Food
Food 
सप्तरंग

खवय्यांसाठी...

सकाळ वृत्तसेवा

मुलांच्या जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ दिल्यास त्याचा ते चट्टामट्टा करतात. अशाच काही पदार्थांच्या रेसिपीज्‌ सांगताहेत ‘आम्ही सारे खवय्ये’फेम शेफ देवव्रत जातेगावकर. यामुळे मुलांना पौष्टिक पदार्थ तर मिळतीलच, त्याचबरोबर घराबाहेरची चवही त्यांना अनुभवता येईल...

वेजी योगर्ट सॅंडविच
साहित्य - १०० ग्रॅम घट्ट दही, प्रत्येकी पाच ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, उकडलेले अमेरिकन कॉर्न, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेली काकडी आणि टोमॅटो, चमचाभर कोथिंबीर, १ चीज स्लाइज, चवीनुसार काळीमिरीपूड आणि मीठ, ब्राउन ब्रेडच्या दोन स्लाइज.

कृती - एका भांड्यामध्ये घट्ट दही, त्यामध्ये अमेरिकन कॉर्न, बारीक चिरलेले काकडी, सिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, तसेच चवीप्रमाणे मीठ आणि काळीमिरीपूड घालून मिश्रण एकत्र करावे. तव्यावर ब्राऊन ब्रेडच्या स्लाइस बटरवर टोस्ट करा. त्यानंतर टोस्ट स्लाइसवर मिश्रण लावा. त्यावर चीज ठेवून दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवून तयार सॅंडविच कट करून मुलांच्या डब्यात भरा.

रेनबो पुलाव
साहित्य - १५० ग्रॅम शिजवलेला बासमती भात, प्रत्येकी १० ग्रॅम उकडलेले गाजर, फ्लॉवर, काजूचे तुकडे, प्रत्येकी ५ ग्रॅम उकडलेली फरसबी, उकडलेले हिरवे वाटाणे, २० ग्रॅम शुद्ध तूप, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, १० मनुका, चवीनुसार मीठ.

कृती - कढईत तूप गरम करावे, त्यात मनुका आणि काजूचे तुकडे तळून बाजूला ठेवा. त्याच कढईत उकडलेले गाजर, फ्लॉवर, फरसबी, हिरवे वाटाणे या भाज्या घालून नीट परतून घ्या. हळद टाकून मिश्रण परतून घ्या. शिजवलेला बासमती भात भाज्यांच्या मिश्रणात टाकून नीटसे परतून घ्या. त्यावर चवीनुसार मीठ, मनुके आणि काजू घालून भात परतून घ्या. वरून कोथिंबीर घालून गरमागरम रेनबो भात अननसाच्या रायत्यासोबत सर्व्ह करावा.

पालक पोहा ओट्‌स कटलेस
साहित्य - २ कप बारीक चिरलेला पालक, १ कप उकडलेला बटाटा, प्रत्येकी १ चमचा चॅट मसाला, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा किसलेले आले, अर्धा कप भाजलेल्या खोबऱ्याचा किस, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ३ चमचे ओट्‌स पावडर, दोन चिमूट साखर.

कृती - भांड्यामध्ये अर्धा कप पाण्यात २ कप पोहे १० मिनिटे भिजवावेत, त्यानंतर ते मोठ्या भांड्यात घ्यावेत. त्यात उकडलेला किसलेला बटाटा, लाल मिरची पावडर, चाट मसाला, चिरलेला पालक, किसलेले आले, चिरलेली हिरवी मिरची, ओट्‌स पावडर, भाजलेल्या खोबऱ्याचा किस, दोन चिमूट साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण घट्ट मळून घ्या. मिश्रणाचे आवडीनुसार आकार देऊन कटलेस तयार करा. तयार कटलेट पॅनमध्ये शॉलो फ्राय करून डिशमध्ये कटलेट टोमॅटो केचअपसोबत सर्व्ह करा.

चपाती मूग रोल
साहित्य - दोन चपात्या, कपभर उकडलेले मोडाचे मूग, अर्धा कप कांद्याचे काप, अर्धा कप सिमला मिरचीचे काप, अर्धा कप टोमॅटो वेजिस्‌, अर्धा चमचा चाट मसाला, २ क्‍यूब किसलेले चीज, २ चिमूट काळीमिरी पावडर, ४ चमचे टोमॅटो केचअप, चवीनुसार मीठ, अर्धा कप किसलेला कोबी, ४ चमचे कोथिंबीर, २ चमचे शेजवान सॉस.

कृती - चपातीवर चमचाभर शेजवान सॉस पसरवा. उकडलेले मूग या चपातीच्या मध्यभागी ठेवा. यावर कांदा, सिमला मिरची, टोमॅटो यांचे काप, किसलेला कोबी टाकून त्यावर चाट मसाला, काळी मिरीपूड आणि मीठ स्प्रिंकल करावे. त्यावर टोमॅटो केचअप, त्यावर टोमॅटो वेजिस्‌ ठेवून किसलेले चीज घालावे. चपातीचा रोल करून गरम करा. तव्यावर बटर टाकून थोडासा कुरकुरीत करून डिशमध्ये सर्व्ह करावा.

ब्रोकोली टोफू पराठा
साहित्य - पिठासाठी ३ कप गहू कणिक, चवीनुसार मीठ, २ चुटकी ओवा, २ टेबलस्पून तेल, आवश्‍यकतेनुसार पाणी.

सारण - ३ कप चिरलेली ब्रोकोली, कपभर चिरलेला कांदा, ३ टेबलस्पून तेल, चमचाभर लाल तिखट पावडर, चवीनुसार मीठ, कपभर चिरलेला टोफू, अर्धा टीस्पून चाट मसाला, पाव कप वसंत प्याज.

कृती - वरील घटक वापरून पीठ मळून त्याचा गोळा बनवा. सारणासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा. कांदा मऊसर झाला की त्यात चिरलेली ब्रोकोली, लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ घालावे, नंतर त्यात किसलेले टोफू घालावेत. त्यावर कांदा घालून, मिश्रण थंड करा. पिठाचे लहान लहान गोळे करून, प्रत्येक पिठाची गोळी लाटून त्यात ते मिश्रण भरून बंद करा. नंतर ते लाटून पराठा करा. लाटलेला पराठा तव्यावर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. नंतर दोन्ही बाजूंनी तूप लावून दह्यासोबत खाण्यास द्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT