत विद्यार्थी प्रवेश घेतील. विद्यापीठांनी ‘सेंट्रल युनिव्हर्सिटी प्रवेश चाचणीद्वारा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. इतर राज्यव्यापी ,शासकीय देशव्यापी प्रवेशपरीक्षेत चांगले गुण मिळविणारे विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतील.

कौशल्य विद्यापीठांनी ‘I- स्पार्क फौंडेशन’ची स्थापना केली आहे व यात नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे, मार्गर्दशन करणे, पायाभूत निधी देणे इत्यादी कामे चालू आहेत. विद्यापीठांनी २० महाविद्यालयांत pre-incubation केंद्रांची स्थापना केली असून १०० नवसंशोधकांनी आपले प्रस्ताव विद्यापीठात सादर केले आहेत.

ठाण्यात संत गाडगेबाबा स्वछता अकादमीची निर्मिती विद्यापीठांनी केली असून BBA फॅसिलिटी मॅनॅजमेण्ट व इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम ‘भारत विकास ग्रुप’ या कंपनीबरोबर करार करून देण्यात येत आहेत. तीन महिन्यात ३०० लाभार्थींनी याचा उपयोग केला असून त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. विद्यापीठाच्या बिग डेटा, आर्टिफिशिअल इंटलिजन्स , सायबर सुरक्षा यांवर आधारित एम.टेक अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद आहे.

कौशल्य विद्यापीठ हे पारंपरिक विद्यापीठांना पूरक असून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात श्रेयांक दिले जाऊ शकतात. विद्यापीठाने उद्योगक्षेत्रात काम चालू केलेले आहे. विद्यापीठ हे १००% नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित असून विद्यापीठाने ‘प्रोफेसर-ऑफ -प्रॅक्टिस’ नेमले आहेत. नुकताच विद्यापीठाचा आकृतिबंध सरकारने मान्य केला असून प्राध्यापकांच्या नेमणुकीचे काम चालू होईल.

पहिला प्रयोग

‘रोम’ची निर्मिती एका दिवसात झाली नव्हती’ असे म्हटले जाते. त्याचा अर्थ लक्षात घ्यायला हवा. विद्यापीठांच्या स्थापनेसाठीही काही वर्षे लागतात. कौशल्य विद्यापीठे स्थापन करण्याचा हा पहिला प्रयोग आहे. भारताने कौशल्यक्षेत्रात मोठी झेप घेतली आहे व विविध राज्यांतील कौशल्य विद्यापीठे जगभर भारतीय मनुष्यबळ देण्यात वाटा उचलतील.

काळाच्या गरजेनुसार शिक्षणात बदल होणे अपेक्षित आहे. कौशल्य विद्यापीठे ‘अप्लाइड युनिव्हर्सिटी’च्या धर्तीवर बदल घडवतील. आज ‘वर्ल्ड स्कील डे’च्या निमित्ताने हे बदल जाणून घ्यायला हवेत. या नावीन्यपूर्ण विद्यापीठाची संकल्पना यशस्वी होईल व त्यातून देशाला चांगले मनुष्यबळ लाभेल, यात शंका नाही.

(लेखिका महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT