Edu
Edu 
सप्तरंग

बालशिक्षणातील ‘शास्त्रीय’ गफलती

सकाळ वृत्तसेवा

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
भारतात आज ३ ते ६ वयोगटातील साधारण साडेसात कोटी मुलं बालवाड्यांमध्ये जात आहेत. बालशिक्षण असं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

मुद्दा हा आहे ते योग्य/शास्त्रशुद्ध पद्धतीनं होतंय का नाही हे त्याचं उत्तर आहे आणि त्यामागचं कारणही मजेशीर आहे. बालशिक्षणात आज शास्त्रीय गफलती होत आहेत. त्या उलगडताना अश्‍विनी गोडसे म्हणतात, ‘शिक्षणविषयक, बालमानसशास्त्रात जे शोध लागले आहेत त्या शोधांचा चुकीचा व सोईस्कर अर्थ लावण्यामुळे या गफलती होत आहेत. उदा. मेंदू संशोधन. हा तर परवलीचा शब्द झाला आहे. आठ वर्षांपर्यंत मुलांचा विकास सर्वाधिक वेगानं होत असतो हे आता शास्त्रानं सिद्ध झालं आहे. त्यामुळं आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना जास्तीत जास्त शिकवण्याची घाई सुरू झाली आहे. ही पहिली शास्त्रीय गफलत. मुलं लहान वयात अनेक भाषा शिकू शकतात, हाही शोध लागला आहे. अनेक भाषा येतात, त्या ऐकून, समजून बोलता येतात. हे सत्य बाजूला ठेवून दुसऱ्या भाषेतून शिकवलं तरी हरकत नाही, असा अर्थ पालकांनी काढलेला दिसतो. ही झाली दुसरी गफलत.’ 

बालवयातील मुलं अनुकरणातून शिकतात, असं शास्त्र सांगतं. त्याचा सोईस्कर अर्थ असा काढला गेला की मोठ्यांनी मुलांना शिकवलंच पाहिजे आणि मुलांनी मोठ्या माणसांप्रमाणे वागलं पाहिजे. ही तिसरी गफलत. यामुळं मुलांची स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती जोपासली जात नाही. त्याचवेळी शास्त्रानं सांगितलेले इतर मुद्दे सोईस्करपणे दुर्लक्षिले जातात.

उदा. मुलांना अनुभवांवर आधारित शिक्षण दिलं नाही, त्यांची बालवयात संकल्पना निर्मिती व्यवस्थित झाली नाही तर पुढं आकलनाचे प्रश्‍न येतात. याचा विचारच होत नाही. होय, हे खरंय पूर्वीची (१५ वर्षांपूर्वीची) मुलं व आजची मुलं यात फरक आहे. आजची मुलं जास्त कल्पना करू शकताहेत, जास्त तर्कसंगत विचार करू शकताहेत. अवतीभवती छापील मजकुराचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे त्यांना वाचन लवकर येऊ शकतं. पण म्हणून त्यांना लगेचच औपचारिक शिक्षणाकडं वळवणं योग्य नाही. या पिढीलाही भाषिक, बौद्धिक, मानसिक, सर्जनशील अशी सर्वांगीण प्रगती होण्यासाठी शास्त्रीय बालशिक्षणच द्यायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT