Career
Career 
सप्तरंग

आवडीला प्राधान्य...

डॉ. श्रीराम गीत

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
चित्रकला छान आहे. आवडते आहे. चित्रकलेच्या शालेय जीवनात देण्याच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षाही दिल्या आहेत. अभ्यास आवडतो, पण मार्क फार छान नसतात. अशा सर्वांसाठी पूर्वीची मळलेली वाट होती ती कमर्शियल आर्टिस्टच्या डिप्लोमा किंवा पदवीची. मात्र त्यात गेल्या दशकात भर पडली आहे, ती ॲनिमेशन व डिझाइन यामधल्या अत्यंत महागड्या कोर्सेसची. सामान्य इंजिनिअरिंग वा मेडिकलपेक्षा खर्चिक असणाऱ्या या कोर्सेसचे आकर्षण ‘वाढता वाढता वाढे, भेदिले मेरू मंडळा’ या जुन्या पंक्तीप्रमाणे वाढत आहे. अर्थातच त्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षांनी वास्तवाची जमीनसुद्धा सोडली आहे. याबद्दलचे सामान्य गैरसमजांची आपण एक यादीच बनवूयात. ही यादी मी तयार केलेली नसून, मला पालकांच्या येणाऱ्या फोनवरील माहितीतून तयार झालेली आहे हेही लक्षात घ्या. 

१)     ॲनिमेशन कोणालाही जमते कारण ते ना कॉंप्युटरवर बनवायचे असते. क्‍लासमध्ये छान शिकवतात. 
२)     ॲनिमेशनचा कोर्स केला/पदवी घेतली, की किमान ४०-५० हजारांची नोकरी मिळते. 
३)     भारतात किमान दहा हजार ॲनिमेटर्सची कमतरता आहे. 
४)     ऑटोमोबाईल डिझाइनमध्येच फक्त आमच्या मुलाला रस आहे. त्यात ना खूप खूप स्कोप असतो. 
५) डिझाइनमध्ये बारावी नंतरच परदेशात शिकायला गेले तर? कारण आपल्या इथे प्रवेशाची संख्याच खूप कमी आहे. 
६)     एनआयडीमध्ये प्रवेश मिळवायला चांगला क्‍लास कोणता लावावा? तो क्‍लास करून सायन्स झेपेल का? 
यातील वास्तव फारच वेगळे आहे. ॲनिमेशन किंवा डिझाइन या दोन्हीसाठी लागते, ती क्रिएटिव्हिटी व फॅशन. तीही अगदी उच्चदर्जाची नसेल तर दोन्हीमध्ये मिडिऑकर म्हणून करिअर अडकलीच समजा. अर्थातच चित्रकलेची समज व रेषा यामध्ये गती आवश्‍यकच. मुळात दोन्ही विषयातील तज्ज्ञ व्यक्ती असल्या, उत्तम पदवीधर असल्या तरी कामाचे स्वरूप, कामाची मागणी व आवाका कळेपर्यंत या क्षेत्रात ४-५ वर्षेही द्यावीच लागतात. निव्वळ परदेशातील कोर्स करून भागते असेही नाही. विशेषतः डिझाईनमध्ये उत्तमता हाच निकष असल्याने त्या क्षेत्रातील मोजक्‍याच संस्थांतील मोजक्‍या पदवीधरांना मागणी राहात आली आहे. मग प्रश्‍न येतो, तो त्या संस्थेतील प्रवेशाचा. एकाच वाक्‍यात सांगायचे तर आयआयटी किंवा नीटच्या परीक्षेपेक्षा एनआयडी वा एनआयएफटीची प्रवेशपरीक्षा कठोर असते.  हे वास्तव पचायलासुद्धा खूप कठीण जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT