सप्तरंग

शिक्षण मातृभाषेतूनच हवं... (शिवराज गोर्ले)

शिवराज गोर्ले

बालक-पालक
भाषेचा जन्म व आरंभ कसा होतो? मूल जन्माला आल्यानंतर रडतं तेव्हा त्याला स्वतःचाच आवाज प्रथम ऐकू येतो. ध्वनिशक्तीची जाणीव होते. मूल रडू लागलं, की आई दूध पाजते. यातून आवाज केल्यावर गोड अनुभव मिळतो हे मुलाला कळतं. मग ते आवाज वापरू लागतं. मुलाला खेळवताना आई अत्यंत प्रेमळ स्वरूपात ‘माझ्या छकुल्या.. सोनुल्या’ वगैरे लाडिक शब्द वापरते. ते ऐकून व तिच्या ओठांच्या हालचाली पाहून मूल प्रथम ‘हुं हु’ असे ध्वनी काढायला शिकतं. मग स्वतः ओठांच्या हालचाली करून ‘पा-बा-भा-म’ असे ओष्ठ्य वर्णोच्चार मूल करू लागतं. आई त्यामुळे आनंदित होऊन ‘हे बाबा, हा मामा’ इत्यादी व्यक्तींकडे बोट दाखवून शब्दांची व्यक्तींशी सांगड घालते. मग हम्मा, भू भू, चिऊ इत्यादी उच्चारांवरून प्राण्यांची ओळख करून देते. मराठी भाषेतील प्राणिवाचक शब्द त्या त्या प्राण्यांच्या ध्वनीवरून बनलेले आहेत. ते मुलांना लवकर कळतात.

स्पर्श व ध्वनी या संवेदना सर्वांत आधी विकसित होतात. गती वा हालचाल मुलाला नंतर कळते. ‘चिऊ भुर्रर्र उडते’ हे वाक्‍य सांगताना आई चिऊकडं बोट दाखवून व हातांनी उडण्याची गती व दिशा दाखवते. शब्द आणि अर्थ (ध्वनिरूप प्रतीक व प्रत्यक्ष अनुभव) यांची सांगड आईकडूनच बालकाच्या मनात घातली जाते. हे सर्व विशद करून प्रा. उमाकांत कामत म्हणतात, ‘मातृभाषा मानवी मूल शिकतं तेव्हा त्याचा पाया प्रेम, वात्सल्य, कौतुक, आनंद, क्रीडा या पूर्णतः सुखद अशा भावनांच्या अनुभूतीनं घातला जातो. या सर्व भावप्रवृत्ती मानवी जीवनातील स्वास्थ्य, सुरक्षितता, परस्पर स्वीकार अशा निकोप मनःस्थितीशी निगडित आहेत. त्या अर्थातच विकासाला पोषक अशाच असतात. 

मातेच्या प्रेमाला पारखी झालेली मुलं मानसिक स्वास्थ्य व भाषिक विकासाची गती हरवून बसतात, असं आढळून आलं आहे. म्हणूनच सामान्यतः तीन वर्षं पूर्ण होईपर्यंत मुलांना प्रेमळ, कौटुंबिक पार्श्‍वभूमी लाभणं अत्यावश्‍यक असतं. त्यानंतर येतं ते पूर्वप्राथमिक शिक्षण. त्यातील आद्य तज्ज्ञ फ्रॉबेल आणि माँटेसरी या दोघांनीही स्त्री शिक्षिकेचीच योजना केली व तिच्याशी मुलांनी ‘आई’ व ‘ताई’ सदृश संबोधनांनी बोलावं, अशी प्रथा सुरू केली. या काळात मुलं बरोबरीच्या मुलांसमवेत खेळ, गाणी यातून निर्माण होणाऱ्या परस्पर संवादातून नवनवे शब्द, वाक्‍यरचना व संवादकौशल्य आत्मसात करतात. हे पूर्वप्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावं, अशीच मूलतः योजना होती. आता मात्र हा सगळाच विचार पालकांनी ‘ऑप्शन’ला टाकला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT