Tension
Tension 
सप्तरंग

#MokaleVha तणावाचा फुगा

धनश्री भागवत, मानसोपचारतज्ज्ञ

ऑफिसच्या कॉम्प्युटरच्या मजकुरावरून सारिकाची नजर झरझर फिरत होती. तिचं मन मात्र ऑफिसच्या जवळपासही नव्हतं. ती घरून निघाली, तेव्हा विहान नुकताच उठला होता. त्याने खाल्लं असेल का? वेळेवर ऑनलाइन शाळेला बसला असेल का? लक्ष देत असेल का? इतक्यात स्क्रीनवर पॉप झालेल्या एका ॲडमुळे सारिकाच्या विचारांची दिशा बदलली. विहान आणि इंटरनेटला एकत्र सोडलंय. त्यात आजकाल इंटरनेटवर वाट्टेल त्या गोष्टी सहज मिळतात. तो भरकटला तर..? सारिकाच्या कामाचा ढीग मिनिटागणिक वाढत होता.

आज आम्हा दोघांनाही घरी जायला उशीर होणार. त्याला असं घरी सोडून मी खुशाल कामाला येते. हप्ते भरायचे असले म्हणून काय झालं? शेवटी मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मीच कमी पडते का? कामातही आणि घरीही? डोकं भणभणत होतं, घरी पाऊल टाकताच विहानला व्हिडिओगेम खेळताना पाहून अखेरीस स्फोट झाला आणि मग घरात युद्ध जुंपलं.

अनेक पालकांना आपण सारिकाच्या जहाजातच आहोत असं वाटेल. अशावेळी काय करावं? यशस्वी पालक बनण्याची स्वतःकडून असलेली आपली अपेक्षाही काही गैर नाही. पण यामुळे येणाऱ्या तणावांचा फुगा फुटण्याआधीच काय करता येऊ शकतं? या लेखात मानसशास्त्रावर आधारित ४ क्लृप्त्या आहेत, ज्या पालकांनाच नव्हे तर सर्वांसाठीच उपयुक्त आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वतःच्या भावना स्वीकारा
चिंता, भीती नेमकी कसली वाटते, याकडे दुर्लक्ष केल्याने ताण वाढतो. सारिकाला विहानच्या भविष्याची जेवढी चिंता आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त भीती आई म्हणून अपयशी होण्याची आहे. भावनांना स्वीकारण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांच्याबद्दल सजग राहणे. जोडीदाराशी, मित्रमैत्रिणींशी, याच परिस्थितीतून जाणाऱ्या इतर पालकांशी साधलेला मोकळा आणि प्रामाणिक संवाद, स्वतःशी आरशासमोर उभं राहून दिलेली भावनांची कबुली, भावना लिहून काढणे इ. अनेक मार्गांनी हे साध्य होऊ शकतं.

माझ्या नियंत्रणात काय आहे?
नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींची काळजी करून काहीच साध्य होत नाही. ज्या गोष्टी नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष दिलं तर? हा ताण कमी करण्यासाठी मला आज काय करता येईल, हा प्रश्न स्वतःला विचारा आणि याची उत्तरं शोधून सुरुवात करा.

सकारात्मक विधानांचा वापर करा
सुप्त मनातील विचार, भीती आणि तिथून येणारे तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक विधानं अत्यंत प्रभावी आहेत. पुढील विधानं स्वतःला मोठ्याने सांगा. ‘मी एक उत्तम पालक आहे. प्रत्येक क्षणी उपलब्ध साधनं वापरून माझी पालकाची भूमिका मी उत्कृष्टरीत्या पार पाडण्याचे सगळे प्रयत्न करते/करतो.’ हलकं वाटलं का? उत्तम आणि सक्षम पालक असल्याची स्वतःला शक्य तितक्या वेळा आठवण करून देणं अतिमहत्त्वाचं आहे.

स्वतःबरोबर वेळ घालवा
सर्वांत महत्त्वाचा आणि तरीही सर्वांत जास्त दुर्लक्षित मुद्दा म्हणजे स्वतःबरोबरचा वेळ आणि नातं. हे नातं बहरतं तेव्हा त्याचे पडसाद आपल्या संबंध आयुष्यावर उमटू लागतात. मग तो सकाळी चहाच्या वाफाळलेल्या कपाबरोबर एकांतात शांततेत घालवलेला वेळ असो, हे आयुष्याला सुंदर वळण देतात. मग या स्वतःबरोबरच्या नात्यात आपल्याला विचारांचा स्पष्टपणा, भावनांबद्दलची सजगता, पडलेल्या प्रश्नांची उत्तरं, ती शोधण्याचं त्राण, स्वतःचा आधार, जगण्याचा हुरूप, सखोल समाधान असा भरघोस खजिना गवसतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही, म्हणून समाजाच्या मनात रोष - नसीम खान

Guinness World Records' : पंडित धायगुडेंनी दुसऱ्यांदा रचले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ ; पोटावरून २७६ किलोंच्‍या १२१ दुचाकी ३७६ वेळा चालवत नेल्‍या

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT