१८१८ साली पेशवाईचा शेवट झाला. त्या अखेरच्या लढाईमध्ये लहुजी राघोजी साळवे यांच्या वडिलांना युद्धभूमीवर वीरमरण आले.
१८१८ सालापासून १८८१ पर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्याकरिता सशस्त्र सेना घडवणारे एक धडाडीचे नेतृत्व/ वस्ताद म्हणून पुण्यामध्ये ज्यांनी कार्य केले त्या आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी राघोजी साळवे अर्थात लहुजी वस्ताद यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर किल्ल्यानजीक पेठ या गावी झाला. लहुजींचे वडील राघोजी हे पेशव्यांच्या शिकारखान्याचे प्रमुख होते. यांचे मूळ गाव भिवडी. पुरंदर किल्ल्याच्या रक्षणार्थ साळवे परिवाराने दाखविलेल्या मर्दुमकीचा सन्मान म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी राऊत ही पदवी देऊन गौरविले.
१८१८ साली पेशवाईचा शेवट झाला. त्या अखेरच्या लढाईमध्ये लहुजी राघोजी साळवे यांच्या वडिलांना युद्धभूमीवर वीरमरण आले. पुण्यातील मांगीरबाबाची समाधी हे त्यांचे स्मृतीस्थळ म्हणून ओळखले जाते. याठिकाणी लहुजी वस्ताद यांनी शपथ घेतली की या शनिवारवाड्यावर पुन्हा भगवा झेंडा ऊभारेन! असे हे शूर लहुजी वस्ताद!
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लहुजी वस्ताद यांचे फार मोठे योगदान आहे. पुणे येथे त्यांचे वास्तव्य होते. ते उत्तम लढवय्ये तसेच शिक्षक होते. तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, कुस्तीचे प्रशिक्षण ते पुण्याच्या गंज पेठ तालमीत देत असत. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, म. ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, सदाशिराव परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, पोवळे अशा दिग्गजांसह अनेक देशभक्तांनी लहुजींच्या आखाड्यात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, कुस्तीचे प्रशिक्षण घेतले.
क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांना १९३१ साली इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी लहुजी वस्तादांनी सहकार्य केले. नंतर १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील लहुजी वस्ताद यांचे कार्यकर्ते सक्रिय होते. वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र उठावात देखील त्यांनी साह्य केले. तसेच ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांना लहुजी वस्ताद यांनी संरक्षण दिले.
१८१८ ते १८८१ या प्रदीर्घ कालावधीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र कार्यकर्ते तयार करण्याचे फार मोलाचे काम लहुजी वस्ताद यांनी केले म्हणून त्यांना आद्य क्रांतिगुरू या उपाधीनेही गौरविले जाते. त्यांचे निधन दिनांक १७ फेब्रुवारी १८८१ रोजी झाले. पुण्यातील संगमपुलावर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांची समाधी असून भविष्यकाळात तेथे भव्य असे स्वातंत्र्यलढ्याचे पंचतीर्थ स्मारक उभारण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.