Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५, कार्तिकस्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती, (पौर्णमा समाप्ती दुपारी २.५९), भारतीय सौर मार्गशीर्ष ९ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९५ - ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचे निधन.
१९९९ - वाराणसीच्या हिंदू विश्‍व विद्यालयातील वेद विभागाचे निवृत्त अध्यक्ष घनपाठी डॉ. विश्‍वनाथभट्ट देव यांचे निधन.
२००० - रेल्वेच्या रुळांमध्ये प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट स्लीपरचा प्रथम वापर करण्यास प्रारंभ करणारे स्थापत्य अभियंते आणि रावळगाव साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णू पुरुषोत्तम लिमये यांचे निधन.
२००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ‘इन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेराल येथून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. या यानाबरोबर जगातील सर्वांत शक्तिशाली अंतराळयानाचे सौरपंख पाठविण्यात आले.
२००३ - रत्नाकर मतकरी (नाट्यलेखन) व भालचंद्र पेंढारकर (नाट्यसंगीत) यांना संगीत अकादमी पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.
तूळ : व्यवसायामध्ये अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.
कुंभ : व्यवसायातील प्रश्‍न मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT