Mokalevha
Mokalevha 
सप्तरंग

#MokaleVha : हळवेपणावर करा मात

प्रा. वैशाली पाटील, मानोसोपचारतज्ज्ञ

कोरोना या संसर्गजन्य महामारीत सर्वजण संवेदनशील, हळवे झाले आहेत. हात धुण्यापासून ते साफसफाई, सॅनिटाईजर, मास्क वापरून स्वतः ला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक जिवाची धडपड चालू आहे. पण हे सर्व करताना संवेदनशील मनावर मात करणेही गरजेचे आहे. या मनातील आवाज बुलंद ठेवला तरच तुम्ही कोरोनाच्या लढाईत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवू शकता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुणाला कोरोनाची भीती, कुणाला रोजगाराची चिंता, कुणाला नैराश्याची भीती अशी असंख्य प्रश्ने आहेत. अशा खचलेल्या व्यक्तींमध्ये मानसिक सामर्थ्य आहे. असे मानसशास्त्रीय दृष्टीने मला वाटते. संवेदनशील मन म्हणजे रडवेपणा, मुड जाणे असे असले तरी, असा स्वभाव असणाऱ्या माणसांना स्वतःमध्ये सामर्थ्य शोधता येणे शक्य आहे.

या व्यक्ती भावनांच्या आहारी गेल्या आहेत. पण अनुभवाने त्यांना विलक्षण सामर्थ्यही प्राप्त होऊ शकते. कोरोनाच्या काळात हळवे झालेल्या लोकांना आपल्या गरजा किती कमी आहेत आणि आपण किती धडपडतो, हे कळले असेल. आनंदी जीवन जगण्यासाठी घरातील मंडळीच आपल्याला साथ देऊ शकतात, याची जाणीव झाली असेल. 

प्रतिष्ठेचा भाकड पसारा आता आवरायला हवा. मनाच्या भावना हळव्या झाल्यामुळे, दुसऱ्याच्या भावना समजून घेताना माणूस अधिक समजूतदार झाला आहे. आपल्याला जाणवणाऱ्या वेदनेच्या शक्तीवर त्या वेदनेचे समूळ उच्चाटन करण्याचा ते प्रयत्न करू शकतात.
संवेदनशील दूरदृष्टीने श्‍यामच्या आईने श्यामच्या म्हणजेच सानेगुरुजींच्या आयुष्याचे सुंदर शिल्प घडवले.

महात्मा गांधीजींना आपल्या समाजातील दारिद्र्याच्या दर्शनामुळे जी वेदना झाली, त्यामुळे त्यांनी कमरेला पंचा नेसून स्वातंत्र्याचा लढा उभारला. अब्राहम लिंकनने आपल्या मुलांच्या शिक्षकांना लिहिलेल्या पत्रामधून त्यांच्या शिक्षण या कल्पनेविषयीच्या हळुवार जाणिवा लक्षात येतात. यासारख्या असंख्य नावाजलेल्या व्यक्ती हळव्या होत्या. त्यांना तरल संवेदनशीलता लाभली होती, पण ते रडत बसले नाहीत. तर त्या वेदनेने त्यांना खंबीरपणे लढण्याची ताकद मिळाली.

या लोकांमधील हळवेपणा, संवेदनशीलता काढून टाकली तर ते जवळजवळ शून्य होतील. म्हणूनच मानसशास्त्र सांगते की, हळुवारपणामध्ये पण सामर्थ्य असते. फक्त दृष्टिकोन सकारात्मक आणि विवेकी हवा. अशा व्यक्ती क्रियाशील आणि सर्जनशील असतात. या दोन्ही गुणांच्या जोरावर त्यांना कामगिरी करून दाखवता येणे शक्य आहे.

लक्षात घ्या हळवेपणाचे मूळ हे संवेदन क्षमतेत आहे. संवेदनक्षमता हेच तुमचे सामर्थ्य आहे. त्याच्या साहाय्याने समोरच्या कठीण परिस्थितीशी सामना करायचा आहे.

चिंता, डिप्रेशन यामुळे झालेल्या मनाच्या संवेदनशील हळवेपणावर मात करण्यासाठी सकारात्मक मानसिक सराव व व्हिज्युअलायझेशनचे तंत्र आत्मसात करा. आपण कमालीचे यशस्वी झाल्याचे चित्र डोळ्यासमोर आणा. सुरक्षिततेचा खेळ बंद करून जीवनात धोके पत्करा, त्याशिवाय विकास होणे अवघड आहे. रोजच्या दिनक्रमात तुम्ही तेच ते जगत राहिलात तर त्याचा प्रतिसादही सामान्यच असेल. एखाद्या आदर्शवत व्यक्तीचे अनुकरण करीत राहा. एक क्षण नक्की येईल की तुम्हीही यशस्वी व्हाल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT