Horoscope and Astrology
Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य - 31 मे 2021

शरयू काकडे

दिनविशेष

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन

1874 - महाष्ट्रातील एक प्राच्यविद्यापंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी भाऊ दाजी लाड यांचे निधन. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड.

1910 - प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि विज्ञानकथाकार भा. रा. भागवत यांचा जन्म. ज्यूल्स व्हर्नच्या अनेक कादंबऱ्यांचे त्यांनी मराठीत उत्तम अनुवाद केले आहेत. शेरलॉक होम्सच्या त्यांनी अनुवादित केलेल्या गुप्तहेर कथांनी तर मुलांना अक्षरशः वेड लावले. जगातील उत्तमोत्तम साहित्याची मुलांना ओळख व्हावी म्हणून भा. रां. नी केलेले प्रयत्नही लक्षणीय आहेत. "फास्टर फेणे', "दीपमाळेचे रहस्य', "निळा मासा', "तैमूरलंगाचा भाला' इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत.

1921 - आधुनिक गुजरातीतील प्रसिद्ध कवी, कथाकार व समीक्षक सुरेश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म. त्यांनी काही भारतीय व परकीय साहित्यकृतींचे गुजरातीत अनुवाद केले.

1992 - प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना 1991 चा "कबीर सन्मान' मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर. साहित्यक्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांना हा सन्मान देण्यात येतो.

1994 - नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचे निधन. तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा, तबला डग्ग्याच्या नादातील समतोल, बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार आणि या सर्वांना व्यापून टाकणारी प्रासादिकता ही त्यांची प्रमुख गुणवैशिष्ट्ये होती.

2003 - विख्यात संगीतकार अनिल विश्‍वास यांचे निधन. "धीरे धीरे आ रे बादल', "याद रखना चांद तारों', "ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल', "सीने मे सुलगते है अरमॉं' ही त्यांची काही अत्यंत गाजलेली अवीट अशी गाणी.

2003 - ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना शिवछत्रपती राज्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

2003 - सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्‍यातील कटगुण गावचा आणि त्याच जिल्ह्यात पुसेगावमध्ये शिक्षण घेतलेल्या सुहास गोरे याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील "सर्वोत्कृष्ट छात्र' हा बहुमान मिळवीत राष्ट्रपतींचे सुवर्णपदक पटकाविले.

2004 - दलित साहित्य संघाचे संस्थापक आणि दलित साहित्यिक अप्पासाहेब रणपिसे यांचे निधन.

आजचे दिनमान

मेष : प्रकृती उत्तम राहील. अनुकूलता लाभेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

सिंह : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.

तुळ : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. अनुकूलता लाभेल.

मकर : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. वस्तू गहाळ होेणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

मीन : आर्थिक सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT