सप्तरंग

‘सोशल इंटेलिजन्स’ची अभिनव संकल्पना... (शिवराज गोर्ले)

शिवराज गोर्ले

बालक-पालक
शालान्त परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत (पूर्वीच्या पद्धतीनुसार ‘बोर्डात येणारे’) विद्यार्थी व पुढं आयुष्यात विविध क्षेत्रांत उत्तुंग यश मिळविणाऱ्या व्यक्ती अशा दोन याद्या केल्यास त्यात सामाईक अशी किती नावे आढळतील? काही नक्कीच आढळतील, पण कितीतरी अगदीच वेगळी नावे दिसून येतील. बुद्‌ध्यंकाच्या आधारे मिळवता येणारे परीक्षेतील गुण आणि प्रत्यक्ष आयुष्यातलं यश यांचा तसा काही परस्परसंबंध असतोच. असं नाही. म्हणजेच, मानवी क्षमतेच्या संदर्भात ‘बुद्‌ध्यंक’ संकल्पना ‘अंतिम’ मानता येत नाही.

‘बुद्‌ध्यंका’चा शिक्षणक्षेत्रात बराच बोलबाला झाला याचं मजेशीर कारण म्हणजे ‘बुद्धी’ मोजता येते, हे सिद्ध झालं होतं. पण केवळ मोजता येणं, यावर कशाचं मोल ठरत नसतं. अल्बर्ट आइन्स्टाईननं म्हटल्याप्रमाणं, ‘जे मोजता येतं, ते मूल्यवान असतंच असं नाही आणि जे मूल्यवान असतं, ते मोजता येतंच असं नाही.’ या पार्श्‍वभूमीवर मोजता न येणाऱ्या, तरीही मोलाच्या असणाऱ्या एका क्षमतेकडं, खरंतर बुद्धिमत्तेच्या एका अंगाकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तो इ. एल. थार्नडाइक यांनी. तसं म्हटलं तर थार्नडाइक स्वतः ‘आयक्‍यू’ संकल्पनेचे खंदे समर्पक होते. मात्र त्यांनीही मानवी नातेसंबंध कुशलतेने हाताळण्याच्या क्षमतेचं महत्त्व स्वीकारलं. या कौशल्याचं त्यांनी ‘सोशल इन्टेलिजन्स’ असं नामकरणही केलं. तरीही बुद्धिमत्तेचा हा पैलू ‘बुद्‌ध्यंका’त समाविष्ट होऊ शकला नाही. त्याचं कारणही गमतीदार होतं. थार्नडाइक यांना अभिप्रेत होती, ती भिन्न प्रकृतींच्या व्यक्तींनाही सामावून घेण्याची, त्यांना संघटित व प्रेरित करण्याची, व्यक्ती व्यक्तींमधील मतभेद व संघर्ष कुशलतेने हाताळण्याची, सकारात्मक स्वरूपाची विशेष अशी बुद्धिमत्ता. मात्र, काही शंकेखोर प्रकृतीच्या टीकाकारांनी या चातुर्याला ‘चलाखी’चं आणि ‘लबाडी’चं लेबल चिकटवलं. त्यांच्या मते हा केवळ धूर्तपणा होता, हुशारी नव्हे! अशा कौशल्याला ‘सामाजिक बुद्धिमत्तेचा’ दर्जा देणं म्हणजे कावेबाजांना बुद्धिमत्तेच्या बरोबरीला बसवणं, असं म्हटलं गेलं. या बुद्धिमत्तेला ‘सोशल इन्टेलिजन्स’ ऐवजी ‘पोलिटिकल इन्टेलिजन्स’ म्हणावं असंही उपरोधानं सुचवलं गेलं. ही नवी संकल्पना मूळ धरू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT