Online-Study
Online-Study 
सप्तरंग

#MokaleVha : विस्कटलेल्या अभ्यासाची ऑनलाईन घडी

रेश्‍मा दास

‘रोनीत, अरे क्लास सुरू होईल आवर लवकर. लॅपटॉप चार्जिंग केलास का? दूध पिऊन घे पटकन...’’
रोनीतच्या आईची गडबड सुरू होती. नवऱ्याच्या ऑनलाइन ऑफिसची वेळ, रोनीतच्या ऑनलाइन क्लासची वेळ आणि कामाला येणाऱ्या मावशींची एकच वेळ, अगदी मुहूर्त काढून ठेवल्यासारखी होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन तासांचा क्लास, युनिफॉर्म परिधान करून, हातात पेन, समोर वही-पुस्तकांचा पर्वत आणि लॅपटॉपच्या स्क्रीनकडे एकाग्रतेने लक्ष असते. त्या निमित्ताने का होईना पण सर्व वर्गमित्र समोर दिसू लागले. रोनीत खूश होता. दिलेला होमवर्क पूर्ण करून शाळेच्या ॲप्लिकेशनवर अपलोड केला की तो मोकळा. दर आठवड्याची वेगवेगळ्या विषयांची ऑनलाइन टेस्ट, आणि मग लगेच निकालही असतात. सगळे किती झटपट!

सर्व गोष्टी ऑनलाइन, या आजच्या जागतिक महामारीच्या संकटात अशा स्वरूपात शाळा सुरू झाल्या. खरोखरच सुरक्षित आणि अगदीच नसण्यापेक्षा सुरू तर राहिले शिक्षण! आपत्य घरात सुरक्षित राहिले. शाळा सुरू झाली-शिक्षण मिळू लागले. आधुनिक टेक्नॉलॉजीचा सोपा आविष्कार उत्स्फूर्तपणे कार्य करू लागला.

पण शिक्षणाची घडी खरेच बसवली जाते का? आठ तासांच्या शाळेतील अभ्यासक्रम दोन तासांच्या डिजिटल चौकोनी चौकटीत आकसून तर चालला नाही ना? त्याच्या मानसिकतेचा विचार कसा करावा? सात-आठ ते बारा तेरा वर्षांपर्यंतच्या मुलांना दोन किंवा चार तास एकाच ठिकाणी बसवणे कसे शक्य आहे?

असेल तरी कितपत ज्ञानार्जन होते? याच वयात चौकसपणा वाढत असल्याने व हार्मोन्स बदलांमुळे मुलांमधील शारीरिक, मानसिक बदल बारा चौदा-सोळा वयोगटातील मुलांच्या जखडलेल्या आणि सीमित विद्यादानाच्या चौकटीत शिक्षणाची भूक कशी भागणार? पुन्हा परीक्षांचे डोंगर पुढे आहेतच.

विषय समजला नाही, वैयक्तिक समजून घेण्याला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ते संभ्रमावस्थेतच राहते. रोनीत सारखे लहान गटातील मुलांकडून इंटरनेटचा गेम्स सोबत अन्य नको त्या वेबसाइट्स ओपन झाल्या तर किंवा केल्या गेल्या तर? इंटरनेट चाकू आहे व्यवस्थित हाताळला अन् योग्य वापर केला तरच सुसह्य. नाही तर सारेच अवघड. रोनीतची आणखी एक तक्रार असते, डोळ्यांना त्रास होतोय. सलग चमकणाऱ्या स्क्रीनकडे पाहून डोळे कोरडे पडणे, डोकेदुखी सर्रास वाढू लागलीय. ऑनलाइन चॅटींग वाढून मुलांची बोलण्याची प्रक्रिया मंदावतेय. ऑनलाइनच्या दुनियेने मुलांची आनंदी स्वच्छंदी जगण्याची लाइन ऑफ केली आहे. कित्येक घड्या अजूनही अभ्यासाविना अभ्यासाच्या विस्कटलेल्या आहेत. शहरी भागात पालकांच्या सोबत इंटरनेट, लाइट मेहेरबानी करतेय. ग्रामीण विद्यार्थ्यांचं काय? लाइट नाही, कुठे रेंजच नाही, कुठे अँड्रॉइड मोबाईलच नाहीत. ज्ञानाचा प्रसाद सर्वांनाच सारखा मिळावा तरच ज्ञानी पिढी घडेल घडेल. महामारी अकस्मात आहे, पण त्यावर निदान चिमुकल्यांच्या भविष्याची तरी घडी अभ्यास करून बसायला हवी, यासाठी आता पालकांनीच जास्त पुढाकार घ्यायची गरज आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT