aerobics
aerobics 
सप्तरंग

'हे' आहेत एरोबिक्‍सचे फायदे आणि तोटे... (डॉ. राजीव शारंगपाणी)

डॉ. राजीव शारंगपाणी

हेल्थ वर्क 

एरोबिक्‍स हा एकदम तंदुरुस्त लोकांनी करण्याचा व्यायाम आहे. त्याचे काही फायदे आणि तोटेही आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 

फायदे :
1. एरोबिक्‍सचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीराच्या अत्यंत कमकुवत अवस्थेची फार तीव्र जाणीव होते. 
2. आपल्या समाजात सामूहिक नृत्य ही अत्यंत आनंददायक गोष्ट जवळजवळ नाहीच. कोणत्याही प्रसंगाने स्त्री-पुरुष एकत्र येऊन नाचत आहेत, ही सामाजिक जवळीकतेची भावना आपल्याकडे नाही. अशा परिस्थितीत अत्यंत उत्तेजक अशा संगीताच्या तालावर एरोबिक्‍स करायला फार मजा येते. 

तोटे : 
1. अपेक्षेपेक्षा एकच हालचाल झटकन केल्याने शरीरावर अतिरिक्त ताण पडून कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी सुरू होते. 
2. कोंदट जागेत भरपूर कपडे घालून एरोबिक्‍स केल्यास फारच घाम येऊन पायात गोळे येणे इत्यादी प्रकार सुरू होतात. 
3. जाड लोकांना सडपातळ होण्याची आशा लागून राहाते. पण, फक्त एरोबिक्‍स करून कुणीही सडपातळ होत नाही. त्याचबरोबर आहाराचे नियमनही आवश्‍यक असते. वजन काही किलो कमी होते. पण, लगेच ते कमी होणे थांबते. 

एरोबिक्‍स करताना ही काळजी घ्या : 
1. तुमचे वजन अधिक असल्यास ते कमी करण्याचा एरोबिक्‍स हा मार्ग नव्हे. प्रथम वजन कमी करा. मग एरोबिक्‍सची सुरवात करा. 
2. आयुष्यात कधीही मुक्त हालचाली केल्या नसल्यास एकदम सुरू करू नका. त्याआधी योगासनांसारखी सोपी ताण देणारी व्यायामपद्धती वापरून शरीर पुरेसे लवचिक झाल्यावर एरोबिक्‍स करा. 
3. एरोबिक्‍सच्या आधी दोन ते तीन आठवडे पाठ आणि पोटाचे स्थिर आणि गतिमान ताकदीचे व्यायाम कसून करा. एरोबिक्‍स सुरू केल्यानंतरदेखील ते व्यायाम सोडू नका. 
4. एरोबिक्‍स करताना कमीत कमी कपडे घाला. 
5. खोलीत हवा सतत खेळती राहील, अशी व्यवस्था करा. 
6. फार तहान लागल्यास अधूनमधून घोटभर पाणी प्या. 
7. एरोबिक्‍स झाल्यावर दोन तासांत लघवी पांढरीशुभ्र होईल, इतके पाणी प्या. 
8. एरोबिक्‍स रोजच्या रोज करू नका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ठीक आहे. इतरदिवशी त्याऐवजी ताकद वाढविण्याचे आणि लवचिकपणाचे व्यायाम करा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

Loksabha Election 2024 : हुकूमशहांकडे महाराष्ट्र देणार नाही ! ; उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहा यांच्यावर डागली तोफ

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

SCROLL FOR NEXT