file photo
file photo 
सप्तरंग

आजच्या "जवळजवळ' मॉडर्न मुलीची गोष्ट!

sharvari pethkar

हो, ती स्वतंत्र आहे तशी आणि गोष्टी बदलतायत. तिला प्रमाणात आता हवं ते घालायला परवानगी मिळते. जिन्स, शॉर्टस, स्कर्ट अगदी सारं. हवं तिथे जाता येतं, हवं तसं वागता येतं, पार्टीज करता येतात. काम करता येतं.. नाही असं नाही. ती बाहेर राहून शिकू शकते, मनासारखं जगू शकते, तिचे म्हणून काही choices असू शकतात, इतकंच काय ती सिगारेट ओढू शकते, दारू पिते, रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू शकते. बरंच काही बदललं आहे नाही असं नाही..
मध्येच पेपरमध्ये, टीव्हीवर येते एखादी बलात्काराची वगैरे बातमी पण ती तिच्या भावविश्वापासून दूर आहे. ती दुर्घटना कुठल्याशा दूरदेशी घडलेली. त्याबाबत फारच फार मनापासून हळहळण्याच्या पलीकडे ती काही करत नाही. ती, जिला developed metro city म्हणावी अशा शहरात राहणारी. मेट्रोच्या, बसेसच्या आणि महत्त्वाकांक्षांच्या मागे धावणारी, दर महिन्यात पार्लरला जाणारी, लाइट मेकअप करूनच बाहेर पडणारी, महिन्याच्या शेवटी पैसे साठवून पबला जाणारी, चार-पाच डेटिंग साइट्‌सवर स्वतःचं प्रोफाईल असणारी, म्हणायला तशी बोल्ड आणि बऱ्यापैकी मॉडर्न, स्वतंत्र अशी मुलगी, ही तिची गोष्ट आहे.
आता ती फ्लॅट भाड्याने घेऊन राहते. एकटीच. कारण तिला आवडतं एकटं असणं आणि त्या फ्लॅटचं भाडं परवडण्याइतकी कमावते ती. कोणाची सक्तीची सोबत हा जाच वाटतो तिला. म्हणून एकटी राहते ती. हे आणि इतकंच कारण आहे. तिच्या काही निवडक मैत्रिणी, मित्रसुद्धा येत असतात अधूनमधून तिच्या फ्लॅटवर, नाही असं नाही. पण सोसायटीतल्या काका-काकूंना वाटतं तशा तिच्या बंद दरवाजा मागच्या भानगडी वगैरे नाही आहेत. असत्या तरी त्याची जबाबदारी स्वीकारण्याची ताकद आहे, तिच्या मनगटातही आणि खिशातही. असो. तिच्या office चे तिचे मित्र तिला अनेकदा सोडायला घरापर्यंत येतात. येता जाताना तिच्या सोसायटीत राहणारी माणसं तिच्याकडे ती परग्रहावरची कुणी असल्यासारखे टक्क बघत असतात. त्यात सोसायटीतल्या पुरुषाच्या नजरेत तिच्याकडे बघताना विशेष कुतूहल असतं. "पोरांसोबत हिंडत असते भवानी.. काय करते, कुठे जाते, कोण जाणे...' नातेवाइकात, आणि सोसायटीतल्या बायकांचा ती आवडता टी-टाइम गॉसिपचा विषय आहे.
ती शिकायला होस्टेलला होती तेव्हा, तिला लेटपास कम्पलसरी होता. साडेआठ हा होस्टेलचा इनटाइम, अन्‌ त्यानंतर बाहेर थांबायचं असेल रात्री बारापर्यंत तर लेटपास भरावा लागायचा. हे लेटपाससुद्धा महिन्याला फक्त तीन. तीनपेक्षा जास्त वेळा ती एका महिन्यात उशिरापर्यंत बाहेर थांबू शकत नाही. कधी कामामुळे, अनवधानाने बाराचा काटा उलटलाच तिला परतायला, तर सिक्‍युरिटीवाले तिला डोक्‍यापासून नखापर्यंत न्याहाळायचे. त्यांच्या नजरेत काठोकाठ संशय भरलेला. मग जवळजवळ पंधरा मिनिटं त्यांची माफी मागून, माफीचा अर्ज लिहूनच तिला आत सोडलं जायचं.
आता तिचे पालक तिचं लग्न लावून द्यायच्या मागे आहेत. स्थळं बघण्याला वगैरे तिची ना नाही, स्थळं बघण्यात घरचे बिझी तरी राहतील, नाहीच म्हणालो तर मात्र कटकट करतील, तेवढीच जिवाला शांती, काय होईल ते बघू या, म्हणत ती बिनधास्त असते. लग्न जमेपर्यंत तरी एकटी राहू नकोस असा वडिलांचा आग्रह. कारण एकटी दुकटी राहते. हिच्या काय, दहा भानगडी असतील, त्यात व्यसनं असतील कसली तर.. मुलाचं काय.. ड्रिंक करतो म्हटलं तरी चालून जातं हो, ऑकेजनली ड्रिंक करणाऱ्या मुलींचं स्थळ कसं सुचवणार.. म्हणून नातेवाइकातून कोणी तिच्यासाठी स्थळं सुचवण्याची "रिस्क' घ्यायला तयार नाही. मुलगी एकटी राहते म्हणून काही नकार येतात, काही तिच्या लग्नानंतर काम करण्याच्या अटीला परवाना मिळत नाही..
तिच्याच सोसायटीत वरच्या मजल्यावर एकटा राहणारा तिच्याच वयाचा तसाच job करणारा एक मुलगा, विनासायास बिनधास्त एकटा राहतो. तो एकटा स्वबळावर राहतो म्हणून कर्तबगारही ठरतो. त्यात सोसायटीतल्या काही काका-काकूंचा तर तो लाडकाही आहे... तिच्याच कॉलेजच्या होस्टेलच्या मुलांना लेटपास नव्हता, मुलं बिनबोभाट बिनधास्त बाहेर हिंडायचे. ती मुलांबरोबर फिरते असं म्हणताना तो मुलगाही तिच्याबरोबर फिरतो हे कुणाच्या गावीही नाही, त्याचं काय ते तरुण रक्त, "भटकभवानी' मात्र ती ठरते. तिची असो नाहीतर त्याची, शरीरासाठी, मनासाठी व्यसनं वाईटच.. पण व्यसनांवरून त्याचं जोखलं जातं ते फक्त आरोग्य, व्यसनांवरून चारित्र्यहीन मात्र तीच ठरते. हे कोण मला परवानगी देणारे.. तिला जाब विचारावासा वाटतो पण ती गप्प राहते.
रात्री अपरात्री एकटी चालत आसताना जेव्हा आजूबाजूच्या अंधारामुळे आजही तिच्या उरी भीती दाटून येते, तेव्हा त्या अंधाऱ्या वाटेवर तिला "कार्पेट'सारखा आंथरलेला दिसतो. एक भला मोठा लेटपास, जो ती निरंतर भरतेच आहे, दूरवर नजर टाकली तर तिच्या पायाखालचं ते लेटपासचं कार्पेट अनंत आहे, ती अंधारी वाट जिथे क्षितिजाला जाऊन भिडते तिथपर्यंत अंथरलेलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT