अभिनय क्षेत्रात काम करत असताना आपल्याला शनिवार-रविवारीच सुट्टी मिळेल असं नाही. त्यामुळे ज्या दिवशी मला सुट्टी मिळते, तो माझ्यासाठी वीकएण्ड असतो. मी फिटनेसप्रेमी आहे. मला सुट्टीच्या दिवशी घरी बसून राहायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ज्या दिवशी मला सुट्टी असते, तेव्हा मी सकाळी लवकर उठून योगा करणं किंवा मॉर्निँग वॉकला जाणं या गोष्टी न चुकता करते. मला ट्रेकला जायला प्रचंड आवडतं. अगदी जवळच का होईना; पण छान सकाळी लवकर निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण आपला दिवस सुरू केला, की तो संपूर्ण दिवस अगदी उत्साही आणि फ्रेश जातो. त्या सकाळच्या छान वातावरणाची दुसऱ्या कशाचीच तुलना नाही होऊ शकत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
इतकं काही करून आल्यावर जर तुम्हाला गरमागरम जेवण किंवा नाश्ता मिळाला तर तो एक वेगळाच आनंद असतो. दोन-तीन दिवस सुट्टी मिळाली, तर आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी मिळून लोणावळा किंवा अॅम्बी व्हॅलीला ट्रिपला जातो, मज्जा करतो. मित्र-मैत्रिणी कामाचा ताण हलका करतात. त्यांच्याकडून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात, एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय हे कळतं. त्यामुळे तुम्ही फ्रेश होताच; त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन मिळतो.
जेव्हा मी घरी असते, कुठे बाहेर जात नाही, तेव्हा तो सगळा वेळ मी घरच्यांना देते. मी आणि माझी आई ‘गणपती बाप्पा मोरया’ असं म्हणत मग नंतर गाणी लावून त्यावर डान्स करत दिवसाची सुरुवात करतो. घरच्यांसोबत एकत्र नाश्ता करणं, जेवणं यात एक वेगळंच सुख आहे. रोज मी न चुकता काही ना काही वाचते. त्यात माझा फेव्हरेट जॉनर असा नाही. मला ज्या गोष्टीबद्दल असं वाटतं, की याबाबत आपल्याला फार माहिती नाही त्या गोष्टींबद्दल मी वाचन करते. नवनवीन गोष्टी शिकण्याची प्रचंड आवड आहे.
घरी असल्यावर काहीही न करता स्वस्थ बसलेली मी कधीही दिसणार नाही. सतत माझं नवीन काहीतरी शिकणं सुरू असतं. कोणी मला सांगितलं, की आपल्याला ही नवीन गोष्ट करायची आहे किंवा शिकायची आहे, तर मी नेहमी ते करायला तयार असते. मला क्राफ्ट आवडतं, नवीन गोष्टी बनवायला आवडतात, माझं ज्ञान वाढवायला प्रचंड आवडतं. त्याचप्रमाणे मला कुकिंगची पण आवड आहे. मात्र, एक आहे, की पदार्थ बनवताना माझ्यासोबत जर कोणी असेल, तर मी कुकिंग जास्त एन्जॉय करते.
(शब्दांकन - राजसी वैद्य)
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.