Couple Sakal
सप्तरंग

दुनियादारी : थांबशील?

वर्गात सुरू असलेल्या एका छोटेखानी असाइनमेंटमध्ये मग्न असलेली रमा, तिचा मोबाईल साईडला हलका व्हायब्रेट झाला म्हणून बघते आणि आलोकचा हा मेसेज तिच्या नोटिफिकेशनमधूनच वाचते.

आदित्य महाजन

वर्गात सुरू असलेल्या एका छोटेखानी असाइनमेंटमध्ये मग्न असलेली रमा, तिचा मोबाईल साईडला हलका व्हायब्रेट झाला म्हणून बघते आणि आलोकचा हा मेसेज तिच्या नोटिफिकेशनमधूनच वाचते.

*टिंग*

‘झालं की ये. मी गाडी पार्किंगमधून काढून थोडं पुढे जाऊन थांबतोय. नेहमीसारखं.’

वर्गात सुरू असलेल्या एका छोटेखानी असाइनमेंटमध्ये मग्न असलेली रमा, तिचा मोबाईल साईडला हलका व्हायब्रेट झाला म्हणून बघते आणि आलोकचा हा मेसेज तिच्या नोटिफिकेशनमधूनच वाचते. ५-७ मिनिटांपूर्वीच त्याची असाईनमेंट पूर्ण करून, ती सबमिट करून, त्यावर प्रोफेसरांसोबत चर्चा करून आणि त्यांना त्या असाईनमेंटला उत्तम मार्क्स देण्यासाठी प्रवृत्त करून आलोक नेहमीसारखा सगळ्यांच्या आधीच वर्गाबाहेर पडला होता. जाताना त्यानं असाईनमेंट संपवण्याची काहीही घाई नसलेल्या रमाला तिच्या बाकावर बसलेलं पाहिलं होतं आणि तिच्याकडं बघून एक छान स्माईल दिली होती. त्यावरूनच आलोकचा हा मेसेज येणार हे रमाला कळालं होतं.

‘लवकर ये, जास्त वैचारिक मेहनत नको घेऊस त्या असाईनमेंटमध्ये . इतकं काही ते महत्त्वाचं नाहीये. तसंही लेक्चरची वेळ संपून १४ मिनिटं झाली आहेत. लवकर नीघ.’

ती आधीचा वाचेपर्यंत आलोकचा दुसरा मेसेज येऊन धडकतो. रमाचा रिप्लाय नाही आला, तरी आलोकला तिची मोबाईलच्या नोटिफिकेशनमधून मेसेज वाचायची सवय माहीत होती. रमानं इकडं मोबाईल हातात घेऊन मेसेज टाइप करायला घेतलाच होता, की आलोकचा अजून एक मेसेज येऊन आदळला -

‘सुंदर मुलींनी इतक्या भंगार प्रोफेसरसोबत इतका वेळ घालवू नये! लक्षात ठेव.’

हे वाचून सिरियस झोनमधून अचानक रमाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं. ती समोर, पडलेल्या चेहऱ्याच्या प्रोफेसरकडं बघते आणि तिथल्या तिथं गालात हसते.

‘किती मेसेज करतो अरे! आणि किती फ्लर्ट करतोस! येते मी, पण मला वेळ लागेल. तुला निघायचं तर नीघ!’

ती आलोकला मेसेज पाठवून देते.

त्याचे धपाधप रिप्लाय येतात -

‘ओम रमा ढमा लवकरात लवकर निघो स्वः’

‘ओम भगनी नाही माझी, पण तरी रमा देवी समोर प्रकट हो स्वाहा!’

रमा ते सगळं वाचून हसू कसंबसं सगळ्या वर्गात कंट्रोल करते आणि पटकन लिहिते -

‘अरे!!! जरा थांबशील का?’

‘अगं थांबलोच आहे तुझ्यासाठी मगासपासून. आणि नाही माहीत कधीपासून!!’

‘पच्! बंद पड आणि तुला निघायचं तर नीघ.’

असा मेसेज टाकून रमा शेवटी मोबाईल बाजूला ठेऊन देते. पुढं २०-२५ मिनिटं जातात. रमा तिची असाईनमेंट पूर्ण करून, ती देऊन मग त्यावर डिस्कस करून पार्किंगमध्ये येते. अलोकचे ५-६ मेसेज येऊन पडलेले ती मोबाईलवर बघते. गाडी काढून कॉलेजमधून बाहेर पडते आणि पुलावर थांबलेल्या आलोकला गाठते. मावळतीची वेळ, रस्त्यावर चालायला निघालेली आणि कुत्र्यांना चालवायला निघालेली बरीच माणसं आजूबाजूला दिसत होती.

‘अरे तू अजून थांबला आहेस?’

रमा शेजारी तिची गाडी थांबवून म्हणते.

‘हो, मग काय!’

‘कशाला पण? तुझं झालं तर तू निघायचं ना.’

‘पण मला थांबायचं होतं.’

‘हे तू प्रत्येकवेळी करणार का?’

‘मला काहीच हरकत नाहीये!’

‘तू का आहेस असा? का करतोस हे?’

‘कारण कोणी कधीच माझ्यासाठी थांबलं नाही. आणि कोणीतरी कोणासाठी तरी थांबतय, हे सुख कोणालातरी देण्यात खूप सुख आहे.’

आलोक मोठी स्माईल देऊन म्हणतो आणि रमा त्याच्याकडं ‘काय करू ह्याचं’ ह्या भावनेनं बघत राहते.

‘असो, हा विषय इथेच थांबवूयात. आता पोट उपाशी थांबलंय, काहीतरी खायचं?’

आलोक शांतता मोडत म्हणतो आणि मग ते दोघं खायला जातात. खूप गप्पा, खूप चिडवाचिडवी झाल्यावर ते निघत असताना रमाला आकाशात पौर्णिमेचा चंद्र दिसतो. ती त्याचाकडेच बघत पुलावर उभी राहते.

गाडी काढणारा आलोक तिला म्हणतो,

‘काय गं, काय डोक्यात सुरू?’

ती तसंच त्याचाकडं बघते आणि मग पुन्हा चंद्राकडं.

‘काही नाही रे... मस्त हवा सुटली आहे. जरा थांबशील?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT