Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २८ फेब्रुवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार : माघ कृष्ण १, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय सायंकाळी ७.४९, चंद्रास्त सकाळी ७.४३, सूर्योदय ६.५५ सूर्यास्त ६.३८, गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा, भारतीय सौर फाल्गुन ९ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२८ : भौतिकशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले थोर भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा शोध लावला. याच रामन परिणामाने त्यांना नोबेल पुरस्कार मिळवून दिला. म्हणून दर वर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
१९६३ : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे पाटणा येथे निधन. बिहारमधील १९३४ मधील भूकंपाच्या वेळी त्यांनी अतोनात परिश्रम घेऊन अडतीस लाखांचा भूकंपनिधी उभारला होता. स्वतंत्र भारताच्या घटना समितीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांची दोनदा राष्ट्रपती म्हणून निवड झाली. महात्मा गांधी त्यांना ‘अजातशत्रू’ असे म्हणत.
१९९७ : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात गीतकार इंदिवर यांचे निधन.
१९९८ : ‘विनोदाचा बादशहा’ म्हणून लौकिक मिळविलेले ज्येष्ठ नाट्य-चित्रपट अभिनेते राजा गोसावी यांचे निधन.
१९९९ : औंध संस्थानचे राजे व सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांचे निधन.

दिनमान -
मेष :
महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आत्मविश्‍वास वाढेल.
वृषभ : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाची कामे पार पडतील. गुरुकृपा लाभेल.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना गुरुकृपा लाभेल.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत.
कन्या : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. संततिसौख्य लाभेल.
तूळ : महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
वृश्‍चिक : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. गाठीभेटी होतील.
धनू : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
मकर : वादविवाद टाळावा. प्रवास सुखकर होतील. गुरुकृपा लाभेल.
कुंभ : आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. गुरुकृपा लाभेल.
मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्‍यता आहे. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT