Education
Education 
सप्तरंग

निसर्ग, संगीत आणि प्रेम... 

शिवराज गोर्ले

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
पारंपरिक पठडीबाज शिक्षणाकडून नैसर्गिक, सहज शिक्षणाकडे जाण्याचे प्रयत्न आज अनेक शाळांमध्ये सुरू आहेत. मुलांना शिक्षण द्यायचं असतं - शिक्षा नव्हे. हे सूत्र आता सर्वमान्य झालं आहे. पण, कृष्णमूर्ती शाळांमध्ये हे तत्त्व स्वीकारलं गेलं होतं तब्बल ७५ वर्षांपूर्वी. 

जे. कृष्णमूर्ती हे विश्‍वविख्यात तत्त्ववेत्ते. ‘चॉइसलेस अवेअरनेस’ अर्थात निवडरहित अवधान हे त्यांचं प्रधान तत्त्व होतं. तेच त्यांनी मुलांच्या शिक्षणातही उतरवण्यासाठी शिक्षकानं कोणत्या पद्धतीनं शिकवावं, तर प्रेमातूनच कसं शिकवायचं हे त्याला कळू शकेल. लहान मुलाला चित्र काढावंसं वाटतं, तर ते कुठल्या पद्धतीनं काढावं असा प्रश्‍न पडत नाही. तसंच शिक्षकांचं मुलांवर प्रेम असेल तर आपोआप पद्धती निर्माण होतील, असे कृष्णमूर्तींचे विचार होते. 

कृष्णमूर्ती शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन हेरंब कुलकर्णी यांनी जी निरीक्षणे मांडली आहेत, ती सारांशांत अशी आहेत. 

    सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक व विद्यार्थी एकत्र राहतात. एकत्र जेवतात आणि खेळतात. समान पातळीवरची वागणूक मुलांना दिली जाते. शिक्षकांचं मुलांवर दडपण नसतं. शिक्षक शिकवत असताना मुलं टोकतात, काहीही विचारतात. शिक्षकही सहजतेनं शिकवतात. 

    शाळेत अभ्यासासोबत कला या विषयाला खूप महत्त्व आहे. शनिवार, रविवार हे दोन दिवस पूर्णतः गायन, वादन, नृत्य, चित्रकला, मातीकाम यासाठीच असतात. अनेक नामवंत कलाकार त्यासाठी शाळेत येत असतात. 

    स्पर्धाविरहित शिक्षण हा इथला गाभा आहे. कुठलीच स्पर्धा इथं घेतली जात नाही. मुलं महत्त्वाकांक्षाविरहित शांत, विकसित होतात. तरीही दहावी - बारावीचे निकाल खूप चांगले असतात. मुलं प्रकल्प पद्धतीनं शिकतात. 

    संगीतानंच दिवस सुरू होतो. सर्व शिक्षक - विद्यार्थी एकत्र बसून वाद्यांच्या साथीनं गाणी - भजनं गातात. 

    सर्वच शाळा निसर्गरम्य स्थळी आहेत. रोज संध्याकाळी सूर्यास्त पाहण्याचा उपक्रम असतो. त्यातून मुलं कोमल, संवेदनशील होतात. 

    रविवारी सकाळी मुलं पक्षिनिरीक्षण करतात. प्रत्येक शाळेत नेचरक्‍लब आहेत. पर्यावरणासंदर्भातले राष्ट्रीय प्रकल्प इथल्या मुलांनी केले आहेत. 
निसर्ग, संगीत, प्रेम ही इथल्या शिक्षणाची भाषा आहे. कृष्णमूर्ती शाळेकडून घेण्यासारखं खूप काही आहे. तशी प्रेरणा घेऊन देशात अनेक ठिकाणी शाळा सुरूही झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT