Edu
Edu 
सप्तरंग

तंत्रकुशल नागरिकांसाठी...

सकाळ वृत्तसेवा

जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक, फिनलँड
एस्टोनिया देशाच्या शिक्षणव्यवस्थेविषयी जाणून घेताना आपण क्रमाने या देशाविषयीच्या काही रंजक गोष्टींची माहिती मिळवणार आहोत. एस्टोनिया देशाविषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा देश तंत्रज्ञानदृष्ट्या अत्यंत प्रगत देश मानला जातो या देशांमध्ये अनेक सुविधा, इंटरनेटच्या माध्यमातून राबवल्या जातात.

एस्टोनिया आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एस्टोनियाच्या लोकांचा विचार केला तर हे लोक मोबाईल वापरण्यामध्ये अत्यंत प्रगत मानले जातात. इतर सर्व तंत्रज्ञान हाताळण्यात तिथल्या रहिवाशांचा हातखंडा आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी देशभर वापरण्यात येणारे ॲप्लिकेशन ‘स्काइप’ याचा शोधही याच देशात लागला होता. या देशांमध्ये ९९ टक्के साक्षरता बघायला मिळते, तसेच त्यामुळेच मतदानाची प्रक्रिया प्रत्येक वेळी ऑनलाइन प्रकारे घेतली जाते येथील लोकांच्या उत्पन्नाचा आढावा घेतल्यास हे उत्पन्न भारतीय माणसापेक्षा जवळ जवळ चारपट जास्त आहे. या देशाचे शासनही तंत्रज्ञान क्षेत्रात मागे नाही. शासनाने सर्व क्षेत्रांतील प्राप्तिकर ऑनलाइन भरण्याची सुविधा केलेली आहे. यामुळे इस्टोनियाचा रहिवासी त्याचा आयकर दहा मिनिटांत भरू शकतो. इतके स्वातंत्र्य तंत्रज्ञान आणि इंटरनेट या देशाला मिळवून देते.

इंटरनेट ही गोष्ट या देशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या देशातील जवळ जवळ प्रत्येक जण इंटरनेटचा वापर करतो. इतकेच काय, देशातील दुर्गम भागांतही इंटरनेटची सुविधा व्यवस्थित चालू असते. एस्टोनियामध्ये इंटरनेटचा वापर करून आपण पासपोर्टसाठी मागणी करू शकता, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मागणी करू शकता. जवळ जवळ सर्व सामाजिक सेवाकार्य एस्टोनियामध्ये इंटरनेटद्वारे होतात. एस्टोनियाच्या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक नागरिकाला एक डिजिटल आयडी कार्ड दिले गेले आहे.

या आयडीचा वापर करून ते टॅक्स भरू शकतात, बँकिंगच्या सर्व सुविधा वापरू शकतात. या देशात मतदानासाठी सुद्धा इंटरनेटचा वापर केला जातो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून माणूस मतदानाचा हक्क बजावू शकतो. 

वैद्यकीय क्षेत्रात गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शनही डिजिटली दिल्या जातात. एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे त्या डिजिटली पाठवल्या जातात.

एस्टोनियाला १९९१मध्ये सोव्हियत युनियनकडून स्वातंत्र्य मिळाले. या काळात देशाला सर्वप्रकारे आर्थिक प्रगतीची गरज होती. आर्थिक प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी या देशाने तंत्रज्ञानाची प्रगती हा एक उपाय अवलंबला. ही प्रगती इतकी शिगेला पोचली, की आता एस्टोनियातील वय वर्ष सात असलेली मुले संगणकावर कोडिंग-डिकोडिंगचे शिक्षण घेतात. इस्टोनियाचे सरकार दहा टक्के तरुण वर्गाला संगणकाचे प्रशिक्षण देते आणि तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी कायम आग्रही असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT