edu
edu 
सप्तरंग

परदेशात शिकताना : अमेरिकेतील शिक्षणाची पद्धत

दिलीप ओक, परदेशी प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शक

बीएस, बीए, किंवा बीएएफसारख्या पदवीसाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. अमेरिकेतील सर्व विद्यापीठांनी क्रेडिट सिस्टिम अंगीकारली आहे. विद्यार्थ्यांना एक विषय एका सत्रात शिकल्यावर त्याचे तीन क्रेडिट्‌स मिळतात. वर्षाला साधारणतः फॉल अथवा स्प्रिंग अशी दोन सत्रे असतात. प्रत्येक सत्रात पाच विषय शिकल्यावर 15 क्रेडिट्‌स मिळतात. म्हणजेच, वर्षाला 30 क्रेडिट्‌स याप्रमाणे 120 क्रेडिटस्‌ चार वर्षांत मिळवावी लागतात.

एमएस. किंवा एमबीएसाठी साधारणपणे दोन वर्षांत 33 क्रेडिट्‌स मिळवावी लागतात. प्रत्येक सत्रात तीन विषय शिकून नऊ क्रेडिट्‌स मिळतात. अशी तीन सत्रे सर्वांनाच करावी लागतात, त्याची 27 क्रेडिट्‌स मिळतात. मात्र, शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांना दोन पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे, दोन विषय शिकून सहा क्रेडिट्‌स मिळवणे आणि दुसरा पर्याय म्हणजे, प्रबंध लिहिणे किंवा एखाद्या प्रकल्पावर काम करणे व त्याची सहा क्रेडिट्‌स मिळविणं. अर्थात, काही विद्यापीठांत 33पेक्षा जास्त क्रेडिट्‌सही दोन वर्षांत पूर्ण करावी लागतात.

सर्वसाधारणपणे एमएसची पदवी दोन वर्षांत पूर्ण करता येते. मात्र, अमेरिकेतील शिक्षणपद्धती थोडी लवचिक असते. हुशार विद्यार्थी एखाद्या सत्रात एक विषय जास्त शिकून जास्तीची क्रेडिट्‌स मिळवू शकतो आणि आपला संपूर्ण कोर्स तीन सेमिस्टर्स म्हणजेच सोळा महिन्यांतही पूर्ण करू शकतो. साधारणपणे पहिल्या एक किंवा जास्तीत जास्त दोन सत्रांमध्ये अनिवार्य विषय शिकवले जातात. मात्र, त्यानंतर विद्यार्थी आपल्या आवडीचे विषय निवडू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक सल्लागार नेमलेला असतो. त्या सल्लागाराबरोबर चर्चा करूनच विद्यार्थी आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडून त्याप्रमाणे कोणते विषय शिकायचे हे ठरवतो.

डॉक्‍टरेटसाठी मात्र अमेरिकेत सुमारे चार वर्ष लागतात. अमेरिकेत एमएस केलेल्या किंवा भारतात एमटेक करून किमान दोन वर्षांचा अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश मिळतो. मात्र, पीएचडीसाठीसाठी शैक्षणिक पात्रता खूप उच्च दर्जाची असावी लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT