Life
Life 
सप्तरंग

परिपूर्ण आयुष्याच्या दिशेने... (श्री श्री रविशंकर)

श्री श्री रविशंकर

खरंतर, अज्ञानाच्या अवस्थेत अपरिपूर्णता ही नैसर्गिक आणि परिपूर्णता हा प्रयत्न आहे. मात्र एखाद्या ज्ञानी व्यक्तीसाठी परिपूर्णता हा सहजभाव आहे. परिपूर्णता म्हणजे जबाबदारी घेणे. संपूर्ण जगात आपणच एकमेव जबाबदार व्यक्ती असल्यासारखे काम करणे म्हणजे सर्वार्थाने जबाबदारी घेणे होय.

तुम्ही अशा प्रकारे काम करता, तेव्हा सर्वांत किरकोळ गोष्टीही अतिशय काळजीपूर्वक करता. या परिपूर्ण जगात माणूस अपरिपूर्ण आहे, तो अधिक परिपूर्ण बनवा यासाठीच! अपरिपूर्णतेची ओळख तुम्हाला अधिक परिपूर्णतेच्या दिशेने नेते. हा खरेतर अतिशय नाजूक मुद्दा. तुम्ही अपरिपूर्णतेची जाणीव झाल्यावर उदास होता. तुम्ही स्वतःमधील अपरिपूर्णता ओळखा, पण तिचा धिक्कार करू नका किंवा त्यासाठी दु:खीही होऊ नका. त्यापेक्षा आजूबाजूच्या परिपूर्णतेवर लक्ष्य केंद्रित करीत आपल्यातील अपरिपूर्णतेवर मात करा. खरंतर दोष न शोधण्याची वृत्ती (अनसूया) महत्त्वाची आहे, कारण त्याखेरीज तुम्ही उमलणार नाहीत. 

परिपूर्णतेचे तीन प्रकार आहेत. कृती किंवा कामामधील परिपूर्णता, बोलणे आणि भावना (हेतू) यातील परिपूर्णता. काही व्यक्ती कृती, कामामध्ये उत्कृष्ट असतात, मात्र आतमधून त्या संतापलेल्या असतात. काही व्यक्ती खोटे बोलत असल्यामुळे त्यांचे बोलणे परिपूर्ण नसते, मात्र त्या आपले काम व्यवस्थित करतात. उदा. एखाद्या रुग्णाला डॉक्‍टर, ‘काळजी करू नको, तुझा आजार बरा होईल,’ असे सांगू शकतात, मात्र ते खरे असेलच असे नाही.

येथे डॉक्‍टरांचा खोटे बोलण्यामागे परिपूर्णतेचा हेतू आहे. मात्र कोणी हेतुपूर्वक खोटे बोलत असल्यास अपरिपूर्णतेची भावना निर्माण होईल. त्याच्या बोलण्याबरोबरच कृतीमध्येही अपरिपूर्णतेचे प्रतिबिंब उमटेल. एखाद्याच्या चुकीवर तुम्ही रागावल्यास त्या व्यक्तीपेक्षा तुम्हाला फार चांगले म्हणता येणार नाही. कारण, येथे त्या व्यक्तीची कृती अपरिपूर्ण आहे आणि तुमची भावनाही. कोणत्याही कृतीत काही दोष असू शकतात, मात्र भावना अपरिपूर्ण बनल्यावर सर्वांत आतील परिपूर्णता नाहीशी होते. आपल्या संस्कृतीत काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्रिपू सांगितले आहेत. ते निसर्गातून बनलेले असल्याने आपण प्रकृती आणि विकृती या संकल्पना वापरतो. ते निसर्गाचे भाग असले तरी व्यक्तीला पूर्णपणे उजळू देत नाहीत आणि पापमार्गाला नेतात. तुम्ही विकारांचे अंतर्गत पोषण केल्यास अशुद्धतेचा गुणाकार होतो. पाप हा तुमचा स्वभाव नसून, त्यातून तुमचा जन्म झाला नसल्याचे लक्षात घ्या. एखाद्या कपड्यावरील सुरकुत्यांसारखे असलेले पाप घालविण्यासाठी योग्य इस्त्री हवी. नियमित साधना तुम्हाला या षड्रिपूंपासून विचलित न होण्यास मदत करते. स्वतःमध्ये खोलवर डोकवा, तुम्ही आनंदाचे कारंजे आहात. स्वतःमध्ये असलेल्या गुणांबद्दल कृतज्ञता बाळगा. तुम्हाला हे मूलभूत सत्य समजल्यावर अपरिपूर्णता नामशेष होऊन परिपूर्णतेचे फूल उमलण्यास सुरवात होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT