Education
Education 
सप्तरंग

गाऊया विज्ञान गाणी

सकाळ वृत्तसेवा

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
विज्ञान विषयाचा कवितेशी तसा सहसा संबंध नसतो. तरीही विज्ञान मुलांना शिकवताना विज्ञानाचे छोटे खेळ, प्रयोग, गाणी यांचा उपयोग होतो.

आपल्याकडे अजूनही खूप अंधश्रद्धा आहेत. त्या दूर करून बालवयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजायला हवा! सृजन आनंद विद्यालयात नागपंचमीचा मुहूर्त साधून मुलांना अंधश्रद्धांवर बोलतं केलं गेलं. त्यांना छेद देणारी शास्त्रीय कारणं सांगितली गेली. बिनविषारी साप घेऊन निसर्गमित्र शाळेत आले. मुलांनीही साप हाताळले. सापावरचे गाणेही गायले गेले. 

असे कसे बाई साप, पाहिल्याबरोबर घाबरगुंडी उडते आपोआप ।। ध्रु.।। 
नाहीत कान नाहीत पाय, तरीही सळसळ पुढेच जाय 
वेग यांचा पाहून, लागते आम्हालाच धाप ।।१।। 
रंग यांचे वेगवेगळे, माशावानी असती खवले 
कात टाकिती केवढी मोठ्ठी, बाप रे बाप ।।२।। 
निघून जाईल सरसर सरसर जिवाचाहा 
आपुला मैतर, निसर्गाचा तोल राखतो 
लावू नका हो चाऽप ।।३।। 
केवळ मागच्या पिढीनं केलेल्या गोष्टीच आपण करत राहणार का? काळानुसार, नव्या शोधांनुसार आपल्यात बदल घडायला हवेत ना? त्यासाठी हे गाणे 
अस्संच होत आलंय, तस्संच होणार 
म्हणून का तुम्ही, गप्प राहणार? 
तिसरंच यातून का नाही घडणार 
विचार करा ना याचा थोडा 
सोडा, सोडा, अंधश्रद्धा सोडा 
विज्ञानाने माणूस जोडा ।। 
मुलं आनंदानंच वाढायला हवीत, आनंदानंच शिकायला हवीत, आनंदानंच सुजाण व्हायला हवीत. त्यांचं हे वाढणं, शिकणं अधिक सहन व अर्थपूर्ण व्हावं म्हणून रचलेली ही गाणी. काव्य म्हणून ती दर्जेदार नसतील... तशी अपेक्षाही नाही. मुलांना नित्य, नवी नागणी गायला मिळावीत, ती सर्जक व्हावीत, त्यांची भाषा समृद्ध व्हावी. त्यांना सर्वच विषयांची गोडी लागावी. मुख्य म्हणजे मुलांचा शिकण्यातला सहभाग वाढावा यासाठी ही सुरेल खटपट!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT