पंचांग -
शुक्रवार : ज्येष्ठ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी १२.४५, चंद्रास्त रात्री १.१८, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, दुर्गाष्टमी, भारतीय सौर ज्येष्ठ २७ शके १९४३.
दिनविशेष -
१९६२ : पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक, माजी प्राचार्य आणि नामवंत विद्वान नानासाहेब घारपुरे यांचे निधन.
१९७४ : नामवंत संसदपटू व हिंदी साहित्यिक सेठ गोविंददास यांचे निधन.
१९९९ : साहित्यिक, कथा, कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन.
२००४ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचे निधन.
दिनमान -
मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
वृषभ : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्क : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्दीने कार्यरत राहाल.
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
तुळ : एखादा मोठा खर्च संभवतो. मानसिक अस्वस्थता लागून राहील.
वृश्चिक : आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनु : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरूकृपा लाभेल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवावीत.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.